Home » Ice Bath : Ice Bath चे आरोग्याला होतात चमत्कारिक फायदे

Ice Bath : Ice Bath चे आरोग्याला होतात चमत्कारिक फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ice Bath
Share

निरोगी आयुष्यासाठी, जीवनशैलीसाठी प्रत्येक जणं आग्रही असतो. विविध उपाय करत, विविध क्लृप्त्या वापरत माणूस स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी सकस आणि उत्तम आहारासोबतच व्यायामाला देखील महत्व दिले जाते. अनेक जणं दररोज न चुकता आपल्या व्यस्त दिवसाच्या कामातून वेळ काढत व्यायाम आणि योगा करतात. आजकाल तर सोशल मीडिया आल्यामुळे सेलिब्रिटी लोकं स्वतःला कसे फिट आणि फ्रेश ठेवतात, दिवसभर एनर्जी टिकवतात याबद्दल माहिती देतात. आपले डाएट, व्यायाम आदी गोष्टी शेअर करतात. यामुळे देखील सामान्य लोकांना प्रेरणा मिळते आणि ते देखील सेलिब्रिटींचे नुसखे फॉलो करतात. (Ice Bath)

मधल्या काही काळापासून अनेक सेलिब्रिटींनी आईस बाथ घेतल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. बर्फाच्या टबमध्ये अंघोळ करणे म्हणजे आईस बाथ. आता अंघोळीबद्दल देखील अनेकांच्या विविध सवयी आहेत. काही लोकं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पाण्याची अंघोळ करतात. तर काहींना वर्षाच्या बाराही महिने थंड पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते. काही लोकं बाराही महिने गरम पाण्यानेच अंघोळ करतात. आता प्रत्येक पद्धतीने अंघोळ करण्याचे शरीराला फायद्यांसोबतच तोटे देखील होतात. याबद्दल प्रत्येक तज्ज्ञांचे मत देखील वेगवेगळे असते. अशातच आता ‘आईस बाथ’ ही पद्धत देखील कमालीची लोकप्रिय होताना दिसत आहे. (Marathi News)

नुकताच प्रसिद्ध गायक रॅपर बादशाहचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याने बर्फाच्या टबमध्ये अंघोळ केली आहे. याला आईस बाथ थेरपी असे म्हणतात. बादशाहच्या आधी रकुलप्रीत, नेहा शर्मा, विद्या माळवदे, विद्युत जामवाल, कार्तिक आर्यन, सामंथा रूथ प्रभू, आयेशा शर्मा, विराट कोहली आदी अनेक कलाकारांनी ही आईस बाथ थेरपी अनुभवली आहे. मात्र बादशहाच्या या व्हिडिओनंतर पुन्हा एकदा आईस बाथ ही पद्धत खूपच गाजत आहे. आज आपण या लेखातून आईस बाथ या थेरपीबद्दल संपूर्णमाहिती जाणून घेऊया. (Top Stories)

Ice Bath

आईस बाथ थेरपी म्हणजे काय?
आईस बाथ थेरपी घेताना मोठ्या टबमध्ये जास्त प्रमाणावर बर्फ ठेवला जातो. या बर्फाच्या टबमध्ये बसून अंघोळ केली जाते, यालाच आईस बाथ थेरपी असे म्हटले जाते. बर्फाच्या थंडगार पाण्यात १०-१५ मिनिटं बसणं म्हणजेच आइस बाथ. या प्रक्रियेला क्रायोथेरपी म्हणतात. पाणी साधारण १० ते १५ अंश सेल्सिअस इतके थंड असते. या आईस बाथ थेरपीची मोठ्या प्रमाणावर सध्या चर्चा होत आहे. या थेरपीमुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. बॉलिवूडची प्रसिद्ध फिटनेस कोच यास्मिन कराचीवालाने आत्तापर्यंत अनेक लोकांना ही आईस बाथ थेरपीची ट्रेनिंग दिली आहे. या थेरपीचा उपयोग अगोदर फक्त खेळाडूच करायचे पण आता बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही याची कमालीची क्रेझ वाढताना दिसत आहे. (Marathi Latest News)

