क्रिकेटच्या मैदानातील खेळाडूंना आपल्या स्वत:ची काळजी घेणे फार आवश्यक असते. कारण खेळादरम्यान क्रिकेटपटूंना अशा काही सवयी ज्यामुळे त्याचा त्यांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. त्यामुळे त्यांना आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्यास ही बहुतांशवेळा सांगितले जाते. जसे की, तुम्ही पाहिले असे क्रिकेटपटू खेळताना आपल्या चेहऱ्यावर एक सफेद रंगाची क्रिम लावतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का ही क्रिम नक्की का लावली जाते आणि ती लावण्यामागे काय कारण असावे? याच बद्दल आपण आज अधिक जाणून घेणार आहोत.(White cream use by cricketers)
खरंतर खेडाळू क्रिकेटच्या सामन्यावेळी जी क्रिम आपल्या चेहऱ्याला लावतात ते झिंक ऑक्साइड असते. ही एक फिजिकल सनस्क्रिन आहे. ज्याचा बहुतांशवेळा रिफ्लेक्टरच्या रुपात वापर केला जातो. ही क्रिम लावल्यानंतर त्वचेला होणाऱ्या नुकसानीपासून बचावता येते. तर आपण जी दररोज सनस्क्रिम चेहऱ्याला लावतो ती केमिकल सनस्क्रिन आणि अॅब्सॉर्बर असते. तसेच ही सफेद क्रिम त्वचेवर एक प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करते. ज्यामुळे सूर्यकिरण ही थेट त्वचेवर पोहचत नाहीत. त्याचसोबत ही क्रिम आपण लावत असलेल्या सनस्क्रिनपेक्षा वेगळी असते.
परंतु क्रिकेटपटू झिंक ऑक्साइटचा वापर करतात कारण त्यांना ६-७ तास उन्हामध्ये रहावे लागते. अशातच त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणूनच ही क्रिम खेळाडू आपल्या चेहऱ्याला लावततात. झिंक ऑक्साइड त्वचेवर होणारी जळजळ आणि सूज येण्यापासून दूर ठेवते. या व्यतिरिक्त ही क्रिम लावल्यानंतर चेहऱ्याला कोणत्याही प्रकारची खाजेची समस्या सुद्धा उद्भवत नाही.(White cream use by cricketers)
खरंतर सर्वच क्रिकेटर आपल्या चेहऱ्याला सफेद रंगाची ही झिंक ऑक्साइडची क्रिम लावायचे. मात्र ऑस्ट्रेलिया संघाचा ऑलराउंडर एंड्र्यु साइमंड्स हा मात्र चेहऱ्याला नव्हे तर आपल्या ओठांना ही सफेद रंगाची क्रिम लावायचा. या कारणामुळे त्याची खास ओळख होती.
हे देखील वाचा- क्रिकेट अंपायर होण्यासाठी पात्रता, निवड आणि मैदानावर घडलेले काही ‘हे’ खास किस्से सुद्धा पहा
झिंक ऑक्साइड सनस्क्रिन कधी आणि कशी लावता येते?
बहुतांश क्रिकेटर्स ज्या झिंक ऑक्साइडचा वापर करतात ती चेहरा, मान आणि आपल्या हातांवर लावतात. कारण हेच भाग प्रामुख्याने खेळादरम्यान झाकलेले नसतात. ही क्रिम प्रथम कपाळ आणि चेहऱ्यावर लावली पाहिजे. या क्रिमचा वापर करण्यासाठी आपल्या बोटांवर ती क्रिम घेऊन शरिराचा जो भाग झाकला जाणार नाही तेथे योग्य पद्धतीने लावा.