आयुर्वेदाच्या रूपात भारताने जगाला एक मोठी देणगीच दिली आहे. मनुष्याच्या प्रत्येक रोगावर आयुर्वेदामध्ये औषध सांगण्यात आले आहे. नैसर्गिक गोष्टींचा वापर करून आजार बरे करण्याची पद्धत आयुर्वेदामध्ये सांगितली आहे. अगदी देवी देवतांच्या काळापासून आयुर्वेदाचा वापर केला जात आहे. सध्याच्या आधुनिक जीवनशैलीमुळे अनेकांना विविध लहान मोठ्या आजारांची लागण होताना दिसते. या आजारांना अजिबातच वयाचे बंधन उरलेले नाही. त्यामुळे अनेक जणं आयुर्वेदिक उपचार घेताना दिसतात. आजच्या काळात अनेकांचा विश्वास आणि कल आयुर्वेदाकडे झुकताना दिसत आहे. (Panchakarma)
याच आयुर्वेदातील एक अतिशय प्राचीन, महत्वाची आणि गुणकारी उपचार पद्धती म्हणजे, ‘पंचकर्म’. पंचकर्माबद्दल अनेकांनी ऐकले असेल किंवा वाचले देखील असेल. बऱ्याचदा आयुर्वेदिक डॉक्टर रुग्णांना पंचकर्म करण्याचा देखील सल्ला देतात. मात्र पंचकर्म नक्की काय असते?, या उपचार पद्धतीचा फायदा नक्की काय होतो?, पंचकर्म कधी आणि कसे करतात? आदी सर्वच प्रश्नांची उत्तर पाहूया.
पंचकर्म म्हणजे काय?
आयुर्वेदातील सर्वात महत्त्वाची शाखा म्हणजे पंचकर्म. पंचकर्म या शब्दाचा अर्थ नावाप्रमाणे अर्थात पाच प्रक्रिया असा आहे. पंचकर्मातील पाच प्रक्रिया शरीराच्या शुद्धीसाठी केल्या जातात. पंचकर्म ही एक जुनी आणि ;लाभदायक उपचार पद्धती आहे. यापद्धतीमध्ये पाच प्रकारच्या आयुर्वेदिक पद्धतींचा समावेश असतो. या उपचारात औषधी तेल, काढे आणि इतर आयुर्वेदिक जडीबुटींचा वापर करून शरीरातील अशुद्धता बाहेर टाकली जाते. (Ayurvedic Treatment)
पंचकर्म म्हणजे शरीराची शुद्धी होय. जशी आपण वेळोवेळी आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करून घेत असतो, तशीच आपल्या शरीराची सर्व्हिसिंग करणे देखील गरजेचे असते. ही सर्व्हिसिंग पंचकर्म या उपचार पद्धतीद्वारे केली जाते. यासोबतच शरीरातील अवयवांची झालेली झीज व पोषण करणे हेही पंचकर्मामुळे साध्य होते. पंचकर्मामुळे शरीरातील हे वाढलेले दोष शरीराबाहेर फेकले जातात आणि यामुळे सर्व आजार बरे होतात. (Top Stories)
=========
Skin Care : संवेदनशील त्वचेला हेल्दी बनवायचे असल्यास कोणत्या सवयी सोडाव्यात?
पंचकर्माचे फायदे
– शरीर संपूर्णपणे आतून शुद्ध होते.
– शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.
– चयापचय प्रक्रिया वेगवान होते.
– शरीरातील विषारी घटक निघून गेल्याने वजन कमी होते.
– पचनक्रिया सुधारते.
– शरीरातील सर्व अवरोध (ब्लॉकेज) दूर होतात.
– रोगप्रतिकारक शक्ती (इम्युनिटी) वाढते.
पंचकर्म का करावे?
अनियमित दिनचर्या आणि असंतुलित आहारामुळे कमी वयातच अनेक लोक तणाव आणि विविध आजारांनी ग्रस्त होतात. तसेच, प्रदूषणामुळे शरीरात विषारी घटक जमा होतात. पंचकर्माद्वारे हे सर्व विषारी घटक बाहेर टाकले जातात. पंचकर्मानंतर शरीराचे नुकसान होण्याची प्रक्रिया मंदावते. आयुर्वेदानुसार पंचकर्म फक्त शरीराचीच नाही, तर मनाचीही शुद्धी करते. पंचकर्म म्हणजे पाच क्रिया. मग नक्की या उपचारांमध्ये कोणत्या पाच क्रिया केल्या जातात ते पाहूया. (Marathi News)
वमन
वमन म्हणजे आपल्या श्वसन प्रणालीला अडथळा आणणारी श्लेष्मा (कफ) आणि बद्धता दूर करणे. जर आपण दीर्घकालीन ऍलर्जी, दमा किंवा त्वचेच्या समस्यांचा सामना करत असाल, तर ही उपचारपद्धती नक्कीच लाभदायक ठरू शकते. वमनमध्ये काही आयुर्वेदिक वनौषधीयुक्त मिश्रण तयार करून घेतले जाते. हे मिश्रण रुग्णास दिले जाते. ज्यामुळे रुग्णाला उलट्या होतात. या उलट्यांचा माध्यमातून सर्वच चिकट गुठळ्या काढून टाकल्या जातात आणि आपल्याला आपली छाती अधिक मोकळी आणि हलकी वाटू लागते. (Top Marathi News)
विरेचन
जर आपल्याला पचनासंबंधी समस्या किंवा इसबासारख्या त्वचेच्या समस्या असतील, तर विरेचन फायदेशीर प्रक्रिया ठरू शकते. ही चिकित्सा यकृत आणि आतड्यांची स्वच्छता करते. आपल्या शरीराच्या पचन प्रणालीतून सर्व विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी वैशिष्ट्य औषधांचा वापर केला जातो. या औषधांमुळे रुग्णांना जुलाब होतात. परिणामी आतडे निरोगी तर होतेच, सोबतच त्वचा स्वच्छ होते आणि अधिक संतुलित पित्त दोष राहतो. (Latest Marathi Headline)
बस्ती (एनीमा)
बस्ती ही सर्वात महत्त्वाची पंचकर्म चिकित्सा मानली जाते. कारण ती शरीरातील गती आणि प्रवाह नियंत्रित करणाऱ्या वात दोषासाठी रामबाण इलाज आहे. या प्रक्रियेमुळे शरीरातील वाट दोषापासून मुक्ती मिळते. जर आपण बद्धकोष्ठता, सांधेदुखी किंवा प्रजाजनसंबंधी आरोग्याच्या समस्यांशी झगडत असाल तर, लाभ मिळतो. ज्यामध्ये औषधयुक्त काढे, तेल, तूप किंवा दूध यांचा उपयोग करून मलाशयाची शुद्धी केली जाते. यामुळे शरीरातील अंतर्गत अशुद्धता वेगाने बाहेर निघते. संधिवात , मूळव्याध, कब्ज यांसाठी बस्ती प्रभावी आहे. (Todays marathi Headline)
नस्य (अनुनासिक प्रशासन)
ही प्रक्रिया डोके आणि खांद्याच्या भागासाठी केली जाते. यामध्ये विशेष तेलाने सौम्य मालिश आणि उष्ण उपचार केले जातात. डोकेदुखी, केसगळती, अनिद्रा, मज्जासंस्थेचे विकार, क्रोनिक सायनस आणि श्वसनाचे आजार यावर नस्य उपचार उपयुक्त आहे. (Top Marathi Headline)
रक्तमोक्षण
ही प्रक्रिया रक्तशुद्धीकरणासाठी केली जाते. अशुद्ध रक्तामुळे होणाऱ्या आजारांवर रक्तमोक्षण प्रभावी उपाय आहे. सोरायसिस, सूज, फोड-फोडणी यांसारख्या त्वचारोगांमध्ये ही प्रक्रिया केली जाते. (Health Care)
पंचकर्माने शरीरात बरेच आवश्यक बदल घडत असतात. पंचकर्म ही प्रक्रिया वर वर पाहता सोपी वाटली तरी पंचकर्मादरम्यान शरीरात बरेच बदल होत असतात. म्हणूनच पंचकर्म करताना नियम पाळणे गरजेचे असते. जसे की, या काळात रुग्णाने प्रवास, जागरण, राग करणे, खूप चालणे, अति व्यायाम करणे आदी सर्व गोष्टी टाळाव्या. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली, नियम पाळून, एका जागी राहून पंचकर्म करण्याचा खूप उपयोग होताना दिसतो. (Latest Marathi News)
==========
Fitness : सायली संजीव करत असलेला ‘तक्रकल्प’ उपाय म्हणजे काय?
==========
पंचकर्म कोणी करावे?
पंचकर्म अगदी लहान मुलांपासून ते ८०-८५ वर्षांच्या वृद्धांपर्यंत केले जाते. हे पंचकर्म कोणी कधीही केले तरी चालते. मात्र काही ठराविक आजार, ठराविक प्रकृती किंवा दोष वगळता पंचकर्माला कोणत्याही एका विशिष्ट ऋतूची मर्यादा नसते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तसेच आपल्याला असलेल्या सवडीनुसार वर्ष-दोन वर्षातून पंचकर्म करून घेणे श्रेयस्कर ठरते. (Marathi Trending News)
पंचकर्म करण्यासाठी किती वेळ लागतो?
रुग्णाला झालेल्या व्याधीच्या गरजेनुसार, ऋतूनुसार्, प्रक्रुतीनुसार रुग्णावर पंचकर्म क्रिया केली जाते. पंचकर्म उपचारांचा कालावधी व्यक्तीची आरोग्य स्थिती, दोषांचे असंतुलन आणि उपचाराच्या गरजेनुसार बदलतो, परंतु साधारणपणे ७ ते २१ दिवसांचा कालावधी लागतो. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics