Whatsapp News : जगभरातील कोट्यावधी नागरिक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. पण काही युजर्सला माहिती नाही की, स्मार्टवॉचमध्ये व्हॉट्सअॅप इंस्टॉल अथवा डाउनलोड करू शकतो. तुम्ही देखील अशाच युजरपैकी एक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. Wear OS च्या मदतीने तुम्ही सहज स्मार्ट वॉचमध्ये फोनशिवाय चॅटिंगही करू शकता. यासाठी पुढील काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
स्मार्टवॉचच्या माध्यमातून वापरता येईल व्हॉट्सअॅप
सर्वप्रथम आपल्या अॅन्ड्रॉइड फोनमध्ये गुगल प्ले स्टोअर येथे जाऊन Wear OS अॅप सर्च करुन इंस्टॉल करा. इंस्टॉल झाल्यानंतर अॅप सुरु करा आणि स्मार्टवॉचला फोन कनेक्ट करा. याशिवाय युदर्सला त्यांच्यानुसार काही कंपन्यांचे स्मार्टवॉच डेडिकेटेड अॅप गुगल प्ले स्टोअरवर मिळतील.
यानंतर Wear OS स्मार्टवॉचवर गुगल प्लो स्टोअर सुरु करा. आता व्हॉट्सअॅप सर्च करुन इंस्टॉल करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅप न मिळाल्यास समजून जा स्मार्टवॉचमध्ये व्हॉट्सअॅप वापरता येऊ शकत नाही. (Whatsapp News)
कसे करा व्हॉट्सअॅप सेटअप
स्मार्टवॉचमध्ये व्हॉट्सअॅप सेटअप केल्यानंतर सुरु करा. आता मेसेज आणि चॅट्स दिसतील. चॅटवर क्लिक करुन ओपन करू शकता. मेसेजचे उत्तर देण्यासाठी रिप्लाय ऑप्शनवर क्लिक करा. नवा मेसेज पाठवण्यासाठी ‘+’ वर टच करुन Send पर्यायावर क्लिक करा. अशातच समोरच्या व्यक्तीला मेसेज पाठवला जाईल.