Home » Pregnancy Health : प्रेग्नन्सीमध्ये कोणते व्यायाम करणे असते लाभदायक?

Pregnancy Health : प्रेग्नन्सीमध्ये कोणते व्यायाम करणे असते लाभदायक?

by Jyotsna Kulkarni
0 comment
pregnancy Health
Share

आपल्याकडे कायम म्हटले जाते की, ‘आई होणे म्हणजे बाईचा दुसरा जन्मच आहे’. हे अगदी खरे आणि योग्य आहे. कारण एक स्त्री जेव्हा आई होते तेव्हा तिला कोणकोणत्या दिव्यातून जावे लागते हे फक्त तीच स्त्री समजू शकते. नऊ महिने तिच्यासाठी जरी आनंदाचे आणि सुखाचे असले तरी तिला विविध शारीरिक आणि मानसिक बदलांमधून जावे लागते. घर, ऑफिस देखील सांभाळावे लागते. आणि डिलिव्हरीचा दिवस तर विचारायला नको ती काय आणि किती वेदना सहन करते हे फक्त तिलाच समजते. हा एवढा त्रास ती केवळ तिच्या बाळासाठीच सहन करत असते.

कोणत्याही स्त्रीला जेव्हा समजते ती आई होणार आहे, तेव्हा ती स्वतःची जास्तच काळजी घेऊ लागते. आपले बाळ देखील निरोगी आणि सुदृढ व्हावे, यासाठी प्रत्येक स्त्री प्रयत्न करत असते. पौष्टिक आणि सकस जेवण जेवते. अनेक गोष्टी आवडत नसताना देखील खाते. केवळ आपल्या बाळासाठीच. यासोबतच डॉक्टर नेहमीच प्रेग्नन्ट स्त्रियांना हलका आणि सोपा व्यायाम करण्याचा सल्ला देतात. आजकाल तर प्रेग्नन्सीमध्ये केल्या जाणाऱ्या व्यायामासाठी, योगासाठी वेगळे क्लासेस देखील होतात. आज आम्ही तुम्हाला याबद्दलच माहिती देणार आहोत. प्रेग्नन्सीमध्ये आपण कोणकोणते व्यायाम करू शकतो याबद्दल जाणून घेऊया. (Marathi Health News)

गरोदरपणात बटरफ्लाय पोज, कॅट-काऊ पोज, मंडुकासन, ताडासन, त्रिकोणासन, विरभद्रासन, बालासन, शवासन, प्राणायाम, ध्यानधारणा आदी आसने करु शकता. या काळात पोटवर कोणताही दाब येणार नाही याची काळजी घ्यावी. छातीशी संबंधित आसने करावीत. या काळात पाठीच्या कण्यावर ताण येईल अशी आसनं, त्याच प्रमाणे पोटावर कोणत्याही प्रकारचा ताण येईल अशी योगासने करू नये. (Todays Marathi Headline)

pregnancy Health

ताडासन
ताडासन गरोदर स्त्रियांसाठी फायदेशीर आहे. हे योगासन करताना प्रथम हातवर हाताचे बोट एकमेकांमध्ये गुंतवून वरच्या बाजूला करायची आहेत. आणि श्वास घेऊन पायाच्या बोटांवर उभे राहायचे. तसेच हळूहळू श्वास सोडत नॉर्मल स्थितीत यायचे. ताडासन हे गरोदर स्त्रीमध्ये होणारे शारीरिक आणि भावनिक बदलण्यासाठी उपयुक्त आहे. (Marathi Headline)

स्थित कोणासन
हे योगासन करत असताना खाली बसून पाय लांब करायचे आहेत आणि डावा हात उजव्या पायाला आणि उजव्या हात डाव्या पायाला लावण्याचा प्रयत्न हळुवारपणे करायचा आहे. (Top Marathi Headline)

चालणे
चालणे हे प्रत्येकासाठी उत्तम व्यायाम आहे. गरोदर महिलांसाठी चालणे हा एक चांगला व्यायाम आहे. कारण यामुळे शरीरात रक्ताभिसरण सुधारते. यामुळे हृदयाचे आरोग्यही सुधारते. याशिवाय प्रेग्नेंसी योगा गरोदर महिलांसाठी फायदेशीर आहे, कारण यामुळे शारीरिक लवचिकता वाढते आणि आरोग्य चांगले राहते. (Latest Marathi News)

स्क्वॅट्स
गरोदर महिलांसाठी स्क्वॅट्स हा देखील एक उत्तम व्यायाम आहे. स्क्वॅट्स करण्यासाठी सर्वात आधी सरळ उभे राहून हात समोरच्या बाजूला ठेवायचे आहेत. त्यानंतर पुन्हा पाठ ताठ ठेवून मागच्या बाजूला बसा. जसे तुम्ही खुर्चीवर बसत आहात, तसे बसावे. हळूहळू शरीर खाली वाकवा, नंतर वरच्या दिशेने उभे राहावे. हा व्यायाम अतिशय हळू हळू आणि काळजीपूर्वक करावा. गरोदर महिलांनी हे व्यायाम करताना आपल्या घरातील एखादी व्यक्ती सोबत असावी. (Top Trending News)

======

Health Care : चिया, सब्जा आणि अळशी…ऋतूनुसार कोणत्या बिया कधी खाव्यात?

======

भ्रामरी प्राणायम
गरोदर महिलांसाठी भ्रामरी प्राणायम हा एक महत्त्वाचा प्राणायाम आहे. हा प्राणायम करण्यासाठी डोळे बंद करून, शांत बसून हाताची तीन बोटं डोळ्यावर ठेवून एक बोट माथ्यावर ठेवावे आणि अंगठा कानावर ठेवावा. त्यानंतर गळ्यातून तोंड बंद असतानाच ध्वनी काढून श्वास सोडूननंतर सामान्य स्थितीत यावे. (Social News)

( टीप : येथे देण्यात आलेली माहिती, उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.