१४४ वर्षानंतर आलेल्या प्रयागराजमधील महाकुंभमध्ये रोज कोट्यवधी भाविक येत असून पवित्र त्रिवेणी संगमावर स्नान करत आहेत. कारण महाकुंभ 2025 चा प्रारंभ कधी होणार याची उत्सुकता भाविकांना होती आणि महाकुंभ सुरु झाल्यापासून भाविक येथे अमृत स्नान करत आहेत. पण २९ जानेवारी रोजी मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काहीच दिवसांपूर्वी मेळ्यात आग लागल्याची बातमी समोर आली होती त्यातच आता हे चेंगराचेंगरी प्रकरण घडलं, मात्र इतकं Management असतानाही ही दुर्घटना नेमकी घडली तरी कशी ? जाणून घेऊ. (Kumbhmela)
१४४ वर्षानंतरच्या ह्या महाकुंभ मेळ्याची उत्सुकता सर्वांमध्ये होती आणि लाखो भाविक यामध्ये सहभागी व्हायला महाकुंभमेळ्यात अमृत स्नानासाठी हजर होते. ह्या मेळ्यादरम्यात अनेक चांगल्या वाईट घटना देखील समोर आल्या. सुरुवातीला महाकुंभमधील आगीची घटना समोर आली होती, त्यातच आता शाही स्नानासाठी लावलेल्या हजेरीत चेंगराचेंगरी झाल्याची बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे. शाही स्नानाच्या दिवशी महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर कोट्यावधी लोकांची उपस्थिती अपेक्षितच होती. पण याच दिवशी एक दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे मध्यरात्री 1 वाजता अमृतस्नानाच्या तयारी साठी अनेक लोक एकाच वेळी जमली होती. परिणामी गर्दी प्रचंड वाढली. रात्री 2 च्या सुमारास गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी लावण्यात आलेले बॅरिकेट्स देखील तुटले आणि चेंगराचेंगरी घडली. या घटनेमध्ये ५० ते ८० भाविक जखमी झाले असून १० पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(Marathi News)
प्रयागराज महाकुंभ मेळ्यात आपत्कालीन परिस्थितींसाठी विविध प्रकारच्या सोयी-सुविधा सुसज्ज ठेवण्यात आल्या असून त्यात रुग्णवाहिकेची व्यवस्था देखील समाविष्ट आहे. परंतु, त्यात आज अजून एक दुर्दैवी घटना घडली आहे, ज्यात एका रुग्णवाहिकेलाच आग लागली. महाकुंभ मेळ्यात विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी अनेक रुग्णवाहिका आणि बचाव कार्याच्या साधनांची व्यवस्था केली गेली होती. परंतु आज चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अनेक भाविक जखमी झाले आहेत. याच दरम्यान, एका रुग्णवाहिकेच्या चालकाच्या केबिनमध्ये अचानक आग लागली. या आगीला विझविण्याचा प्रयत्न देखील मोठ्या प्रमाणात होतं असून अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली आहे, परंतु या आग लागलेल्या रुग्णवाहिकेत कोणी रुग्ण होते की नाही ? हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.(Kumbhmela)
या सर्व घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगेचच भाविकांना एक आवाहन केलं ,ते म्हणजे संगमावर जाण्याऐवजी गंगा किनाऱ्यावर असलेल्या इतर घाटांवर स्नान करण हे अधिक सुरक्षित असेल. त्यांनी भाविकांना प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आणि शांततेनं शाही स्नान करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच योगी आदित्यनाथ यांनी पुढे सांगितलं की, प्रशासनान विविध घाटांवर स्नानाची सुविधा निर्माण केली आहे, जिथ भाविक अतिशय शांततेत स्नान करू शकतात. (Kumbhmela)
============
हे देखील वाचा : Mauni Amavasya जाणून घ्या मौनी अमावस्येचे महत्व
============
कुंभ मेळ्यात अशी चेंगराचेंगरीची घटना पहिल्यांदाच घडली नव्हती. १९५४ सालीही प्रयागराजमध्ये अशीच घटना घडली होती, ज्यामध्ये ८०० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर २०१३ च्या कुंभ मेळ्यात अशाच घटनेमुळे ४२ लोकांचा जीव गेला होता. या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला.तसेच त्या परिस्थितीत, आखाडा परिषदेन मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नानाचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला असून रवींद्र पुरी यांच्या सांगण्यानुसार, आज कुठेही अमृत स्नान होणार नाही आणि आखाड्यांनी त्यांचीमिरवणुकीही मागे घेतली आहेत. परंतु आता सर्व परिस्थिती नियंत्रणात आल्यावर आता पुन्हा एकदा शाही स्नान सुरु करण्यात आलं आहे. हा ऐतिहासिक क्षण १४४ वर्षांनी पुन्हा आला होता परंतु या दुःखद घटनेमुळ सर्वांकडून आता शोक व्यक्त केला जात आहे.