Home » डोनाल्ड ट्रंम्प यांच्या वॉशरुमध्ये कागदपत्रं फ्लश का करण्यात आली? का चर्चेत आहे व्हाइट हाउसचे टॉयलेट

डोनाल्ड ट्रंम्प यांच्या वॉशरुमध्ये कागदपत्रं फ्लश का करण्यात आली? का चर्चेत आहे व्हाइट हाउसचे टॉयलेट

by Team Gajawaja
0 comment
White house toilet
Share

अमेरिकेतील व्हाइट हाउस पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. परंतु यामागील कारण थोडे वेगळे आहे.नेहमीच व्हाइट हाउस आपल्या खास सिक्युरिटी व्यवस्था किंवा भव्यतेबद्दल चर्चेत असते. पण आता व्हाइट हाउसमधील टॉयलेटमुळे याची अधिक चर्चा सुरु झाली आहे. खरंतर टॉयलेटचे काही फोटो लीक झाले आहेत. त्यात असा दावा करण्यात आला आहे की, हे फोटो व्हाइट हाउसमधील टॉयलेटची आहेत. या फोटोंमध्ये असे दिसून येत आहे की, टॉयलेट सीटमध्ये काही कागदपत्रं पडलेली दिसून येत आहेत. परंतु ही कागदपत्र अशी असल्याची सांगितली जात आहेत ज्यामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांच्यावर कागदपत्र फ्लश करण्याचा आरोप लावण्यात आला होता. तर जाणून घेऊयात कागदपत्र फ्लश करण्याचे नक्की काय प्रकरण आहे त्याबद्दल अधिक.(White house toilet)

काय आहे डोनाल्ड ट्रंम्प यांनी कागदपत्रं फ्लश केल्याचे प्रकरण?
खरंतर काही महिन्यांपूर्वी डोनाल्ड ट्रंम्प यांच्यावर असा आरोप लावण्यात आला होता की, ते जेव्हा राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा त्यांनी काही महत्वाची कागदपत्रं ही फाडून फ्लश केली होती. खास बाब अशी की, त्यांनी फक्त दोनच कागदपत्रं फ्लश केली नव्हती तर जेवढी कागदपत्रं फ्लश केली त्यामुळे व्हाइट हाउसमधील टॉयलेट जाम झाले होते. जेव्हा असे दावे केले गेले तेव्हा ट्रंम्प यांनी सर्व आरोपांना चुकीचे असल्याचे ठरविले होते.

White house toilet
White house toilet

कसा झाला खुलासा?
फेब्रुवारी महिन्यात न्यूयॉर्क टाइम्सची पत्रकार मॅगी हॅबरमॅन यांनी आपल्या पुस्तकात याची माहिती दिली होती. त्यांनी आपल्या पुस्तकात असे लिहिले होते की, व्हाइट हाउसच्या कर्मचाऱ्यांनी याची माहिती दिली. त्यांनी असे म्हटले होते की, टॉयलेटमध्ये ऐवढे कागद फ्लश केले होते त्यामुळे ते जाम झाले होते. त्याचसोबत असा ही आरोप लावला होता की, त्यांनी व्हाइट हाउसमध्ये काही कागदपत्रं फ्लश केली होतीच पण जेव्हा साफसफाई करण्यात आली तेव्हा त्यामध्ये काही प्रिटेंड पेपर टॉयलेटच्या घाणीत मिळाले होते.

परंतु ती किती महत्वाची कागदपत्र होती हे समोर आलेले नाही. असे ही सांगितले जात आहे की, स्वत:साठी तयार करण्यात आलेले हे नोट्स सुद्धा असू शकतात. त्यानंतर त्याच्या विरोधात तपासणी होण्याबद्दल ही बोलले जात होते.(White house toilet)

हे देखील वाचा- ताइवान मधील Strawberry Soldiers चर्चेत, सैन्यात भरती न होण्यासाठी वाढवतात वजन

आता चर्चेत का आहे टॉयलेट?
सध्या डोनाल्ड ट्रंम्प यांच्यावर जे आरोप लावण्यात येत आहेत त्याचे फोटो सुद्धा समोर आले आहेत. त्याचसोबत व्हाइट हाउसच्या पॉटचे फोटो सुद्धा समोर आले. त्यावरुन असा दावा केला जात आहे की, हे फोटो असे दाखवतात की टॉयलेट मध्ये पेपर फेकले गेले होते. सीएनएन यांच्या रिपोर्ट्सनुसार, या फोटोंच्या माध्यमातून ट्रंम्प यांची कागदपत्र फ्लश करण्याच्या सवयीबद्दल सांगितले आहे.काही आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये या फोटोंबद्दल सांगितले गेले आहे. हे फोटो शेअर करण्यात आले आहेत त्यामध्ये एक फोटो व्हाइट हाउस आणि दुसरे परदेश यात्रेचे असल्याचे सांगितले जात आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.