कधीच उचकी न लागलेली व्यक्ती कोणीच नसेल. उचकी ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे अनेकदा कामात असताना, जेवताना, घरी, बाहेर कुठेही अचानक आपल्याला उचकी लागते. काही लोकांची उचकी लगेच थांबते, पण काहींची थांबत नाही. अशावेळी उचकी लागली लगेच घरातील मोठ्या लोकांचे आवाज कानावर पडतात, ‘कोणी तरी आठवत काढत असेल’, ‘जा लवकर पाणी पी आणि वर बघ’. हे सगळ्यांच्याच बाबीत बरीच वेळेस घडते. मात्र खरंच उचकी कोणी आठवण काढली मगच लागते का? की यामागे दुसरे काही कारण असते? आणि उचकी लागल्यानंतर ती थांबवायची कशी? जाणून घेऊया या आणि अजून काही प्रश्नांबद्दल. (HEalth)
उचकी का लागते ?
जेव्हा डायाफ्रामचे स्नायू अचानक आकुंचन वावतात तेव्हा आपल्याला उचकी यायला लागते. यावेळी फुप्फुसातील हवा बाहेर येते आणि अशावेळी होणारा आवाज म्हणजे उचकी. ही क्रिया घडत असताना आपण श्वास आत घेऊ शकत नाही म्हणून उचकी लागली की आपल्याला अस्वस्थत वाटते. उचकी येणे याचा संबंध आपल्या श्वासोच्छवासाशी असतो. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा आपल्या पचन किंवा श्वसन प्रणालीमध्ये एखादी समस्या उद्भवते त्यावेळेस उचकी येते. अतिशय जलदगतीने खाल्ल्यास किंवा काही प्यायल्यास अचानक उचकी येऊ शकते. श्वासोच्छवासाशी संबंधित असणारे स्नायू अचानक आंकुचन पावतात, त्यावेळेस व्होकल कॉर्ड्स बंद झाल्यानं ‘हिक’ असा आवाज ऐकू येतो. उचकी येणे ही गंभीर समस्या नाही; पण अनेकांना वारंवार उचक्या लागत असतील तर एकदा डॉक्टरांना नक्की भेटावे. (Marathi News)
उचक्या येण्यामागे अनेक प्रकारची कारणे असू शकतात. जसे की, भूकेपेक्षा जास्त जेवण करं, तिखट पदार्थ खाणं, घाईघाईने खाणं, अॅसिड रिफ्लक्स, गरमनंतर थंड खाणं, स्ट्रेस, सिगारेट ओढणे, पचनात गडबड, अस्वस्थता, ताण, अतिउत्साह, हवेच्या तापमानातील बदल, अपचन इत्यादी. काही केसेसमध्ये हे गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. (Todays Marathi Headline)
उचकी थांबवण्याचे घरगुती उपाय
> लिंबाचा आंबटपणा गळ्याच्या मज्जासंस्थेला उचकावतो आणि उचकी थांबते. लिंबाचा तुकडा चावून खा किंवा त्याचा थोडा रस प्या.
> मधातील नैसर्गिक एन्झाइम्स गळा आणि डायाफ्राम शांत करतात. एक चमचा मध कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने उचकी कमी होऊ शकते.
> २ वेलची पाण्यात उकळा आणि ते पाणी प्या. वेलचीचे हे पाणी देखील उचकी थांबवण्यासाठी खूप प्रभावी आहे.
> थोडीशी साखर जीभेवर ठेवून हळूहळू चोचल्याने मेंदूकडे जाणारे सिग्नल बदलतात आणि उचकी आपोआप बंद होते. (Latest Marathi News)
> उचकी बराच वेळ थांबत नसेल तर, आपला श्वास काही वेळासाठी रोखून धरा. त्यानंतर उचकी थांबू शकते. किंवा नाक घट्ट पकडून श्वास सोडा. यामुळे उचकी थांबते, कारण श्वासातून बाहेर जाणारा कार्बन डायऑक्साईड उचकी थांबवतो.
> थंड दही गळ्याच्या नसा शांत करते व उचकी दूर करते. दह्याला कॅल्शियमचा उत्तम स्रोतही समजले जाते. त्यामुळे उचकीसाठी दही खाणे देखील उत्तम पर्याय आहे. (Social Updates)
> हळूहळू एक ग्लास थंड पाणी प्यायल्याने डायाफ्राम शांत होतो आणि उचकीवर झटपट परिणाम होतो.
> एक ग्लास कोमट पाणी घ्या, त्यात काही पुदिन्याची पाने, लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ घाला. हे पाणी प्यायल्याने गॅसपासून आराम मिळून उचकी देखील थांबेल. (Top Sories)
=========
हे ही वाचा : Health : पावसाळ्यात सततचा सर्दी खोकला त्रास देतोय? मग करा ‘हे’ सोपे उपाय
Health : पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी कोणता आहार घ्यावा?
=========
> जीभ बाहेर काढा आणि थोडा वेळ तसेच राहा. यामुळे घशामधील मांसेपेशी ओढल्या जाईल आणि तुम्हाला बरं वाटेल.
> एक चमचा काळी मिरीची पावडर घ्यावी आणि ती हुंगावी. शिंक येईपर्यंत ही क्रिया करत राहायची आहे. शिंक आली की आपोआप उचकी थांबू शकते.
(टीप : कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics