झारखंडमध्ये एक छोटंसं गाव आहे, त्या गावचं नाव आहे जादूगोडा. ज्या गावाला जादूनगरी आणि सिटी ऑफ मॅजिक या नावाने ओळखलं जातं. जादूगोडाच्या दोन गावांमधल्या रस्त्यावर एक भलमोठं झाड उभं होतं, ज्याच्या फांद्या इतक्या दाट होत्या की, साधा सूर्यप्रकाशसुद्धा त्याच्या आवारात खाली जमिनीवर पडत नव्हता. गावकऱ्यांचं म्हणणं होतं की, त्या झाडावर आत्मा राहतात, त्या दुपारीसुद्धा भटकतात आणि एकदा का कोणी त्या झाडाजवळून गेलं की, त्याला त्रास व्हायचाच व्हायचा. जो कोणी तिथून जातो, त्याला डोकेदुखी, चक्कर किंवा भीती वाटायची आणि काही दिवसांनी तो मरून जायचा. जरी एखादी गरोदर बाई तिथून गेली की, तिच्या पोटातलं बाळ मरून जायचं आणि बाळ जन्माला आलंच, तरी ते अपंग पैदा व्हायचं.
त्यामुळे त्या झाडाची गावात इतकी दहशत पसरली की, कोणीच त्याच्या जवळूनसुद्धा जायची हिम्मत करायचे नाही. गावातल्या लोकांना वाटायला लागलं की, त्या आत्म्यांचा आपल्या गावावर शाप आहे. आता जी कथा ऐकली, ती कोणती भाकड कथा नाही, तर खरी कहाणी आहे आणि ही कहाणी आहे, जमशेदपूर शहरापासून साधारण २८ किलोमीटर अंतरावर असलेल्या जादूगोडागावाला लागलेल्या त्या शापाची, ज्यामुळे कॅन्सर, गर्भपात, मृत्यू आणि मूलं अपंग जन्माला येणं अशा घटना अजुनही घडत आहेत. हा शाप नक्की आहे तरी काय? त्याचा परिणाम गाव अजूनही का भोगतोय हे जाणून घेणार आहोत. (Jadugoda Dark Secret)
१९५० साली ही बातमी नॅशनल मीडियात पसरली आणि इंडियन गव्हर्नमेंटने या रहस्यमयी झाडाचा तपास करण्यासाठी सायंटिस्ट आणि एक्सपर्ट्सची एक स्पेशल टीम पाठवली. या टीमचं नेतृत्व करत होते डॉ. डी. एन. वाडिया, जे त्या वेळी जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे मोठे सायंटिस्ट होते. जेव्हा ते पहिल्यांदा जादूगोडात पोहोचले, तेव्हा त्यांना तिथलं वातावरणच विचित्र वाटलं. तिथे अचानक त्यांचं कंपास काम करेनासं झालं. मोबाईल सिग्नल्स वीक झाले. इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेससारखे बंद होत होते आणि त्यांना जमिनीतून प्रचंड हीट जाणवत होती. डॉ. वाडियांंनी सर्वात आधी त्या वडाच्या झाडाजवळच्या मातीचे काही नमुने घेतले. मग तिथल्या पाण्याची आणि हवेची तपासणी सुरू केली. (Top Stories)
जसजसे दिवस जायला लागले आणि तसतशी त्यांच्या टीममधल्या काही मेम्बर्सची तब्येत बिघडायला सुरुवात झाली. काही लोकांच खूप डोकं दुखायला लागलं, काही लोकांना चक्कर यायला लागली. डॉ. वाडिया म्हणाले, “इथे काहीतरी आहे, पण आत्मा नाही.” त्यांच्या टीमने बरेच महिने रिसर्च केलं. झाडाची माती, पाणी, हवा अगदी सगळं तपासलं आणि १९५१ मध्ये त्या भयानक रहस्याचा उलगडा झाला आणि शेवटी जे सत्य समोर आलं, ते गावकऱ्यांच्या आणि त्यांच्या इमॅजिनेशनपेक्षा खूप वेगळं होतं. त्या वडाच्या झाडाजवळच्या जमिनीत एक चमकदार, पण धोकादायक धातू सापडला. तो धातू म्हणजे युरेनियम. युरेनियम! हा धातू दिसायला साधा, राखाडी-चंदेरी रंगाचा असतो, पण त्याच्यात इतकी ताकद आहे की, त्याचा वापर झाला तर, संपूर्ण शहर उद्ध्वस्त करू शकतं आणि त्याचा वापर अणुबॉम्ब बनवण्यासाठी केला जातो. याचे रेडीएशन इतके स्ट्रॉंग असतात की, याने लोकांच्या मेंटल आणि फिजिकल हेल्थवर भयंकर इफेक्ट होतो.(Jadugoda Dark Secret)
