WhatsApp Single Tick : जगभरात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या युजर्सची संख्या सर्वाधिक आहे. खरंतर, व्हॉट्सअॅप एक इंस्टेट मेसेजिंग अॅप आहे. यामध्ये कंपनी सातत्याने नवे फीचर्स अपडेट करत असते. व्हॉट्सअॅपवर तुम्हाला एखाद्याने तुमचा मेसेज वाचल्यानंतर निळ्या रंगातील टिक दाखवली जाते. पण कधीकधी ग्रे रंगातील टिकचा अर्थ काय होतो याबद्दल कंफ्युजन होते. यावेळी असा विचार केला जातो समोरच्या व्यक्तीने आपल्याला ब्लॉक तर केले नाही ना? याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…
व्हॉट्सअॅपवरील सिंगल टिकचा अर्थ काय होतो?
व्हॉट्सअॅपवरील निळ्या रंगातील टिकचा मदतीने कळते की, समोरच्या व्यक्तीने मेसेज वाचला आहे. यावेळी दोन टिक दिसून येतात. त्या निळ्या रंगात असतात. पण सिंगल टिक बद्दल बोलायचे झाल्या, यामध्ये तुम्ही पाठवलेला मेसेज समोरच्या व्यक्तीने पाहिलाय किंवा वाचला आहे की नाही हे कळत नाही. यामागे काही कारणे असू शकतात. जसे की, नेटवर्कची समस्या असणे अथवा समोरच्या व्यक्तीचे व्हॉट्सअॅप बंद असणे.
खरंतर, एखाद्याने तुम्हाला ब्लॉक केले असेल त्यावेळीही सिंगल टिक दिसते. सोप्या शब्दात बोलायचे झाल्यास, एखाद्याला तुम्ही मेसेज केल्यानंतर आधी सिंगल टिक दाखवल्यानंतर डबल टिक दिसल्यास त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलेले नाही. दुसऱ्या बाजूला जर तुम्हाला सिंगल टिक दीर्घकाळ दिसत असेल तर समजून जा व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे. (WhatsApp Single Tick)
कशाप्रकारे कळते एखाद्याने ब्लॉक केलेय?
-ब्लॉक झाल्याच्या स्थितीत तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे ऑनलाइन स्टेटस दिसत नाही.
-बदललेला प्रोफाइल फोटोही दिसत नाही.
-एखाद्याने तुम्हाला ब्लॉक केले असेल आणि तुम्ही मेसेज पाठवला असल्यास तेथे केवळ ग्रे रंगातीलच टिक दिसेल.
-समोरच्या व्यक्तीला फोन करता येणार नाही.
-तुम्ही ग्रुप अॅडमिन असल्यास ब्लॉक केलेल्या व्यक्तीला ग्रुपमध्ये अॅड करू शकत नाही.