White Owl Astro : रात्रीच्या वेळेस पिवळ्या-चॉकलेटी डोळ्यांना पाहून बहुतांशजण घाबरतात. खरंतर, घुबडलाला काहीजण घाबरतात. पण तुम्हाला माहितेय का, हिंदू धर्मात घुबडासंदर्भात काही मान्यता आहे. काहीजण रात्री घुबड दिसणे शुभ मानतात तर काहींना ते अशुभ वाचते. घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन असल्याने ते रात्रीच्या वेळेस दिसल्यास शुभ मानले जाते.
घुबड सुख, समृद्धी, बुद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. पांढऱ्या रंगातील घुबडाला ब्राम्हणाच्या रुपात पाहिले जाते. दरम्यान, पांढऱ्या रंगातील घुबड फार कमी दिसते. पण जेव्हा कधी तुम्हाला ते दिसेल तेव्हा तुमचे नशीब बदलणार आहे असे मानू शकता. घुबडाचा रंग वेगवेगळा असतो. पण रात्रीच्या वेळेस पांढऱ्या रंगाचे घुबड दिसणे अत्यंत शुभ आहे.
इच्छा पूर्ण होतात
शास्रानुसार, रात्रीच्या वेळेस पांढऱ्या रंगातील घुबड दिसणे म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. असे मानले जाते की, प्रवासादरम्यान घुबडाचा आवाज जरी आला तरीही भाग्योदय होणार असून सर्व कामे पूर्ण होणार आहेत.
सौभाग्याचे प्रतीक
रात्रीच्या वेळेस घुबड दिसणे शुभ मानले जाते. घुबडला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. शास्रानुसार, घुबड दिसणे म्हणजे आयुष्यात तुम्हाला चांगली बातमी येण्यासारखे आहे. याशिवाय तुमची अपूर्ण कामे देखील पूर्ण होऊ शकतात.
सकारात्मक बातमी येण्याचे संकेत
पांढऱ्या रंगातील घुबड दिसणे म्हणजे सकारात्मक संकेत असल्याचे मानले जाते. तुमची स्थिती येणाऱ्या काळात बदलण्याचेही संकेत असतात.
देवी लक्ष्मीची कृपा
रात्रीच्या वेळेस पांढऱ्या रंगातील घुबड दिसणे म्हणजे तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होणार असल्याचे मानले जाते. म्हणजेच तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. काहींना नोकरीत यश आणि नव्या संधी मिळू शकतात. (White Owl Astro)
अचानक धन प्राप्ती
घुबडाला धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. यामुळे रात्रीच्या वेळेस घुबड दिसल्याने अचानक तुम्हाला धन प्राप्ती होऊ शकते. धनात वाढही यामुळे होऊ शकते.