Home » Palakmantri : पालकमंत्री म्हणजे काय? त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात?

Palakmantri : पालकमंत्री म्हणजे काय? त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Palakmantri
Share

मधल्या काही काळापासून नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांचा पालकमंत्र्यांच्या प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर काही आठवड्यांनी सरकार देखील स्थापन झाले आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले, खातेवाटप झाले. गोष्टी मार्गी लागल्या आणि आता राज्याचा कारभार नव्याने या सरकारने सुरु देखील केला. या सर्व गोष्टींना अनेक महिने उलटले असले, तरी नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा वाद काही सुटला नाही. हा तिढा अजूनही कायम आहे. (Palakmantri)

नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेनेचे दादा भुसे आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यामध्ये लढाई सुरु आहे. तर दुसरीकडे रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या नेतृत्वावरून वाद सुरूच आहे. जी आजतागायत कायम आहे. यांच्यातला वाद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी देखील सोडवायचा प्रयत्न केला मात्र त्यांना देखील अपयश आले. आता उद्या महाराष्ट्र दिनी या दोन जिल्ह्यांमध्ये कोण ध्वजारोहण करणार हा प्रश्न उभा राहिला आहे. (Maharashtra Politics)

Palakmantri

प्राप्त माहितीनुसार १ मे रोजी महाराष्ट्र दिनी आदिती तटकरे या रायगडमध्ये झेंडावंदन करणार असल्याने त्यांनाच पालकमंत्रिपद मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. तर नाशिकमध्ये शिवसेनेचे दादा भुसे आणि भाजपचे गिरीश महाजन या दोन्ही नेत्यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यात ध्वजारोहण करण्याची प्रशासनाची इच्छा आहे. मात्र अजूनही यात बदल नक्कीच होऊ शकतो. यावरून जर आपण विचार केला तर गिरीश महाजन आणि आदिती तटकरे हेच त्या त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री व्हायची दाट शक्यता आहे. (Marathi Politics News)

पालकमंत्री पदासाठी हा जो काही वाद सुरु आहे. त्या पदाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नक्की पालकमंत्री म्हणजे काय? त्यांना कोणते अधिकार असतात? त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात? आज आपण या लेखातून पालकमंत्री या पदाबद्दलच जाणून घेऊया. (Marathi)

=========

हे देखील वाचा : Sindhu River : सिंधू करार पाकिस्तानला फायदेशीर कसा झाला !

=========

पालकमंत्री कोण असतात?

पालकमंत्री या नावामधूनच या मंत्रिपदाचा अर्थ आपल्याला लक्षात येतो. आपल्याला दिल्या गेलेल्या जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी त्या जिल्ह्याचा पालक या नात्याने सांभाळणे. एखाद्या जिल्ह्याचा पालकमंत्री असलेल्या व्यक्तीवर त्या जिल्ह्यातील सर्वच समस्या आणि विषयांची अगदी आपला पाल्य आहे या नात्याने काळजी घेण्याची जबाबदारी असते. नैसर्गिक आपत्ती, कुठलीही योजना, लोकोपयोगी कोणतेही काम किंवा अगदी शासकीय समारंभ आदी सर्वच गोष्टींमध्ये पालकमंत्री केंद्रस्थानी असतो. शिवाय जिल्ह्यातील सर्वच विषय उत्तमप्रकारे मार्गी त्याला लावता आले पाहिजे. यालाच सर्वसामान्य भाषेत पालकमंत्री असं म्हणतात. (Marathi Top News)

Palakmantri

पालकमंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांकडून केली जाते. पालकमंत्री हा जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारमधील एक महत्वाचा दुवा असतो. पालकमंत्री जिल्हा प्रशासनला मार्गदर्शन करण्याचं महत्वाचं काम करतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांची प्रशासनामार्फत अंमलबजावणी करुन घेण्याचं काम पालकमंत्री करतात. (Marathi Trending News)

सरकार नियुक्त प्रतिनिधी

पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जिल्ह्याचे सर्व लहान मोठे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवर असते. पालकमंत्री हे विशिष्ट जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवण्यासाठी राज्य सरकाकडून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नियुक्त केले प्रतिनिधी असतात. महाराष्ट्रात सध्या युती सरकारकडून ३४ पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे प्रत्येकी दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री पद देण्यात आलं आहे. एकच मंत्री एकापेक्षा अधिक जिल्ह्यांसाठी पालकमंत्री म्हणून काम करू शकतो. (Marathi Top Stories)

पालकमंत्र्यांच्या जबाबदाऱ्या आणि कामं 

जिल्ह्याकडे वैयक्तिक लक्ष देणे जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसह स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी कामं करणे ही पालकमंत्र्यांची प्राथमिक जबाबदारी असते. जिल्ह्यातील दैनंदिन कामाकाजाशी संबंधित मोठी कामं ज्यामध्ये औद्योगिक श्रेत्र, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, महामार्ग, विमानतळ, कचरा प्रक्रिया प्रकल्प, पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया, मोठमोठ्या योजनांसाठी जमीन अधिग्रहण करणे, एक्सप्रेस वे, विमानतळ, रेल्वे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महत्वाच्या योजनांमध्ये जिल्हा नियोजन समितीवर पालकमंत्री यांची मोठी भूमिका असते. (Social News)

Palakmantri

विविध समस्यांवर समन्वय साधण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवर असते. जिल्ह्यातील सर्व स्थानिक नागरी संस्थांच्या संयुक्त अर्थसंकल्पावर निगराणी ठेवण्याचे काम पालकमंत्र्यांचे असते. थोड्यात सांगायचं तर पालकमंत्री हे जिल्हाधिकाऱ्यांच्या वरचे पद असते. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या आर्थिक योजना आणि उपक्रम वेगवेगळ्या विभागांत राबवण्यापासून ते जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यापर्यंत सर्व उपाय योजना करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना असतात. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, हे पालकमंत्र्यांचे मुख्य उद्दीष्ट असतं. (Top Marathi News)

पालकमंत्रीपद कधीपासून अस्तित्वात आले ?

राज्यघटना किंवा सरकारच्या कामकाजाच्या नियमात पालकमंत्रीपदाची कोणतीही तरतूद केलेली नाही. सरकार आणि जिल्हा प्रशासनातील दुवा म्हणून ही व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. पालकमंत्रीपद हे प्रथम महाराष्ट्रात अस्तित्वात आले. वसंतराव नाईक मुख्यमंत्रीपदी असताना १९७२ नंतर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही प्रथा नंतर रूढ होत गेली. त्याला नंतर पालकमंत्री म्हणून संबोधण्यात येऊ लागले. नंतर पालकमंत्री हे पद इतरही राज्यांमध्ये प्रचलित होत गेले. (Marathi News)

=========

हे देखील वाचा : या एक हॅक्सच्या मदतीने घरबसल्या मिळवा फ्लाइटसंदर्भात माहिती, वाचा सोप्या स्टेप्स

=========

पालकमंत्री असलेला नेता हा त्या जिल्ह्यातील मोठा नेता किंवा राजकीयदृष्ट्या जिल्ह्याचा नेता समजला जातो. दुसरीकडे एखाद्या पक्षाचा नेता पालकमंत्री असेल, तर त्या जिल्ह्यात आपला पक्ष संघटना वाढवण्यासाठी आणि स्वतःची राजकीय ताकद वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं. भारतातील सर्वच राज्यांमध्ये पालकमंत्रीपद आपल्याला दिसत नाही. उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, आसाम, राजस्थान, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये पालकमंत्री किंवा जिल्हा प्रभारीपदे अस्तित्वात आहेत.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.