आजकालची लहान मुलं सुद्धा खुप टॅलेंटेड होत चालली आहेत. लहान वयातच अशी काम करतात जे मोठे लोक सुद्धा करु शकत नाहीत. सर्वसाधारण ५-६ वर्षातील मुलांचा अधिक कल हा खेळण्याकडे असतो. त्यामुळे अभ्यासाकडे ते फारसे लक्ष देत नाहीत. परंतु जगभरात सध्या एका पाच वर्षीय मुलीची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण तिने अवघ्या पाच वर्षात एक पुस्तक लिहिल्याने ती जगातील सर्वाधिक वयाने लहान असलेली लेखिका बनली आहे. बेला जे डार्क (Bella J Dark) असे तिचे नाव आहे. बेलाने लिहिलेले पुस्तक प्रकाशित होण्यासह तिचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ही दाखल केले आहे.
बेला जे डार्क (Bella J Dark) असे आहे. बेला ही ब्रिटेन येथे राहते आणि तिने आता तिचे पुस्तक लिहिल्याने ती सर्वाधिक कमी वय असलेली लेखिका बनली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार मुलीने फक्त पुस्तकच लिहिले नसून त्यामध्ये असणारी चित्र सुद्धा स्वत: च काढली आहेत. बेला हिने लिहिलेल्या पुस्तकाचे नाव ‘द लॉस्ट कॅट’ (The Lost Cat) आहे. बेला हिच्या आईने असे म्हटले की, तिने एक पुस्तक लिहिण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु सुरुवातीला ती सहज असे काही बोलत असल्याचे वाटले. मात्र जेव्हा खरंच पुस्तक लिहणार असल्याचे कळले तेव्हा तिची मदत करण्याचे आम्ही ठरविले.
हे देखील वाचा- चुकूनसुद्धा वाचू नका ही ३ रहस्यमयी पुस्तके, वाचाल जाल सैतानाच्या ताब्यात!
बेला हिचा पुस्तक लिहिण्याचा उत्साह पाहता जेव्हा तिने ते प्रकाशक जिंजर फेयर प्रेसमध्ये गेली असता त्यांनी सुद्धा त्यासाठी लगेच होकार दिला. त्यामुळेच बेला हिचे पुस्तक छापले गेले आणि तिने वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव दाखल केले. रिपोर्ट्सनुसार, द लॉस्ट कॅटची कथा ही हरवलेल्या एका मांजरीची आहे. नंतर तिला जाणवते की, एकटे म्हणजेच आपल्या आईशिवाय कधीच बाहेर जाऊ नये. हे पुस्तक लहान मुलांसाठी एक चांगला संदेश देईल असे बोलले जात आहे. हे पुस्तक ३१ जानेवारीला प्रकाशित झाले होते. आता असे बोलले जात आहे की, बेला डार्क (Bella J Dark) आता आपल्या पुस्तकाचा दुसरा भाग म्हणजेच द लॉस्ट कॅट २ सुद्धा लिहण्यासाठी तयारी करत आहे.
बेलाला तिच्या पुस्तक लिहिण्याच्या अनुभवाबद्दल सुद्धा विचारले गेले. तेव्हा तिने असे म्हटले की, तिने आधी एका मांजरीचे चित्र काढले. त्याच चित्रावरुन तिला पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली. तिला या पुस्तकासाठी कोठून प्रेरणा मिळाली असे विचारले असता तिने म्हटले की, लेडी बर्ड हर्ड स्प्लॅट द कॅट आणि डायरी ऑफ द विम्पी किड मधून प्रेरणा मिळाली. त्यामुळेच मी स्वत: चे पुस्तक लिहिण्याचा विचार केला. कथा अशी लिहावी जी थेट आपल्या मनातून निघते असे ही बेलाने म्हटले.