हा परिणाम तिथल्या लोकांवर कसा होतो हे एका खऱ्या घटनेवरून बघूयात. लक्ष्मीनावाच्या बाईची ८ मूलं पोटातच मेली आणि काही जन्म झाल्यावर पुढच्या काही दिवसातच मेली आणि जेव्हा ९ वं मूल जन्माला आलं तेव्हा सगळे खुश झाले, पण जी मुलगी जन्माला आली तीला celebral palsy नावाचा भयंकर आजार होता. सेरेब्रल पाल्सी हा मेंदूशी संबंधित आजार आहे, ज्यामुळे स्नायूंची ताकद, हालचाल आणि समन्वय यावर परिणाम होतो आणि अशा बऱ्याच केसेस जादूगोडा अजूनही दिसून येतात. याचं कारण म्हणजे युरेनियम. (Top Stories)
1967 मध्ये युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (UCIL) ने तिथे मायनिंगचं काम सुरू केलं. या खाणीतून मिळणारा युरेनियम भारताच्या न्यूक्लियर रिअॅक्टर्ससाठी वापरला जाऊ लागला. यूज्वली काय होतं की, एखाद्या गावात जेव्हा एखादी मोठी कंपनी येते, तेव्हा चांगल्या गोष्टी होतात, गावाचा विकास होतो, पण हीच गोष्ट जादूगोडासाठी शाप ठरली. या मायनिंगमुळे धूळ तयार झाली आणि रेडॉन गॅस बाहेर पडला, ज्यामुळे प्रदूषण वाढलं. ज्याचा परिणाम गावकऱ्यांवर व्हायला लागला. तरी UCIL ने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं असंच दिसतंय.
१९९० आणि २००३ च्या स्टडीमध्ये धक्कादायक गोष्टी समोर आल्या. २५% मुलांना काही न काही फिजिकल इनहेरेंट डिसीज होतात. म्हणजे प्रत्येक ४ मुलांमध्ये एक मूल अपंग जन्माला येतं. ३०% बायकांना प्रेग्नन्सीदरम्यान काही ना काही इश्यू फेस करावा लागतो आणि ऐकून धक्काच बसेल की, पाच वर्षात ३०% बायकांनी मृत बाळांना जन्म दिला. याव्यतिरिक्त तिथल्या भागात २७% लोकांना जोंडिस, २३% लोकांना मलेरिया, २०% मुलांना ट्यूबरक्लॉसिस, ११% लोकांना हाडांची डिफॉर्मिटी, ६% लोकांना कॅन्सर आणि हायड्रोसिससारख्या खतरनाक आजार होते. (Jadugoda Dark Secret)
===============
हे देखील वाचा : Balloon Fest 86 : १५ लाख फुगे हवेत सोडले, मग असं काही झालं…
===============
या आजारांबरोबरच टेलिंग पॉन्ड्समधून निघणारं विषारी पाणी आणि विषारी हवेमुळे जादूगोडा आणि त्याच्या आसपासचा एरिया इतका प्रदूषित झाला की, तिथल्या शेतकऱ्यांसाठी शेती करणं हे स्वप्नच बनलं. हे टेलिंग पॉन्ड्स म्हणजे खाणीतून निघणारा रेडिओअॅक्टिव्ह कचरा टाकायचे तलाव. या तलावांमुळे आजूबाजूची जमीन नापीक व्हायला लागली, झाडं सुकून गेली, पाण्याचा रंग बदलला आणि जादूगोडा गावातल्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. (Jadugoda Dark Secret)
१९९९ मध्ये श्रीप्रकाश यांनी जादूगोडाच्या या भयानक परिस्थितीवर ‘Buddha Weeps In Jadugoda’ नावाची डोक्युमएन्ट्री तयार केली. ज्याने जादूगोडाचं सत्य सगळ्यांसामोर आलं. तरीसुद्धा UCIL आणि सरकारने याकडे दुर्लक्ष केलं, असं अजूनही लोक म्हणतात. UCIL ने जादूगोडात खाणकाम आणि पायाभूत सुविधा आणल्या, पण त्यांचे दावे आणि गावकऱ्यांची रीयालिटि यात खूप फरक आहे. UCIL म्हणणं आलं की, रेडिएशन लिमिटेड आहे आणि आजारांचं कारण कुपोषण आहे. पण अभ्यासवरून असं समोर आलं की, रेडिएशनमुळे गावावर ही परिस्थिति आली. जादूगोडाने देशाला न्यूक्लियर पॉवरचा आधार दिला, पण बदल्यात तिथल्या लोकांना काय मिळालं, तर कॅन्सर, अपंगतत्व, वंझत्व, गर्भपात, स्कीन प्रॉब्लेम असे आजार दिले आणि त्यांचं भविष्य? तेही दूषितच झालंय.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics