Home » Cancer : जाणून घ्या जो बायडेन ग्रस्त असलेल्या प्रोस्टेट कॅन्सरबद्दल

Cancer : जाणून घ्या जो बायडेन ग्रस्त असलेल्या प्रोस्टेट कॅन्सरबद्दल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Cancer
Share

अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडन (वय ८२) यांना प्रोस्टेट कॅन्सरचे निदान झाले आहे. याबद्दलची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली. जो बायडेन हे अ‍ॅग्रेसिव्ह प्रोस्टेट कॅन्सरने ग्रस्त असून, त्यांचा हा आजार त्यांच्या हाडांपर्यंत पसरला आहे. बायडेन यांच्या कार्यालयाने रविवारी १८ मे रोजी एक निवेदन जारी करून याबद्दल माहिती दिली. बायडेन हे ८२ वर्षाचे आहेत. मागील आठवड्यात बायडेन यांना लघवी करण्यास त्रास झाला होता त्यामुळे त्यांनी शुक्रवारी डॉक्टरांशी सल्ला साधला. त्यांच्या अनेक टेस्ट झाल्या आणि त्यातून त्यांना प्रोस्टेट कॅन्सर झाल्याचं निदान झालं आहे. दरम्यान १० वर्षापूर्वी त्यांचा मुलगा ब्यू याने देखील कॅन्सरमुळेच आपला जीव गमावला होता. (Cancer)

दरम्यान झालेल्या टेस्टमध्ये जो बायडेन यांच्या प्रोस्टेट ग्रंथीत एक लहान गाठ आढळून आली होती. या गाठीच्या झालेल्या तपासणीत ही गाठ कर्करोगाची असल्याचे समोर आले असून ती आता हाडांपर्यंत पसरली आहे. विशेष म्हणजे, बायडेन यांचा ग्लीसन स्कोअर ९ असून हा कर्करोगाचा अत्यंत आक्रमक प्रकार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्याचा प्रतिसाद हार्मोनवर आधारित औषधोपचारांना चांगला असल्यामुळे, हा कॅन्सर नियंत्रणात ठेवता येण्याची शक्यता असलयाचे सांगितले जात आहे. मात्र या बातमीनंतर प्रोस्टेट कॅन्सरबद्दल अनेकांना खूपच प्रश्न पडत आहे. हा कॅन्सर म्हणजे काय? त्याची लक्षणं कोणती? यावर उपाय कोणते? आदी अनेक प्रश्न विचारले जात आहे. जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती. (Marathi News)

2023 च्या सुरुवातीला जो बायडेन यांना त्वचेचा कर्करोग झाला होता. व्हाईट हाऊसच्या डॉक्टरांनी सांगितले की बेसल सेल कार्सिनोमा, त्वचेच्या कर्करोगाचा एक सामान्य प्रकार, त्यांच्या छातीवर आढळून आला होता. फेब्रुवारीमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान हा भाग काढून टाकण्यात आला होता. आता बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सरचे निदान झाले आहे. एका अभ्यासानुसार जगभरामध्ये दरवर्षी १.४ लक्ष लोक प्रोस्टेट कर्करोगाच्या आजाराला बळी पडतात. वयाच्या ५० शी नंतर प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. (Marathi Trending News)

=========

हे देखील वाचा : Temple : भारताच्या सीमेवरील ‘ते’ मंदिर ज्याने झेलले आहेत पाकिस्तानचे अनेक हल्ले

=========

Cancer

प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे काय?
पुर:स्थ किंवा प्रोस्टेट कर्करोग हा फक्त पुरुषांमध्ये होणारा एक गंभीर आणि मोठा आजार आहे. प्रोस्टेट ही एक लघवीच्या मूळ भागाजवळ असलेली ग्रंथी असून ती वीर्य तयार करण्याचे काम करते. जेव्हा या ग्रंथीतील पेशी अनियंत्रितपणे वाढायला लागतात, तेव्हा त्या कॅन्सरच्या स्वरूपात बदलतात. या प्रकारचा कॅन्सर अनेकदा हळूहळू वाढतो, त्यामुळे मोठा काळ कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. मात्र जर तो शरीरात पसरण्यास सुरुवात झाली, की त्याचा धोका वाढतो. असे असले तरी जर योग्य वेळी तपासणी आणि निदान झाल्यास यावर उपचार शक्य असतात. (Marathi Latest NEws)

ग्लिसन स्कोअर म्हणजे काय?
ग्लीसन स्कोअर ही एक ग्रेडिंग सिस्टम आहे जी सूक्ष्मदर्शकाखाली कॅन्सरच्या पेशींच्या दिसण्यावर आधारित प्रोस्टेट कॅन्सरची आक्रमकता ठरवण्यासाठी वापरली जाते. हे मूल्यांकन ६ ते १० पर्यंत असते, ज्यामध्ये जास्त गुण अधिक आक्रमक कॅन्सर दर्शवतात. ९ गुण हा सर्वोच्च गुणांपैकी एक आहे, जो अत्यंत आक्रमक स्वरूप दर्शवितो. बायडेन यांचा ९ हा गुण आला आहे. बायडेन यांच्या बाबतीतही हा कॅन्सर हाडांमध्ये पसरलेला आहे. ही स्थिती गंभीर असली, तरी त्यावर उपचार उपलब्ध आहेत. विशेषतः हार्मोन-सेन्सिटिव्ह प्रकार असल्यामुळे औषधोपचारांना चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. (Marathi Top News) 

प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं कोणती?
प्रोस्टेट कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं खूप सौम्य असतात. ही लक्षणं कॅन्सरचीच असतील असे अजिबातच नाही. ती इतर सामान्य आजारांची देखील असू शकतात. यातली मुख्य लक्षणं म्हणजे लघवी करताना त्रास होणे, वारंवार लघवी लागणे किंवा लघवी करताना वेदना जाणवणे ही काही सुरुवातीची सामान्य लक्षणं आहेत. काही रुग्णांमध्ये लघवीचा प्रवाह कमकुवत होतो. जसा कॅन्सर वाढतो, तसे इतरही लक्षणं दिसू लागतात. यात ओटीपोटात दुखणे, अचानक वजन कमी होणं, हाडं दुखणे, आणि शरीराच्या खालच्या भागात सूज येणे आदी लक्षणं दिसतात. (Social News)

Cancer

प्रोस्टेट कॅन्सरची कारणं
हा कॅन्सर होण्याचे मुख्य कारणं म्हणजे वय. वाढणाऱ्या वयासोबतच हा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. हा आजार पुरुषांमध्येच होतो. पुरुषांना का कॅन्सर पन्नाशी ओलांडल्यावर, वृद्धत्वामध्ये होण्याची शक्यता जास्त असते. शिवाय ज्या पुरुषांचे भाऊ, वडील यांना हा कॅन्सर झाला आहे अशांना याचा त्रास होण्याची शक्यता थोडी जास्त असते. (Social Update)

=========

हे देखील वाचा : Indian Spy : शत्रूने कापले होते ज्यांचे स्तन अशा भारताच्या पहिल्या महिला गुप्तहेर नीरा आर्य

=========

या आजारापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी निरोगी जीवनशैली स्विकारा आणि तिचे पालन करा. तुमच्या आहारात बदल करत हिरव्या पालेभाज्या, फायबर आणि पौष्टिक अन्नपदार्थांचा समावेश करा. दररोज न चुकता व्यायाम करा आणि योग्य वजन ठेवण्याचा प्रयत्न करा. मुख्य म्हणजे कोणतेही व्यसन करू नका. धूम्रपान आणि मद्यपान टाळा.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.