Home » काडेपेटीचा शोध कोणी आणि केव्हा लावला? जाणून घ्या अधिक

काडेपेटीचा शोध कोणी आणि केव्हा लावला? जाणून घ्या अधिक

by Team Gajawaja
0 comment
Matchbox
Share

काडेपेटीचा शोध लागण्यापूर्वी आग कशी पेटवायची ही एक मोठी समस्या होती. त्यासाठी दोन दगड एकमेकांवर घासल्यानंतर त्यांच्यामध्ये जे घर्षण निर्माण व्हायचे त्यामधून जी ठिणगी पडायची त्यामुळे आग लागायची. मात्र आता काडेपेटीचा शोध लागल्यानंतर आग पेटवण्याच्या समस्येवर तोडगाच निघाला आहे. काडेपेटीचा वापर करुन आता आपण काही गोष्टी करु शकतो. जसे की, अंधार पडल्यानंतर दिवा लावू शकतो किंवा शेकोटी पेटवण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. परंतु तुम्हाला माहितेय का काडेपेटीचा (Matchbox) शोध कोणी आणि केव्हा लागला? चला तर जाणून घेऊयात याबद्दल अधिक.

सर्वात प्रथम जाणून घेऊयात काडेपेटी म्हणजे काय?
काडेपेटीला इंजग्रीत मॅचबॉक्स असे म्हणतात. तर मॅच या इंग्रजी शब्दापासून तो घेण्यात आला असून त्याचा अर्थ असा की. बत्ती किंवा एखाद्या दिव्याचे टोक. काडेपेटी ही आपल्या घरात लागणाऱ्या वस्तूंपैकी एक आहे. कारण माचिसच्या माध्यमातून तुम्ही आग पेटवण्याचे काम करु शकता. काडेपेटी ही लाकडाची लहान दांडी किंवा मजबूत कागदाने तयार केली जाते. याच्या टोकावर विशिष्ट प्रकारचा लेप असतो त्याचे घर्षण काडेपेटीवर केल्यानंतर ती जळते. काडेपेटीचा उपयोग हा विविध कामासाठी केला जातो.

हे देखील वाचा- नदीतून बाहेर आलं हजारो वर्ष जुनं एक गूढ शहर, तेव्हाही होत्या उंच इमारती अन् टॉवर

Matchbox
Matchbox

काडेपेटीचा शोध कोणी आणि केव्हा लावला?
काडेपेटीचा (Matchbox) शोध ब्रिटीश वैज्ञानिक जॉन वॉकर यांनी ३१ डिसेंबर १८२७ मध्ये लावला होता. त्यांनी माचिसची अशी एक काडी तयार केली होती जी बोथट जागेवर घासल्यानंतर ती पेट घेते. त्यावेळी ही गोष्ट अत्यंत धोकादायक होती आणि काही जण काडेपेटीच्या आगीमुळे जखमी सुद्धा झाले होते. दरम्यान, काडेपेटीची काडी तयार करण्यासाठी पॉटेशियम क्लोरेट, गम, स्टार्च, अँन्टीमनी सल्फाइड हे लाकडाच्या काडीवर लावण्यात आले होते. त्यानंतर हा लेप सुखल्यानंतर बोथट जागेवर घासला जायचा आणि त्यामधून आग निर्माण व्हायची. त्यानंतर सॅम्युअल जॉन्स नावाच्या व्यक्तीने याचे पेटेंट करुन घेतले होते. त्याचे नाव लूसीफर मॅच ठेवण्यात आले होते. नेदरलँन्डमध्ये मॅचला अजूनही लूसीफरच्या नावे ओळखले जाते.

काडेपेटीचा इतिहास
सर्वांना माहिती आहे की, कोणत्या कंपनीची काडेपेटी उत्तम असते आणि किती वेळ ती राहू शकते. परंतु काही जणांना हे माहिती नसते की, माचिसची काडी ही कोणत्या लाकडापासून तयार केली जाते. खरंतर काडेपेटीची काडी ही विविध लाकडापासून तयार केली जाते. मात्र तुमच्या माहितीसाठी सांगते की, उत्तम गुणवत्ता असलेली माचिसची काडी ही अफ्रिकेतील ब्लॅकवुडपासून तयार केली जाते. पापलर नावाच्या झाडाच्या लाकडापासून तयार केलेली काडेपेटी ही सर्वाधिक उत्तम असल्याचे मानले जाते. त्यामुळे बहुतांश कंपन्या अधिक नफा मिळवण्यासाठी काडेपेटीची काडी ही जळणाऱ्या लाकडापासून ही तयार करतात. याच प्रकारे काडेपेटी ही अधिक काळ राहत नाही आणि लगेच विझते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.