व्हॉट्सअॅपचे जगभरात लाखोंच्या संख्येने वापर करतात. याच्या मदतीने तुम्ही काही वेळातच मित्रपरिवाराशी जोडले जाता. मात्र काही देश असे आहेत, जेथे व्हॉट्सअॅप काम करत नाही. अशातच तुम्ही एखाद्याला मेसेज कसे करु शकता? यामुळेच व्हॉट्सअॅपकडून एक प्रॉक्सी फिचर आणले आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही मेसेज करु शकता. (WhatsApp Feature)
काय आहे प्रॉक्सी फिचर?
जेव्हा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून थेट कनेक्शन करणे संभव नसते तेव्हा अॅपमधून प्रॉक्सी सर्वरच्या माध्यमातून तुम्ही ते कनेक्ट करु शकता. प्रॉक्सीचा वापर करण्यासाठी व्हॉट्सअॅप प्रायव्हेसी आणि सिक्युरिटी फिचरमध्ये कोणताही बदल करावा लागत नाही. खरंतर तुमचे खासगी मेसेज आणि कॉल सुद्धा एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड राहतात. म्हणजेच ते मेसेज रिसिव्हर आणि तुमच्यामध्येच राहिल.
ट्विट करत दिली होती माहिती
व्हॉट्सअॅपने नुकत्याच एका ट्विटमध्ये याची माहिती दिली होती. त्यामध्ये या फिचर बद्दल उल्लेख केला होता. प्रॉक्सी बद्दल अधिक माहितीसाठी त्यांनी एक लिंक ही ट्विटमध्ये शेयर केली होती.
कशा पद्धतीने कनेक्ट कराल प्रॉक्सी?
-सर्वात प्रथम व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट वर्जन अपडेट करा
-आता चॅट टॅबमध्ये More Option मध्ये जाऊन वर्जनमध्ये अपडेट करा
-आता स्टोरेज आणि डेटा मध्ये जाऊन प्रॉक्सीवर टॅप करा
-येथे युज प्रॉक्सी ऑप्शनवर क्लिक करा
-आता सेट प्रॉक्सीवर क्लिक करत प्रॉक्सी अॅड्रेस दाखल करा
-असे केल्यानंतर सेव्हवर क्लिक करा
-कनेक्शन यशस्वी झाल्यानंतर चेक मार्क दाखवला जाईल (WhatsApp Feature)
जर तुम्ही प्रॉक्सीचा वापर करुन व्हॉट्सअॅप मेसेज पाठवणे किंवा मिळवण्यास असमर्थ असल्यास तर असे असू शकते की, प्रॉक्सीला ब्लॉक केले असू शकते. आता ब्लॉक केलेल्या प्रॉक्सी अॅड्रेसला घालवण्यासाठी खुप वेळ दाबून ठेवू शकता.
हे देखील वाचा- नवा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जरुर लक्षात ठेवा
iPhone वर प्रॉक्सी कशा पद्धतीने कनेक्ट कराल?
-सर्वात प्रथम तुम्ही व्हॉट्सअॅपवर लेटेस्ट वर्जन अपडेट करा
-आता व्हॉट्सअॅप सेटिंगमध्ये जाऊन स्टोरेज आणि डेटा मध्ये प्रॉक्सीवर टॅप करा
-त्यानंतर युज प्रॉक्सी ऑप्शनवर क्लिक करा
-प्रॉक्सी अॅड्रेस दाखल केल्यानंतर कनेक्ट करण्यासाठी सेववर क्लिक करा
-कनेक्शन यशस्वी झाल्यानंतर चेक मार्क दाखवले जाईल
-थर्ड-पार्टीचा वापर तुमच्या आयपी अॅड्रेसला प्रॉक्सी प्रोवाइडर सोबत शेअर होईल. हे थर्ड-पार्टी प्रॉक्सी व्हॉट्सअॅप द्वारे दिले जात नाही.