आजकाल प्रत्येकाला हेल्दी आणि फिट रहायचे असते. परफेक्ट बॉडी हवी असेल तर लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांना हे माहिती नसते की, वय आणि उंचीनुसार वजन मेंनटेन करणे गरजेचे असते. यामुळे तुमचे शरीर हेल्दी राहते. त्याचसोबत तुम्ही काही आजारांपासून दूर राहता. काही लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात की, पुढे जाऊन त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच वयानुसार तुमचे किती असावे वजन हे जाणून घेणार आहोत. (Weight as per age)
वयानुसार ऐवढे असावे वजन
-नवजात बाळाचे वजन ३.३ किलोग्रॅम असावे. तर एका वर्षाच्या बाळाचे वजन जवळजवळ १० किलो असावे. या वजनामुळे मुलं हेल्दी राहतात.
-२ ते ५ वर्षातील मुलांचे वजन १२.५ किलोग्रॅम पर्यंत असावे. तर मुलीचे वजन ११.८ किलोग्रॅम असावे.
-वयानुसार मुलांचे सुद्धा वजन वाढले जाते. ६-८ वर्षाच्या मुलाचे वनज १४.१८.७ किलो असावे. तर मुलीचे वजन १४.१७ किलोग्रॅम असावे.
-९-११ वर्षातील मुलाचे वजन २८-३१ किलो आणि मुलीचे २८-३१ किलो दरम्यान असावे. तर १२-१४ वयोगटातील मुलाचे वजन ३२-३८ किलो तर मुलीचे ३२-३६ किलो असावे.
-१५-२० वयोगटातील मुलाचे वजन ४०-५० किलो आणि मुलीचे वजन ४५ किलो असावे. २१-३० वयातील मुलाचे वजन ६०-७० आणि मुलीचे वजन ५०-६० दरम्यान असावे.
-३१-४० वयोगटातील पुरूषाचे वजन ५९-७५ किलो, महिलेचे वजन ६०-६५ किलो असावे. ४१-५० दरम्यान पुरुषाचे वजन ६०-७२ किलो आणि महिलेचे वजन ५९-६१ किलो.
-५१-६० वर्षातील पुरुषाचे वजन ६०-७० किलो आणि महिलेचे वजन ५९-६३ किलो असावे.
अशा प्रकारे करा वजन कमी
जर तुमचे वजन वयानुसार अधिक असेल तर आतापासूनच ते नियंत्रणात ठेण्यास सुरवात करा. काही घरगुती उपायांनी तुम्ही वजन कमी करू शकता.
-लिंबू पाणी प्या
व्हिटॅमिन सी शरिरातील अतिरिक्त फॅट्स कमी करण्यात फायदेशीर ठरते. लिंबूत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. तुम्ही लिंबू पाण्यात मध ही टाकू शकता. (Weight as per age)
-ग्रीन टी
ग्रीन टी शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते. वजन कमी करण्यासाठी लोक ग्रीन टी चे सेवन करतात. वजन कमी करायचे असेल तर तुम्ही दररोज एक कप ग्रीन टी चे सेवन करू शकता.
हेही वाचा- ब्रोटॉक्स ट्रिटमेंट आणि बोटॉक्स मध्ये ‘हा’ आहे फरक
-हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करा
वजन कमी करण्यासाठी हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करणे गरेजेचे आहे. तुम्ही तुमच्या डाएट ते झोपे पर्यंतच्या सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.