मुंबईतील दादर येथील कबुतरखान्याचा विषय सध्या चांगलाच गाजत आहे. अनेक वर्षांपासून लाखो कबुतर हे या ठिकाणी त्यांच्या दाणा-पाणीसाठी येतात. त्यांना बघण्यासाठी बघ्यांची देखील मोठी गर्दी या परिसरात असते. दादरमधील अतिशय प्रसिद्ध ठिकाण म्हणून देखील कबूतखान्याचा उल्लेख केला जातो. मात्र कबुतरांच्या वावरामुळे अनेक गंभीर आरोग्यसंबंधित समस्या आणि आजार होत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने हा कबुतरखाना बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दादर परिसरातील कबुतरखाना बंद करण्यात आला आहे. मात्र आता यावरून अनेक वाद निर्माण झाले आहेत. (Kabutarkhana)
काही लोकं कबुतरखाना बंद करण्याच्या विरोधात असल्याने त्यांनी कबुतरखाना पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे. मात्र हा कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय ज्या गोष्टीमुळे घेतला गेला ती गोष्ट म्हणजे कबुतरांमुळे होणारे गंभीर आजार आणि इतर अनेक समस्या. मग नक्की या कबुतरांमुळे मनुष्याला कोणकोणते आजार होऊ शकतात हे आपण जाणून घेऊया. सोबतच कबुतरांबद्दल अधिक माहिती घेत ते पर्यावरणाच्या दृष्टीने का आवश्यक आहे, ते देखील पाहू. (Marathi News)
आधी आपण कबुतर या पक्ष्याची वैशिष्ट्ये पाहूया. कबुतर हा अतिशय बुद्धिमान पक्षी असल्याचे मानले जाते. असे म्हटले जाते की ते वादळ आणि भूकंप यांसारख्या कोणत्याही नैसर्गिक आपत्ती कबुतरांना त्यांच्या मजबूत आणि विलक्षण श्रवणशक्तीच्या जोरावर दूरवरूनच जाणवू शकतात. कबुतर थंड किंवा गरम कोणत्याही वातावारणात राहु शकतात. असे म्हणतात कबूतर कधीही रस्ता विसरत नाही त्याने जर ३ ते ४ हजार किलोमीटरचा प्रवास केला तर तो त्या रस्त्याने पुन्हा परतू शकतो. कबुतराचा उडण्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटर इतका असतो. शिवाय कबुतराची नजर अतिशय तीक्ष्ण असते. ते ५० किमी अंतरावरील वस्तू आरामात पाहू शकतात. (Todays Marathi Headline)
===================
हे देखील वाचा : Balochistan : बलुच आर्मीचा ट्रम्पंना इशारा !
===================
असे असले तरी या कबुतरांमुळे मनुष्याच्या आरोग्यास अनेक तोटे होतात. त्यांना अनेक मोठ्या आणि गंभीर आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शांतीचे प्रतीक अशी ओळख असलेले हे पांढरेशुभ्र कबुतर मानवी जीवनाच्या दृष्टीने खूपच त्रासदायक समजले जाते. कबुतरांमुळे माणसाला कोणकोणते आजार होऊ शकतात घ्या जाणून. (Marathi Headline)
कबुतराच्या विष्ठेमुळे मनुष्याला ६० हून अधिक गंभीर आजार होऊ शकतात. यापैकी सर्वात सामान्य आजार म्हणजे बर्ड फॅन्सियर्स लंग डिसीज, हिस्टो-प्लास्मोसिस (हिस्टोप्लास्मोसिस), क्रिप्टो-कोकोसिस (क्रिप्टोकोकोसिस) आणि सिटाकोसिस (सिटाकोसिस) सारखे आजार होऊ शकतात. बर्ड फॅन्सियर्स लंग डिसीज हा फुफ्फुसांमध्ये होणारा एक गंभीर संसर्ग आहे. जो कबुतराच्या विष्ठेमुळे किंवा पंखांच्या कणांमुळे होतो. कबुतराच्या विष्ठेमुळे बुरशीजन्य संसर्ग देखील होतो, ज्याला हिस्टो-प्लास्मोसिस म्हणतात. (Top Marathi News)
