Home » What is Budget? – बजेट (अर्थसंकल्प) म्हणजे काय?

What is Budget? – बजेट (अर्थसंकल्प) म्हणजे काय?

by Team Gajawaja
0 comment
What is the Budget? Marathi info
Share

आज भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत बजेट सादर करणार आहेत. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून मोठमोठ्या उद्योगपतींपर्यंत सर्वांचे लक्ष बजेटकडे लागून राहिले आहे. बजेट म्हणजे नक्की काय (What is Budget), ते कधी सुरु झालं (History of Budget) आदी गोष्टींची माहिती जाणून घेऊया.  

बजेट म्हणजे काय? (What is Budget?)

बजेट म्हणजे वर्षभरासाठी लागणारा जमाखर्च. पुढच्या आर्थिक वर्षात आपल्याकडे किती पैसे गोळा होण्याचा अंदाज आहे आणि यातले किती पैसे, कुठे खर्च करावा लागणार आहे याबाबद्दलची नोंद. 

१७३३ मध्ये इंग्लंडचे तेव्हाचे अर्थमंत्री सर रॉबर्ट व्हॉलपोल यांनी बजेट सादर करण्यसाठी संसदेत येताना एक चामड्याची पिशवी सोबत आणली होती. त्यानंतर बजेट हा शब्द प्रचिलीत झाला.Bougette फ्रेंच शब्द व Bouge म्हणजे चामड्याची पिशवी. त्यानंतर १८६० मध्ये लाल रंगाची बॅग सोबत आणून बजेट मांडण्याची परंपरा सुरू झाली. तेव्हाचे इंग्लंडचे बजेट प्रमुख विलियम ईव्हर्ट ग्लाडस्टोन यांनी बजेट पेपर लाल बॅगेत व राणीचा सोन्याचा हॉलोग्राम सोबत आणून ही प्रथा सुरू केली.

ब्रिटीश कालावधीपासून कित्येक वर्ष २८ फेब्रूवारीला देशाचे बजेट सादर केले जात असे.आणि त्याअगोदर रेल्वेमंत्री हे बजट स्वतंत्ररित्या सादर करीत. पण गेल्या काही वर्षांपासून देशाचे बजेट नेहमी १ फेब्रुवारी रोजी सादर केले जात आहे. ज्यात रेल्वेचे बजेट देखील समाविष्ट असते.       

बजेट का महत्त्वाचे आहे?

प्रत्येक सरकारच्या काही सामाजिक, राजकीय आणि वित्तीय  जबाबदाऱ्या असतात. विशेषतः भारतासारख्या देशासाठी जमा केलेल्या कररुपी धनाचा उपयोग जनतेच्या सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी केला जातो. तसंच याद्वारे सर्वांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. केंद्रीय बजेटवरुन आपण सरकारचे कामकाज समजू शकतो. बजेटमुळे देशाच्या विकासाचा आराखडा ठरवलं जातो. 

स्वतंत्र भारताचे पहिले बजेट 

स्वतंत्र भारताचं पहिलं बजेट ‘षणमुगम चेट्टी’ यांनी २६ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केलं होतं. मात्र, यात केवळ अर्थव्यवस्थेची समीक्षा करण्यात आली होती. कुठलाच नवा कर यातून लागू करण्यात आला नव्हता.

अर्थसंकल्पाची (बजेट) अंमलबजावणी कधीपासून होते?

अर्थसंकल्प संसदेत सादर केल्यानंतर १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी केली जाते. अर्थसंकल्पातील करबदल १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधी लागू होतात. भारतात १ एप्रिल ते ३१ मार्च हे आर्थिक वर्ष ग्राह्य धरले जाते.  


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.