Home » दुरावलेल्या माय -लेकी जेव्हा 64 वर्षांनी भेटतात…

दुरावलेल्या माय -लेकी जेव्हा 64 वर्षांनी भेटतात…

by Team Gajawaja
0 comment
Judy Kenyon story
Share

आई…या शब्दातच सर्व जग सामावलेले आहे. आपली आई सोबत असेल, तर आपण जगातील सर्व संकटांवर मात करु शकतो. मात्र आई जन्म घेताच दुरावली तर? ब्रिटनमध्ये अशीच एक घटना घडली.  अविवाहित असलेल्या एक तरुणीनं अवघ्या 20 व्या वर्षी एका मुलीला जन्म दिला. पण समाजाच्या भीतीनं त्या नवजात बालिकेला आईनं एका जोडप्याला दत्तक दिलं. जन्मानंतर आठवड्याभरात या आई-लेकीची ताटातूट झाली. (Judy Kenyon story)

परिस्थितीनुसार हा निर्णय झाला तरी या दोघींही मनातून एकमेकींबरोबर जोडल्या गेल्या होत्या आणि त्यांच्या मनातली ही ओढच त्या दोघींना पुन्हा एकत्र घेऊन आली आहे. अर्थात त्यावेळी आई 84 वर्षांची, तर मुलगी 64 वर्षाची होती. आईला भेटण्यासाठी लेकीनं जेम्स बॉण्ड सारखं काम केलं आहे.  

ही सत्यकथा आहे ब्रिटनमध्ये राहणाऱ्या जुडी केन्योनची. शिक्षिका असणारी 64 वयाची जुडी चार मुलांची आई आहे. बालवयापासूनच ती आपल्या आईचा शोध घेत होती. जुडी केन्योनचा जन्म 1957 मध्ये झाला. जन्मानंतर अवघ्या दोन आठवड्यात तिला एका जोडप्यानं दत्तक घेतलं. (Judy Kenyon story)

या जोडप्याने जुडीसोबत या जोडप्यानं ‘डेविड’ नावाच्या मुलालाही दत्तक घेतलं होतं. मात्र दोन मुलांना दत्तक घेतल्यावर या जोडप्याचा काही वर्षातच घटस्फोट झाला. त्यानंतर जुडीच्या दत्तक आईनं एका श्रीमंत माणसाबरोबर लग्न केलं. तिथे जुडी आणि तिचा दत्तक भाऊ डेविड रहायला गेले. मात्र जुडीला आई-वडीलांचे प्रेम कधीच मिळालं नाही. कुटुंब म्हणजे काय, याची तिला जाणीवच नव्हती. तिच्या दत्तक वडीलांकडे पैसे भरपूर होते.  तिच्या सगळ्या गरजा पूर्ण होत असत, पण कौटुंबिक प्रेमाला ती कायम पारखी राहिली. 

तिच्या दत्तक भावांने आपल्या मुळ आई-वडीलांना शोधून काढलं आणि तो त्यांच्याकडे रहायला गेला. त्यांनतर जुडी एकटी पडली आणि ती सुद्धा तिच्या जन्मदात्रीला शोध घेऊ लागली.  त्यासाठी तिला डेविडची खूप मदत झाली. (Judy Kenyon story)

आईला शोधण्यासाठी जुडीने ऑनलाईन फॅमिली रजिस्टर आणि दत्तक रजिस्टर शोधले, पण त्याचा उपयोग झाला नाही. फक्त तिचं मुळ नाव ‘जेन मैसे’ आणि तिच्या आईचं नाव ‘जीना मैसे’ असल्याची माहिती मिळाली.  यावरुन जुडीनं आपल्या आईचा पत्ता शोधला आणि त्या पत्यावर पत्र पाठवायला सुरुवात केली.  

या सर्व शोधात जुडीला तिच्या आणखी एका बहिणीचा शोध लागला. तिचं नावही जेन ठेवण्यात आलं होतं.  तिचा जन्म 1962 साली झाल्याचा पुरावा जुडीच्या हाती लागला. त्यामुळे जुडीनं आईसोबत या बहिणाचाही शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र जुडीच्या हाती फक्त निराशा आली. आपली आई या जगात नाही, असा विचारही तिच्या मनात येऊन गेला. या दरम्यान ‘लॉन्ग लॉस्ट फॅमिली’ या टिव्ही शोमध्ये तिला तिची आई दिसली.  (Judy Kenyon story)

फ्रांसच्या दक्षिण भागातील कान्समध्ये असलेल्या जीनानं आपल्या नवजात मुलीचे दोन फोटो सांभाळून ठेवले होते. ते फोटो जुडीचे होते. 1950 मध्ये जीना वयाच्या 19 व्या वर्षी जुडीची आई झाली होती.  त्यावेळी तिचं लग्नही झालं नव्हतं. त्यामुळे अवघ्या दोन आठवड्याच्या जुडीला तिने दत्तक दिलं, त्यावाचून आपल्याजवळ काहीही पर्याय नसल्याचं जीनानं, म्हणजेच जुडीच्या आईनं या शो मध्ये सांगितलं. 

======

हे देखील वाचा – आर्थिक संकटात असणाऱ्या ब्रिटनला भन्नाट उपयोजना करून या ‘पोलादी स्त्रीने’ सावरलं

======

जुडीची आईसुद्धा आपल्या मुलीच्या भेटीसाठी आतुर झाली होती. आपली मुलगी कधी ना कधी आपल्याला भेटेल ही आशाही तिला होती. तिचा रजिस्टर पत्ता कायम होता. तिथे जीनाचे आई-वडील रहात असत.  तिथे एखादे पत्र येईल आणि त्यात जुडीची माहिती असेल, अशी आशा जीनाला होती. जुडीनंही त्याच पत्त्यावर पत्र पाठवली होती, पण दुर्दैवानं त्याआधी महिनाभरच जीनाच्या आईवडीलांनी ते घर सोडलं असल्यामुळे या मायलेकींची भेट लांबली.  (Judy Kenyon story)

या टिव्ही शो च्या माध्यमातून या माय लेकी पुन्हा भेटल्या आहेत. आता आई 84 वर्षाची आहे, तर मुलगी 64 वर्षाची. दोघींचेही कुटुंब आहे, पण त्या दोघींनाही आयुष्यात एक कमी जाणवत होती. या भेटीनंतर ही कमी दूर झाली. इतक्या वर्षांनी का होईना पण माय -लेकीची भेट झाली. 

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.