Home » भारताला धमकी देणारा पन्नू आहे तरी कोण ?

भारताला धमकी देणारा पन्नू आहे तरी कोण ?

by Team Gajawaja
0 comment
Pannu
Share

दिल्ली बनेगी पाकिस्तान या शिर्षकाखाली एक धमकीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि भारतीय राजकारणात खळबळ उडाली आहे.  हा व्हिडिओ आहे खालिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याचा. गुरपतवंत सिंग पन्नू यांनी व्हिडिओद्वारे दिल्ली बनेगी पाकिस्तान, 13 डिसेंबरला संसद भवनावर हल्ला करणार, अशी धमकी एका व्हिडिओद्वारे दिली आहे.  त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.  यामुळे भारताला थेट धमकी देणारा हा पन्नू नेमका कोण आहे, हा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.  (Pannu)

शीख फॉर जस्टिस म्हणजेच, एसजेएफचा प्रमुख आणि खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू हा गेली काही वर्ष भारतासाठी डोकेदुखी झाला आहे.  परदेशात राहून पन्नू कायम भारतविरोधी कारवाया करत आहे. यावेळी याच पन्नूनं काश्मीरचा उल्लेख केला आहे.  संसदेवर हल्ला करुन दिल्लीला पाकिस्तानमध्ये सामिल करण्याचा त्याचा मनसुबा उघड केला आहे.  यासाठी हा खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग 13 डिसेंबरला किंवा त्यापूर्वी संसदेवर हल्ला करणार आहे.  अशाच आशयाची धमकी त्यानं एका व्हिडिओद्वारे दिली आहे.  दिल्ली पाकिस्तान बनेगा, मी 13 डिसेंबरला संसद भवनावर हल्ला करेन,  असे त्यानं सांगून भारत सरकारला खुले आव्हान दिले आहे.  (Pannu)

याशिवाय या व्हिडिओमध्ये पन्नूने भारत सरकार माझ्या विरोधात अनेक कट करीत असून हे सर्व कट फसल्याचेही त्यानं सांगितले आहे.  भारत सरकारचा आपल्याला मारण्याचा कट फसला आहे, आता 13 डिसेंबरला किंवा त्यापूर्वी भारतीय संसदेवर हल्ला करुन त्याचा बदला घेण्यात येईल, असे त्यानं सांगितले आहे.  13 डिसेंबर 2001 रोजी, दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला होता.  याच तारखेची दहशतवादी पन्नूची निवड केली आहे.  नेमकी हीच तारीख निवडून पन्नूनं एका बाजुला खलिस्तानचा झेंडा आणि दुसऱ्या बाजूला संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरूचे पोस्टरही प्रसिद्ध केले आहे.  पन्नूच्या या व्हिडिओमुळे दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्यात आली आहे.  संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू असल्यामुळे तेथील बंदोबस्तात अधिक वाढ करण्यात आली आहे.  (Pannu)

गुरुपतवंत सिंग यांच्याकडे कॅनडा आणि अमेरिका या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे.  येथूनच अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवून तो भारताला धमकावत आहे.  यापूर्वीही पन्नू यानं 19 नोव्हेंबर बाबत धमकी दिली होती.  त्यात त्यांनी शीख बांधवांनी 19 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करू नये, अन्यथा तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. इंदिरा गांधी विमानतळ 19 नोव्हेंबरला बंद होणार असून त्याचे नावही बदलले जाईल, असा दावाही त्यांनी केला होता.

पन्नू (Pannu) हा भारतातील पंजाबचा रहिवासी.  पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील खानकोट हे त्याचे गाव आहे. पन्नूचा जन्म 14 फेब्रुवारी 1967 रोजी एका सामान्य पंजाबी कुटुंबात झाला.  अमृतसर, पंजाब, आणि खानकोट गावात पन्नूचे बालपण गेले.  पन्नूचे वडील मोहिंदर सिंग हे पंजाब राज्य कृषी विपणन मंडळात काम करत होते.  पन्नूची आई  अमरजीत कौर ही सामान्य गृहिणी होती.  हे दोघेही आता या जगात नाहीत.  पन्नूला एक भाऊ देखील आहे, त्याचे नाव मगवंत सिंग पन्नू असून तो देखील परदेशात रहात आहे.  

पन्नू यांनी 1990 च्या दशकात पंजाब विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन जीवनापासून पन्नू यांनी विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला. 1991-92 मध्ये पन्नू पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला गेला. तिथे त्यांनी कनेक्टिकट विद्यापीठात प्रवेश घेऊन फायनान्समध्ये एमबीए केले.  तसेच न्यूयॉर्क विद्यापीठातून पन्नूने कायद्याची पदवी घेतली.   मात्र येथेही पन्नू (Pannu) यांनी स्वतंत्र विद्यार्थी गटाची स्थापना केली होती.  2007 मध्ये त्यांनी शिख फॉर जस्टिसची स्थापना केली.  

================

हे देखील वाचा : रशियातील महिलांनी किमान आठ मुलांना जन्म दिला पाहिजे – पुतिन

================

गुरपतवंत सिंग पन्नू (Pannu) यांनी पंजाबमधील शिखांसाठी वेगळ्या राज्याची मागणी केली.  त्यासाठी  2007 मध्ये पन्नू यांनी शिख फॉर जस्टिसची स्थापना केली.  भारताविरोधी त्याच्या कारवाया वाढल्या.  परिणामी  भारत सरकारने 2020 मध्ये पन्नूला दहशतवादी म्हणून घोषित केले.  यापूर्वी  10 जुलै 2019 रोजी गृह मंत्रालयाने यूएपीए अंतर्गत शिख फॉर जस्टिससंस्थेवर बंदी घातली. पन्नूला दहशतवादी घोषित करतांनाच त्याची भारतातील मिळकतही जप्त करण्यात आली.   याशिवाय पन्नूवर पंजाबमध्ये देशद्रोहाच्या तीन आरोपांसह 22 गुन्हेगारी खटले आहेत.  एप्रिल 2023 मध्ये, पन्नूने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना आसाम भेटीदरम्यान एका व्हिडिओद्वारे धमकी दिली.  

त्यानंतर पन्नूच्या काही साथीदारांची कॅनडामध्ये हत्या करण्यात आली.  तसेच अमेरिकेमध्येही एका भारतीय नागरिकांवर पन्नूच्या हत्येचा कट केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली.  यानंतर पन्नू अज्ञातवासात गेला आहे.  मात्र तेथूनही तो भारताविरोधी कारवाया करण्यासाठी प्रयत्नशील आहे.  त्यातूनच ही नवी धमकी त्यानं दिली आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.