वजन कमी करण्याचा एकच मंत्रा म्हणजे जेवढी कॅलरीचे फूड खाल तेवढीच कॅलरी तुम्हाला बर्न करावी लागेल. त्यामुळे जे लोक वजन कमी करु पाहत आहेत त्यांना या मंत्राला नक्कीच आचरणात आणले पाहिजे. या व्यतिरिक्त तुम्ही मर्यादित गोष्टी खाऊन सुद्धा तुमचे वजन कमी करु शकता. वेट लॉससाठी लोक विविध प्रकारचे डाएट करताना आपण पाहतो. जसे की, पेलियो डाएट, किटो डाएट, लो-कार्ब डाएट. परंतु तुम्ही कधी फिस्ट डाएट बद्दल ऐकले आहे का? किंवा तुम्हाला ते नक्की काय असते हे माहिती आहे का? या डाएमध्ये तुम्ही मर्यादित कॅलरीचे सेवन करुन वजन कमी करु शकता. आणखी महत्वाची बाब अशी की, फिस्ट डाएट (Fist diet) मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या व्यायामाची ही गरज भासत नाही. चला तर जाणून घेऊयात फिस्ट डाएट नक्की आहे तरी काय?
–फिस्ट डाएट म्हणजे काय?
फिस्ट डाएमध्ये मुठभर डाएट. त्यामध्ये तुम्ही तुमच्या तळहाताऐवढे किंवा एक मुठभर ऐवढेच पदार्थ खाऊ शकता. या डाएमध्ये तुम्हाला तीन वेळा अन्न खावे लागते. प्रत्येक मील हे तुमच्या चार मुठ समान असते. जे तुम्ही जेवता त्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट आणि फायबरचा समावेश असला पाहिजे. प्रत्येक दिवशी तीन मील ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात एक चमचा फॅट म्हणजेच तूप किंवा तेल असणे आवश्यक आहे. या डाएटच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक आठवड्याला ४००-९०० ग्रॅम वजन कमी करु शकता.
हे देखील वाचा- खाल्ल्यानंतर कधीच करु नका ‘या’ चुका, आरोग्याला बसेल फटका

–फिस्ट डाएटमध्ये कोणत्या गोष्टी खाऊ नयेत?
फिस्ट डाएटमध्ये (Fist diet) नेहमीच संतुलीत आहार खाल्ला जातो. यामध्ये तुम्ही मर्यादित कॅलरीत काही खाऊ शकता. पण त्याचा अर्थ असा नव्हे की, चॉकलेट, तळलेले पदार्थ खाणे. या डाएटमध्ये तुम्हाला प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट आणि फायबरयुक्त गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. तुमचे मील तीन भागात विभागा आणि नंतरच त्याचे सेवन करा. प्रोटीनसाठी तुम्ही मीट, मासे आणि अंडी खाऊ शकता. तर कार्ब्स रुपात तुम्ही भाज्या, पास्ता, भात, बटाटा, गहू, आणि ब्रेड खाऊ शकता. फॅटच्या रुपात तुम्ही नट्स खाऊ शकता पण तुम्हाला ड्रायफ्रुट्सची अॅलर्जी असेल तर ऑलिव्ह ऑइल, एवोकाडे, चीन आणि बटर ही खाऊ शकता.
-फिस्ट डाएमध्ये व्यायाम करणे गरेजे असते का?
फिस्ट डाएटमध्ये व्यायाम करणे गरजेचे नाही पण फिजिकली अॅक्टिव्ह राहण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. जर तुम्ही व्यायाम करतच नसाल तर तुमचे वजन ही हळूहळू कमी होईल. पण तुम्ही डाएटसोबत वेट ट्रेनिंग किंवा कार्डिओ करत असाल तर तुमचे वजन लवकर कमी होईल. अशातच महिन्याभरात तुम्ही तीन-चार किलो वजन कमी करु शकता. जर कोणी दररोज ३० मिनिटे व्यायाम करत असेल तर त्याला वेगाने बदल दिसून येईल.