Home » जेव्हा गोपीनाथ मुंडे भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाणार होते

जेव्हा गोपीनाथ मुंडे भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाणार होते

by Team Gajawaja
0 comment
Gopinath Munde
Share

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेले गोपीनाथ मुंडे. ज्यांनी राज्यात भाजपची पाळंमुळं रुजवली. तेच मुंडे कधीतरी काँग्रेसमध्ये जाणार होते. असं काय झालं की मुंडेंना भाजप सोडण्याची इच्छा झाली होती? आणि मग जर त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचं ठरवलं होतं तर माशी शिंकली कुठे जाणून घेऊयात. १९८० साली भाजपची स्थापना झाली. देशात अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी पक्ष पुढे नेत होते. तर राज्यात प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे पक्षाची कमान सांभाळत होते. (Gopinath Munde)

१९९५ साली राज्यात युतीचे सरकार स्थापन झाले होते. तेव्हा गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. नंतर युतीची सरकार स्थापन व्हायला २०१४ उजाडले पण तेव्हा मुंडे हयात नव्हते. जर मुंडे हयात असते तर ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार ठरले असते असेही सांगितले जात होते. पण हेच मुंडे भाजपमध्ये नाराज होते आणि त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण असं का झालं. २०१७ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एक गौप्यस्फोट केला होता. (Gopinath Munde)

एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखात देताना त्यांना धनंजय मुंडेंबद्दल प्रश्न विचारला होता. धनंजय मुंडे भाजप सोडून राष्ट्रवादीत आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीवर घर फोडल्याचा आरोप होत होता. तेव्हा अजित पवार म्हणाले की आम्ही त्यांना राष्ट्रवादीत यायला रोखलं होतं. तेव्हा त्यांनी आमचं ऐकलंही, पण नंतर दीड वर्षानंतर पंडित अण्णा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी अजित पवारांना सांगितले की मग आम्ही दुसऱ्या पक्षाचा विचार करू. त्यामुळे धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला. (Gopinath Munde)

======

हे देखील वाचा : अजित पवार – हताश की हुशार?

======

गोपीनाथ मुंडेंबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले होते की गोपीनाथ मुंडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश नक्की झाला होता. दिल्लीत कार्यक्रम ठरला होता. गोपीनाथ मुंडेसोबत पंकजा मुंडे, पाशा पटेल, माधुरी मिसाळ, प्रकाश शेंडगे हे आमदार सुद्धा काँग्रेसमध्ये जाणार होते. तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंह म्हणाले की अशा प्रकारे विरोधी पक्ष फोडायचा नसतो. हे लोकशाहीला धरून नाही. त्यानंतर दिल्लीत सुषमा स्वराज यांनी गोपीनाथ मुंडे यांची भेट घेतली आणि त्यांना काँग्रेसमध्ये जाण्यापासून परावृत्त केले. राज्यात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि सुधीर मुनंगटीवार यांनीही गोपीनाथ मुंडे यांची मनधरणी केली. तेव्हा मुंडे यांनी आपला निर्णय मागे घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. (Gopinath Munde)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.