Home » वेट लॅास करताना ‘ही’ चुक करणे नक्कीच टाळा

वेट लॅास करताना ‘ही’ चुक करणे नक्कीच टाळा

आजकाल वजन कमी करणे सर्वाधिक मुश्किल कामांपैकी एक आहे. वजन कमी करण्यासाठी लोक खुप मेहनत करतात. जिमममध्ये खुप तास वर्कआउट करून घाम गाळणे, स्ट्रिक्ट डाएट फॉलो केले जाते.

by Team Gajawaja
0 comment
weight loss mistakes
Share

आजकाल वजन कमी करणे सर्वाधिक मुश्किल कामांपैकी एक आहे. वजन कमी करण्यासाठी लोक खुप मेहनत करतात. जिमममध्ये खुप तास वर्कआउट करून घाम गाळणे, स्ट्रिक्ट डाएट फॉलो केले जाते. ऐवढी मेहनत करून सुद्धा काही लोकांचे वजन कमी होत नाही. दीर्घकाळ मेहनत करूनही हवे तसे वेट लॉस न झाल्याने निराशा हाती येते. खरंतर यामागे तुमची एक चुक जबाबदार आहे. ती कोणती हे आज आपण पाहणार आहोत.(Weight loss mistakes)

एक्सपर्ट्स असे सांगतात की, वजन कमी करण्यासाठी संपूर्ण आठवडा हेल्दी डाएट फॉलो केले जाते. पण विकेंडला जंक फूड मात्र आवर्जुन खाल्ले जाते. चीट मील म्हणजेच डाएट पासून चीटिंग करणे. यावेळी अधिक तेलकट पदार्थ, प्रोसेस्ड फूड, कार्ब्स आणि शुगरचे सेवन केले जाते. यामुळे तुमच्या मेहनतीवर पाणी फिरले जाते.

The New Rules of Cheating

कसे कराल चीट मीलचे सेवन?
-एक्सपर्ट्स असे म्हणतात की, आपल्या क्रेविंगला मॅनेज करण्यासाठी लहान-लहान पोर्शनमध्ये खा.
-जर तुम्ही स्वत:ला एखादे फूड खाण्यापासून दूर ठेवत नसाल तर आसपासच्या एखाद्या व्यक्तीला तुम्हाला रोखण्यास सांगा.
-ज्या दिवशी चीट मीलचे सेवन केल्यानंतर त्या दिवशी निश्चित रुपात हलके वॉक करावे .
-दिवसभरात एकदाच चीट मील घ्या . (Weight loss mistakes)
-फूड्स हळूहळू चावून खा.
-ज्या वेळी तुम्ही चीट मील खात असाल तेव्हा त्यावेळी कॅलरीचा इनकेट कमी करा.
-चीट मीलच्या दिवशी उपाशी राहू ना, त्यामुळे ओव्हरइटिंग तुम्ही करू शकता.
-चीट मील बद्दल आधीच प्लॅन करा, जर इंस्टेंट मेन्यू पाहून जर तुम्ही काही ऑर्डर करत असाल तर ओव्हरइटिंग होऊ शकते.


हेही वाचा- किचनमधील ‘हे’ फूड्स वाढवतात तुमचे वजन


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.