यामुळे, व्यक्तीला ताप, खोकला-सर्दी आणि रक्ताच्या समस्या होतात. क्रिप्टो-कोकोसिस हा देखील एक बुरशीजन्य संसर्ग आहे, ज्यामुळे त्वचेवर पुरळ आणि मुरुमे येतात. कबुतराच्या विष्ठेत असलेल्या बॅक्टेरियामुळे सिटाकोसिस (सिटाकोसिस) देखील होतो. यामध्ये, एखाद्या व्यक्तीला खोकला-सर्दी आणि ताप यासारख्या समस्या उद्भवू शकतात. कबुतरांच्या विष्ठेमध्ये जे जे घटक असतात त्यामुळे शरीर, फुप्फुस अॅलर्जिक रिअॅक्शन देतं. त्या आजाराचं नाव आहे हायपरसेन्सिटीव्हिटी न्यूमोनायटीस. हा खूप त्रासदायक आजार असून दीर्घ काळ चालणारा आजार आहे. तज्ञांच्या मते, कबुतरांमुळेही दमा होऊ शकतो. अशा परिस्थितीत, ज्यांची फुफ्फुसे आधीच कमकुवत आहेत त्यांना कबुतरांमुळे लवकर संसर्ग होऊ शकतो. (Latest Marathi News)
कबुतरांना आपल्या ज्योतिषशास्त्रात आणि वास्तूशास्त्रानुसार पक्ष्यांना दाणा-पाणी देणे शुभ मानले जाते. अनेक घरांमध्ये गच्चीवर किंवा बाल्कनीमध्ये कबुतरांसाठी, चिमण्यांसाठी दाणे टाकून ठेवतात. पक्ष्यांना दाणे टाकणे शुभ असून अशा व्यक्तीवर लक्ष्मी देवी प्रसन्न राहते. कबूतर अधूनमधून घरात-खिडकीत येऊन गुटर गूं करत असेल तर हा शुभ संकेत मानला जातो. कबुतराचे घरी गुटर गूं होणे हे संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कबूतर धान्य खाताना दिसले तर याचा अर्थ तुमच्या घरात धनाची वाढ होणार आहे. यामुळे कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि घरात सुख-शांती नांदते. (Top Trending News)
कबुतरांमुळे मनुष्याला जरी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असले तरी हेच कबुतर पर्यावरणाच्या दृष्टीने खूपच फायदेशीर ठरतात. कबुतरांमुळे पर्यावरणाला अनेक फायदे होतात. कबूतरं ही बियाणे पसरवण्याचे आणि विष्ठेद्वारे मातीची सुपीकता वाढवण्याचे काम करतात. तसेच, कबुतरांच्या विष्ठेचा वापर वैज्ञानिक संशोधनात होतो, कारण त्यात असलेले जीवाणू आणि बुरशी पर्यावरणातील बदलांचे सूचक ठरतात. (Top Stories)
===================
हे देखील वाचा : Area-51 : अखेर तो दिवस येणार एलियनसोबत युद्ध होणार…
===================
कबुतरं फळं आणि धान्य खातात. ते आपल्या विष्ठेद्वारे बिया एका ठिकाणाहून दुसरीकडे पसरवतात, ज्यामुळे नवीन वनस्पतींची वाढ होते. कबुतरांच्या विष्ठेमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक असतात. हे घटक मातीची सुपीकता वाढवतात आणि वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. कबुतरांच्या विष्ठेचा अभ्यास करून संशोधक वातावरणातील प्रदूषण पातळी आणि परिसंस्थेच्या आरोग्याचे निरीक्षण करू शकतात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics