Weight loss without gym : सध्याच्या बिघडलेल्या लाइफस्टाइलमुळे बहुतांशजणांना वजन वाढल्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. यामुळे वाढलेले वजन कमी करणे अधिक आव्हानात्मक होते. यासाठी खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. नियमित एक्सरसाइज न करता देखील वजन कमी होऊ शकते. जाणून घेऊया जिमशिवाय वाढत्या वजनावर कशापद्धतीने नियंत्रण मिळवू शकता याबद्दल सविस्तर…
डाएटकडे लक्ष द्या
वजन कमी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या डाएटकडे लक्ष द्या. अत्याधिक तेलकट किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन करणे टाळा. त्याएवजी हेल्दी पदार्थांचे सेवन करा. यामध्ये फळं आणि भाज्यांचा समावेश असू द्या. जेणेकरुन वजन कमी होण्यास मदत होईल.
साखर खाणे बंद करा
वजन कमी करण्यासाठी साखर आणि गोड पदार्थांचे सेवन करणे टाळावे. अत्याधिक गोड पदार्थांमुळे लठ्ठपणा वेगाने वाढला जाऊ शकतो. अशातच मधुमेहाची समस्या उद्भवू शकते. डाएटमधून साखर पूर्णपणे बंद वगळल्यास शरीरात काही बदल झाल्यासारखे दिसतात. साखरेएवजी गुळ किंवा फळांचे सेवन करू शकता.

Weight loss without gym
=======================================================================================================
हेही वाचा :
Homeopathy Day : जागतिक होमिओपॅथी दिनाची माहिती आणि इतिहास
Breast cancer : जाणून घ्या ब्रेस्ट कॅन्सरची माहिती आणि लक्षणं
=======================================================================================================
हलकी एक्सरराइज करा
हेल्दी डाएटनंतर वजन कमी करण्यासाठी काही हलकी एक्सरसाइज करू शकता. यासाठी घरच्याघरी स्ट्रेचिंग, स्किपिंग, स्क्वॉट्स, क्रंचेस, प्लँक आणि सायकलिंगसारख्या एक्सरसाइज करू शकता. काही दिवस एक्सरसाइज केल्यानंतर शरीर हलके झाल्यासारखे जाणवेल. आठवड्यातून पाच ते सहा वेळा एक्सरसाइज करणे चुकवू नका.
खूप पाणी प्या
वेगाने वजन कमी होण्यासाठी आणि डिहाइड्रेशनच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्या. यामुळे शरीर हाइड्रेट होते आणि शरीराला उर्जा मिळते. (Weight loss without gym)
रात्रीचे जेवण लवकर करा
जिममध्ये जाऊन वजन कमी करण्याएवजी लाइफस्टाइलमध्ये आणखी एक बदल असा करा की, रात्रीचे जेवण लवकर करा. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ लवकर पचले जातात. अशातच वजन कमी होण्यास मदत होते.