आईस बाथ थेरपीचे फायदे

शरीराचे रक्तभिसरण सुधारते
बर्फाच्या पाण्यात अंघोळ केल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. थंड पाण्यात दीर्घकाळ बसल्यामुळे शरीराच्या नसा आकुंचन पावतात. याशिवाय पाण्यातून बाहेर आल्यानंतर शरीराचे तापमान सामान्य स्थितीमध्ये येते. बर्फाच्या पाण्याची अंघोळ केल्यामुळे ऑक्सिजनयुक्त रक्त संपूर्ण शरीरात झपाट्याने पोहचते. तसेच स्नायूंना आराम मिळतो. शरीराचे कार्य योग्यरित्या काम करत नसेल तर तुम्ही बर्फाच्या पाण्याची अंघोळ करू शकता. (Top Marathi Headline)

मानसिक तणाव कमी होतो
जर तुम्हाला मानसिक तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर ही आईस थेरपी तुमच्यासाठी उत्तम उपाय आहे. अनेकदा विनाकारण कोणत्याही कारणांवरून काहींना अस्वस्थ वाटू लागते. अशावेळी तुम्ही थंड पाण्याची किंवा बर्फाच्या पाण्याची अंघोळ करू शकता. काही मिनिटं थंड पाण्यात शांत बसून राहिल्यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. बर्फाच्या स्नानादरम्यान आपली सहनशक्ती आणि एकाग्रता देखील सुधारते. हा बाथ नेहमी घेतल्याने व्यक्ती मानसिकदृष्ट्या मजबूत बनते. (Marathi Latest News)

रोगप्रतिकारशक्ती सुधारते
शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी महिन्यातून एकदा तरी बर्फाच्या पाण्याची अंघोळ करावी असे तज्ज्ञ लोकं सांगतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. पाण्यामध्ये खोल श्वास घेत ध्यान केल्यामुळे बॅक्टेरियाच्या संसर्गाची लक्षणे कमी होतात आणि शरीर रोगांपासून निरोगी राहते. (Todays Marathi HEadline)

निद्रानाशाच्या समस्येमध्ये लाभदायक
जर तुम्हाला झोप येत नसेल किंवा निद्रानाशाचा त्रास होत असेल तर आईस बाथ घेतल्याने आराम मिळू शकतो. जे लोकं तणावामध्ये आहेत, त्यांच्याकरता देखील हा बाथ फायदेशीर आहे. आईस बाथ केल्याने कमकुवत पचनशक्ती मजबूत होते.

Ice Bath

रक्ताभिसरण सुधारते
थंड पाण्यामुळे शरीराचे रक्ताभिसरण सुधारते. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात आणि ऊर्जाही वाढते. आईस बाथ थेरपी खूप फायदेशीर आहे. यामुळे स्ट्रेस, चिंता आणि डिप्रेशनसारख्या लक्षणांवर प्रभाव पडतो. जर तुम्ही कोणतीही शारीरिक अडचण किंवा गंभीर आजारांनी त्रस्त नसाल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आइस बाथ घेता येऊ शकतो. सुरूवातीला 5 मिनिटांपासून सुरुवात केली जाते आणि नंतर हळूहळू वेळ वाढवता येतो. (Social Updates and News)

सौंदर्यासाठी उपयुक्त
आइस बाथ थेरपीमुळे त्वचेवरील सूज कमी होते, चेहरा टवटवीत दिसतो आणि स्किन पोर्स घट्ट होतात. त्यामुळे चेहऱ्यावर एक नैसर्गिक ग्लो निर्माण होतो.

वजन कमी करण्यासाठी
वजन कमी करण्यासाठी आइस बाथ फायदेशीर आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर बर्फाच्या पाण्याने अंघोळ करणे खूप फायदेशीर ठरेल. बर्फाच्या पाण्याने अंघोळ केल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.

==========

हे देखील वाचा :  Jadugoda Dark Secret : भारतात इथे आजही मूलं अपंग जन्माला येतात!

==========

स्मरणशक्ती वाढते
बर्फाच्या पाण्याने अंघोळ केल्याने मज्जासंस्थेवर आणि तणाव संप्रेरकांवर सकारात्मक प्रभाव पडतो, ज्यामुळे तुमचा मूड आणि ऊर्जा पातळी सुधारण्यास मदत होते.

चयापचय वाढवा
बर्फाच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीराची ऊर्जा शक्ती वाढते ज्यामुळे शरीर उबदार होते. शरीरातून अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात आणि चयापचय वाढतो.

(टीप : हा लेख केवळ माहितीसाठी देण्यात आला आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.