स्थलांतरितांना नागरिकत्व देण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गोल्ड कार्ड व्हिसा योजना जाहीर केली. ट्रम्प यांच्या या योजनेची जेवढी चर्चा सुरु झाली आहे, तेवढीच या योजनेमागची ट्रम्प यांची रणनीति काय आहे, याचीही चर्चा सुरु झाली. गेल्या काही वर्षापासून अमेरिकेवर असलेल्या कर्जाची आकडेवारी वाढत आहे. जुलै 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार प्रत्येक अमेरिकन नागरिकावर $1,04,507 कर्ज होते. अमेरिकेला व्याजदरावर दररोज सुमारे दोन अब्ज डॉलर्स खर्च करावे लागतात. या आकडेवारीमध्ये गेल्या वर्षात आणखी वाढ झाली आहे. कारण रशिया-युक्रेनच्या युद्धात अमेरिकेनं केलेली मदत आता त्यांच्यावरच उलटली आहे. (Gold Card Visa)
एकूण जागतिक महासत्ता असलेल्या या देशाची अंतर्गत स्थिती ही डबघईला आलेली आहे. अशाच परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती अमेरिकेची सत्ता आल्यावर त्यांनी प्रथम देशाच्या अर्थव्यवस्थेला सक्षम करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातूनच त्यांनी अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत असलेल्या स्थलांतरितांवर कारवाई सुरु केली. कारण याच स्थलांतरितांवर अमेरिकेच्या करदात्यांचा सर्वाधिक पैसा खर्च होत आहे. या खर्चाला रोखल्यास हा सर्व पैसा अमेरिकेच्या विकासावर खर्च करता येईल, हे मुळ अमेरिकन नागरिकांना पटवून देण्यात ट्रम्प यशस्वी ठरले आहेत. (Donald Trump)
त्यातूनच आता अमेरिकेमध्ये गुंतवणूक आणि सोबत रोजगार वाढवणे हे आव्हान त्यांच्यापुढे आहे. या सर्वांवर त्यांचे गोल्डन व्हिसा कार्ड उपयोगी पडणार आहे. कारण 5 दशलक्ष रुपयांना मिळणारा हा गोल्डन व्हिसा घेणारे उद्योजक अमेरिकेत उद्योग सुरु करतील आणि त्यातून रोजगाराची निर्मिती होईल, अशी अपेक्षा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आहे. असे झाल्यास जगभरातील मान्यवर उद्योजक अमेरिकेचे नागरिक होतील. त्यातून अमेरिकेची पत जगभर अधिक वाढेल असा विश्वास ट्रम्प यांना आहे. (Gold Card Visa)
अमेरिकन नागरिकत्व देण्याच्या बदल्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गोल्ड व्हिसा नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे. 5 दशलक्ष म्हणजेच 44 कोटी भारतीय रुपयांमध्ये हे गोल्डन व्हिसा कार्ड जगभरातील कोणालाही खरेदी करता येणार आहे. ट्रम्प यांनी याला अमेरिकन नागरिकत्वाचा मार्ग म्हणून उल्लेख केला असला तरी यातून ते अमेरिकेच्या खजान्यावरील अतिरिक्त ताण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. ट्रम्प यांनी ‘गोल्ड कार्ड’ हे EB-5 व्हिसा कार्यक्रमाचा पर्याय म्हणून असल्याचे सांगितले आहे. अशी गोल्डन व्हिसा कार्ड तब्बल 1 दशलक्ष नागरिकांना देण्यात येणार आहेत. सध्या लागू असलेला EB-5 व्हिसा योजना ही अमेरिकन नागरिकत्व मिळविण्यासाठीचा सर्वात सोपा मार्ग समजला जात होता. यात दहा लाख डॉलर्सच्या बदल्यात अमेरिकन नागरिकत्व मिळत असे. गेली 35 वर्ष लागू असलेली ही व्यवस्था आता बदलण्यात येणार आहे. (Donald Trump)
गोल्ड व्हिसा कार्ड धारक नागरिकांना ग्रीन कार्डसारखे विशेष अधिकार मिळणार आहेत. या गोल्ड व्हिसा योजनेतून अमेरिकेत गुंतवणूक वाढवण्याचा उद्देश ट्रम्प यांचा आहे. शिवाय सध्याची जी EB-5 व्हिसा योजना आहे, त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार असल्याचा आरोप ट्रम्प यांनी अनेकवेळा केला आहे. या भ्रष्ट्राचाराला नव्या गोल्ड व्हिसा योजनेतून आळा बसणार आहे. अमेरिकेत कायमचे वास्तव्य करण्यासाठी ग्रीन कार्ड आवश्यक असते. यासाठी EB-1, EB-2, EB-3, EB-4 व्हिसा कार्यक्रम आहेत. परंतु EB-5 व्हिसा योजना त्यातही सर्वाधिक लोकप्रिय आहे. 1990 पासून ही योजना लागू कऱण्यात आली होती. (International News)
============
हे देखील वाचा : Taj Mahal : जेव्हा ब्रिटिश ताजमहल फक्त सात लाख रुपयांना विकणार होते
============
यामध्ये, संबंधित व्यक्ती अमेरिकेत कुठेही राहू शकतो. हा व्हिसा मिळण्यासाठी 4 ते 6 महिन्यांचा कालवधी लागत असे. मात्र आता या व्हिसाचे स्वरुप बदलून गोल्डन व्हिसा असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. हा गोल्डन व्हिसा अधिक लवकर मिळणार असून त्यातील सुविधाही व्यापक असणार आहेत. अर्थातच त्यासाठी 5 दशलक्ष डॉलर्स खर्च करावे लागणार आहे. शिवाय ही रक्कम एकसाथ जमा करावी लागणार आहे. म्हणजेच फक्त अतिश्रीमंत आणि व्यावसायिकांनाच हा खर्च परवडणार आहे. (Gold Card Visa)
यामुळे ग्रीन कार्डसाठी दीर्घकाळापासून, वाट पाहणाऱ्यांना अधिक प्रतिक्षा करावी लागणार आहे. ट्रम्प यांच्या योजनेनुसार 10 लाख गोल्ड व्हिसा कार्ड विकले गेले तर त्यातून 5 ट्रिलियन डॉलर्सचा महसूल मिळणार आहे. यातून अमेरिकेवर असलेला कर्जाचा बोजा कमी करता येणार आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार या नव्या योजनेमुळे जगभरातले श्रीमंत लोक आणि यशस्वी उद्योजक अमेरिकेत गुंतवणूक करतील आणि त्यातून नोक-या निर्माण होतील. परिणामी अमेरिका अजून मजबूत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
सई बने