क्लिओपेत्रा (Cleopatra) प्राचीन इजिप्तवर राज्य करणारी ती शेवटची महिला फारो म्हणजे क्लिओपेत्रा. ती इजिप्तच्या टॉलेमिक शासकांच्या वंशातील होती. तिचा जन्म इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथे इ.स. 69 मध्ये झाला. क्लिओपेत्रा (Cleopatra) वयाच्या 14 वर्षी साम्राज्ञी झाली. अत्यंत बुद्धीवान असलेल्या क्लिओपेत्राचे वर्णन इतिहासात तिच्या सौदर्यासाठी केले आहे. मात्र ही क्लिओपेत्रा सौदर्यवती होतीच, पण अत्यंत बुद्धीवान होती. महिला राज्यकर्ती म्हणून तिनं आपला वचक प्रस्थापित राज्यसत्तेवर ठेवला होता. क्लिओपेत्रा तिच्या अनेक रहस्यांसाठीही ओळखली जाते. अगदी तिचा मृत्यूचे रहस्यही अद्याप उकलले नाही. या क्लिओपेत्राच्या (Cleopatra) मृत्यूला अनेक वर्ष झाली असली तरी तिच्याबद्दल नव्या नव्या चर्चा सुरु असतात. आता या चर्चांमध्ये आणखी नव्या विषयाची भर पडली आहे, तो विषय म्हणजे क्लिओपेत्रा काळी होती की गोरी होती. आता या प्राचीन इजिप्शियन राणीच्या रंगावर वाद सुरु झाला आहे. या वादाला कारण एक टिव्ही शो ठरला आहे. टीना घारवी दिग्दर्शित क्वीन क्लिओपेत्रा नावाची मालिका लवकरच छोट्या पडद्यावर येत आहे. क्लिओपेत्राच्या बालपणापासून ते वयाच्या 39 व्या वर्षी तिने केलेल्या आत्महत्येपर्यंत या टिव्ही मालिकेत प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. हे करत असताना या मालिकेत क्लिओपेत्राच्या भूमिकेत कृष्णवर्णीय अभिनेत्री अॅडेल जेम्सला घेण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा क्लिओपेत्रावरुन वाद सुरु झाला आहे आणि ती काळी होती की गोरी होती, याची चर्चा सुरु झाली आहे.

प्राचीन इजिप्तची साम्राज्ञी क्लिओपेत्रा (Cleopatra) आजही सामान्यांच्या चर्चेचा विषय आहे. तिच्याबाबत प्रत्येक गोष्ट चर्चेची होती. आता क्लिओपेत्राचा नक्की रंग कोणता होता, ती कोणत्या वंशाची होती, याची चर्चा सुरु झाली आहे. क्लिओपेत्रा (Cleopatra) ही सावळी होती, ती अफ्रिकन वंशाची होती, अशी माहिती काही संशोधकांनी मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र क्लिओपेत्राच्या चाहत्यांनी क्लिओपेत्रा ही काळ्या रंगाची नव्हती ती गौर रंगाची होती, म्हणून या संशोधकांवर टिका केली होती. मात्र आता पुन्हा याच रंगाचा आधार घेत क्लिओपेत्रावर येणा-या नव्या मालिकेनं वाद सुरु केला आहे. या मालिकेत क्लिओपेत्राची भूमिका करणारी अभिनेत्री काळ्या रंगाची असल्यामुळे क्लिओपेत्रा काळ्या रंगाची होती, या संशोधनावर शिक्कामोर्तब झाल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. यावरुनच हा रंगाचा वाद रंगला आहे.
क्लिओपेत्रा ही इतिहासातील पहिली सर्वात कमी वयाची, महिला साम्राज्ञी ठरली आहे. क्लियोपेट्राचा जन्म इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथे इ.स 6 मध्ये झाला. क्लिओपेत्राच्या (Cleopatra) काळात इजिप्त, संस्कृती आणि आर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र होते. जगभरातील लोक व्यापारासाठी येथे येत होते. टॉलेमिक राजवंश हा मॅसेडोनियन ग्रीक राजवंश होता ज्याने अलेक्झांडर द ग्रेटपासून इजिप्तवर राज्य केले. क्लिओपेत्राचे वडील टॉलेमी बारावे ऑलेट्स होते. तिची आई, क्लियोपेट्रा व्ही ट्रायफेना, ही मुळ ग्रीक वंशाची असल्याचे सांगण्यात येते. क्लिओपेत्राच्या कुटुंबाने शतकानुशतके मूळ इजिप्शियन राजघराण्यांशी आंतरविवाह केले होते. त्यामुळे तिचा वंश ग्रिक आणि इजिप्शियन वंश यांचे मिश्रण असल्याचे मानले गेले आहे.
काही इतिहासकारांच्या मते क्लिओपेत्राच्या कुटुंबाचे व्यापार आणि संरक्षणाच्या दृष्टीकोनातून आफ्रिकन प्रदेशांशी जवळचे संबंध होते. या राजवंशातील अनेक राजांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक हे अफ्रिकन वंशाचे होते. काहींनी क्लिओपेत्राचे (Cleopatra) वडील टॉलेमी बारावी हे न्युबियन वंशाचे असल्याचे सांगितले आहे. नुबिया हा आफ्रिकेतील एक प्रदेश होता जो आता सुदान आणि दक्षिण इजिप्तचा भाग आहे. काही इतिहासकारांचा असाही अंदाज आहे की टॉलेमी XII याची पत्नी न्युबियन होती. त्यामुळेच क्लिओपेत्राकडे आफ्रिकन वारसा आल्याचे इतिहासकारांनी स्पष्ट केले आहे. क्लिओपेत्राची चित्रे ज्यांनी काढली आहेत, त्यांच्यात गौरवर्णातील चित्रकारांची संख्या मोठी आहे. त्यांनी क्लिओपेत्राच्या चित्रात तिचे नाक दाखवून चेहरा अरुंद दाखवला आहे. असे वर्णन ग्रीक वंशाचे असते, हे चुकीचे असल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे. या चित्रांमुळेच ख-या क्लिओपेत्राचा खरा रंग लपवण्यात आल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
=======
हे देखील वाचा : तुमचा खासगी डेटा चोरी करु शकतो Ghost Token
=======
क्लिओपेत्राच्या (Cleopatra) रंगावरुन हा वाद सुरु असताना हे लक्षात घेतले पाहिजे की, क्लिओपेत्रा ही एक शक्तिशाली साम्राज्ञी होती. तिने इजिप्तचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी लढा दिला. ती एक कुशल राजकारणी आणि मुत्सद्दी होती. तिने ज्युलियस सीझर आणि मार्क अँटनी यांसारख्या शक्तिशाली पुरुषांशी युती केली. ती कला आणि विज्ञानाची संरक्षक होती. तिच्या रंगावरुन सुरु असलेल्या वादात तिचे गुण हरवले जाणार नाहीत ना याची काळजी घ्यायला हवी.
सई बने