Weight Loss : वजन कमी करताना अनेकांना वाटतं की उपाशी राहणं किंवा फक्त उकडलेल्या गोष्टी खाणं हाच पर्याय आहे, पण प्रत्यक्षात असं नाही. योग्य पोषणमूल्ये असलेले हेल्दी स्नॅक्स तुमचं वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात आणि एकंदर आरोग्यही सुधारतात. महत्वाचं म्हणजे हे स्नॅक्स स्वादिष्ट असतात आणि शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा देतात. वजन कमी करताना जेव्हा जेव्हा हलकासा भूक लागतो, तेव्हा जड, तळलेले किंवा गोड पदार्थ खाण्याऐवजी हे 5 हेल्दी पर्याय निवडावेत.
भिजवलेली बदाम आणि अक्रोड – सकाळी उठल्यानंतर काही भिजवलेले बदाम आणि 2-3 अक्रोड खाल्ल्यास पचन सुधारते आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं. यामध्ये हेल्दी फॅट्स आणि फायबर्स असतात जे स्नॅक म्हणून परिपूर्ण ठरतात. हे वजन वाढवत नाहीत, उलट ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळे मेंदू कार्य आणि हार्मोनल बॅलन्स सुधारतो.
ग्रीन स्मूदी किंवा डिटॉक्स ड्रिंक – पालक, काकडी, आंबट सफरचंद, आल्याचा तुकडा आणि लिंबाचा रस एकत्र करून तयार केलेली ग्रीन स्मूदी वजन कमी करण्यासाठी आदर्श आहे. यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्स असतात जे पचनाला मदत करतात आणि चरबी जाळतात.

Weight Loss
भाजलेले चणे आणि फुटाणे – लो कॅलोरी आणि प्रोटीनयुक्त पर्याय हवा असेल तर भाजलेले चणे आणि थोडेसे फुटाणे एकत्र करून खाणं फायदेशीर ठरतं. हे स्नॅक्स लवकर पचन होतात, पोट भरल्यासारखं वाटतं आणि उर्जाही मिळते. वजन कमी करताना संध्याकाळच्या वेळेस हे सर्वोत्तम स्नॅक आहेत.
ग्रीक योगर्टसह बेरीज किंवा फळं – साखर न घातलेले ग्रीक योगर्ट हे प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. यामध्ये बेरीज, केळी, सफरचंद किंवा डाळिंब घालून खाल्ल्यास एक चविष्ट आणि हेल्दी स्नॅक तयार होतो. हे केवळ पचन सुधारत नाही, तर साखरेची अनाठायी इच्छा देखील कमी करते.(Weight Loss)
======================================================================================================
हेही वाचा :
Multani Mati : मुलतान मातीचे सौंदर्यवर्धक फायदे
Ice Apple : रानमेवा असलेल्या ताडगोळा खाण्याचे लाभ
======================================================================================================
अंकुरलेली मूग डाळ किंवा मिश्रित अंकुरित कडधान्य – अंकुरित मूग डाळ, हरभरा, मटकी यामध्ये प्रचंड प्रोटीन, फायबर, मिनरल्स असतात. यामध्ये टोमॅटो, कांदा, लिंबू, थोडासा काळा मीठ घालून खाल्ल्यास पौष्टिक आणि कमी कॅलोरी असलेला स्नॅक मिळतो. हे मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करते आणि चरबीचे प्रमाण घटवते.
हे सर्व स्नॅक्स सहज तयार होतात आणि दररोजच्या आहारात सवयीने घेतल्यास, उपाशी न राहता वजन कमी करता येते. मुख्यतः हे पदार्थ नैसर्गिक, प्रक्रिया न केलेले आणि पोषणाने भरलेले असल्याने वजन कमी करण्याचा प्रवास अधिक आरोग्यदायी बनतो.