वजन कमी करण्यासाठी लोक विविध प्रकारचे वेट लॉस प्रोग्राम ते डाएटस वर्कआउट सारख्या गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यात सहभागी करतात. ऐवढेच नव्हे तर तुम्हाला कळले पाहिजे आपण वजन कमी करण्यासाठी ऐवढी जी मेहनत करत आहोत ती खरंच फिट राहण्यासाठी आहे की फक्त वजन नियंत्रणात राहण्यासाठी आहे? वजन कमी (Weight loss) करण्यामध्ये डाएटची फार महत्वाचे असतेच. पण याचा अर्थ असा नव्हे आपण ज्या गोष्टी खात आहोत त्या पूर्णपणे बंद केल्या पाहिजेत. डाएटमध्ये तुम्हाला अधिक तेलकट, पाकिट बंद पदार्थ खाता येत नाहीत. परंतु तुम्ही अत्याधिक प्रमाणात फळ, सलाड, मोड आलेली कडधान्य, भाज्या यांचा समावेश खाण्यापिण्यात केला पाहिजे.
परंतु काही लोकांना प्रश्न पडतो की, डाएट तर करु आपण मात्र नक्की काय खाल्ले पाहिजे. काही जणांना असे वाटते की, भात की चपाती या दोघांपैकी वजन कमी करण्यासाठी काय खाल्ले पाहिजे. तसेच काय खाऊ नये अशी ही द्विधा मनस्थितीत निर्माण होते. बहुतांश लोक वजन कमी (Weight loss) करताना पूर्णपणे भात किंवा चपाती बंद करतात. परंतु आरोग्याला पूर्णपणे पोषक तत्व मिळाली नाहीत तर तुम्ही तंदुरुस्त आणि फिट कसे रहाल. तर जाणून घेऊयात वजन कमी करताना आपण चपाती की भात या दोघांपैकी काय खाल्ले पाहिजे.
हे देखील वाचा- रात्रीच्या वेळी भूक लागत असल्यास ‘या’ गोष्टींनी करा कंट्रोल, वजन ही वाढणार नाही

हेल्थ अॅन्ड हेल्दियर मध्ये छापून आलेल्या एका रिपोर्ट्सनुसार चपाती आणि भात मध्ये असलेल्या पोष्टिक तत्वांच्या आधारावर अगदी सोप्प्या पद्धतीने डाएटसाठी काय खाणे उत्तम आहे जसे की,
-कॅलरीजच्या आधारावर भातात चपातीच्या तुलनेत अधिक कॅलरीज असतात.
-प्रोटीन आणि फॅट बद्दल बोलायचे झाल्यास चपाती आणि भात या दोघांच्या आधारावर अधिक फरक नाही
आहे.
-चपातीत फायबरचे प्रमाण हे भाताच्या तुलनेत चौपट आणि विटामिन A चे प्रमाण १६ पट अधिक असते.
-लोहन, कॅल्शिअम आणि B कंपलेक्स विटामिन चपातीत भाताच्या तुलनेत अधिक असतात.
-जर कार्बोहायड्रेट्स बद्दल बोलायचे झाल्यास, भातात हेल्थी कार्बोहाइड्रेट नसतात. याच्या सेवनाने रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण वाढते.
-तर चपातीत कंपलेक्स कार्बोहाइड्रेट्स असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि त्याच्या सेवनाने रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण एकदम वाढत नाही.
-कमी फाइबर असल्याच्या कारणास्तव भात खाल्ल्यानंतर ही पोट भरलेले वाटत नाही. याउलट कमी चपाती खाल्ल्याने पोट भरलेले वाटते. भाताच्या तुलनेत चपातीमुळे वजन कमी प्रमाणात वाढते.
तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही वरील काही गोष्टी लक्षात ठेवाच. पण या व्यतिरिक्त अधिक गोड पदार्थ, सोडा असलेले पदार्थ, अधिक मीठ असलेले पदार्थ किंवा अधिक दह्याचे सेवन करु नका. जेणेकरुन तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे आहे पण या गोष्टी खाल्ल्यास तुमचे वजन अधिकच वाढले जाईल.