Home » ‘या’ राशींना होणार वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ

‘या’ राशींना होणार वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope
Share

हल्ली ज्योतिषशास्त्रावर विश्वास न ठेवता प्रत्येकजण आपल्या कर्मावर विश्वास ठेवतो. पण आपण हमखास पेपर हातात घेतल्यावर न चुकता राशिभविष्य वाचतो… आपला दिवस कसा असेल, आपल्यासमोर कोणती संकट येतील,भाकीत काय असतील.. असे बरेच प्रश्न आपल्या मनात येत असतात आणि आपण नकळतपणे राशिभविष्य पाहतो आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो. चला तर मग पाहूया या आठवड्याचे राशिभविष्य….(Weekly Horoscope 19 Dec to 25 Dec)

मेष – राशी स्वामी मंगळाचे धनस्थानातून, चंद्राचे सप्तमस्थानातून तर पंचमेश रवीचे भाग्यस्थानातून भ्रमण होत आहे. अतिशय हुशारीने मोठे व्यावसायिक व्यवहार केले जातील. आपला आत्मविश्वास वाढेल. आपल्या नियोजित कामातील अडीअडचणींवर मोठ्या शिताफीने मात कराल. भागीदारी व्यवसायातून नवीन कार्यारंभ केले जातील. आपल्या एखाद्या रेंगाळणाऱ्या कामात जीवनसाथीकडून बहुमूल्य सल्ला मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होतील. आपला निरुत्साह, मरगळ जाऊन शारीरिक उत्साह आणि उत्साहीवृत्ती आपले व्यक्तिमत्व उजळून टाकेल. भाग्यातील रवी, बुध, शुक्र आपल्या अनुकूल गुणात भर घालतील. अंगच्या नैसर्गिक कलागुणांना चांगला भाव मिळेल. अभिनय कलाक्षेत्रात आपल्याला चांगलेे प्राविण्य मिळेल. कष्टाचे चीज होईल.

शुभ दिनांक – 21 ते 23

वृषभ – सप्तमेश मंगळाचे आपल्या राशीतून होणारे भ्रमण आपणास उत्साही ठेवणारे राहील, तर षष्ठस्थानातून चंद्राचे होणारे भ्रमण मातुल घराण्याची सलोख्याचे संबंध प्रस्थापित करेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. नोकरी व्यवसायात सतत कार्यरत राहाल. कामाचा व्याप वाढेल. भागीदारी व्यवसायातून नवीन प्रकल्प हाती घेतले जातील. चांगली धनप्राप्ती होईल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. विवाहेच्छूक तरुणांचे परिचयोत्तर विवाह ठरतील. अष्टवास्थानातील रवी बुध शुक्र अनपेक्षित धनप्राप्ती देतील. लेखक, साहित्यिकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. विरोधकांच्या कारवायांवर मोठ्या शिताफिने मात कराल.

शुभ दिनांक – 24, 25.

मिथुन – पंचमस्थानातील केतूवरून चंद्राचे भ्रमणण होत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळवण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतील. व्यावसायिक प्रदर्शनातून चांगली आवक होईल. नशिबाची चांगली साथ मिळेल. नोकरी व्यवसायात आपले ध्येय गाठताना हितशत्रूंच्या कारवायांना सामोरे जावे लागेल. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. सप्तमस्थानातील रवी, बुध, शुक्रामुळे जोडीदाराचे वर्चस्व राहील. कामानिमित्त प्रवास घडतील. विवाहेच्छूक तरुणांना मनापासून जोडीदार मिळेल. आपल्या अंगभूत कलाआपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. आपल्या आवडते छंद जोपासाल. नवपरिणींना गोड बातमीची चाहूल लागेल.

शुभ दिनांक – 19 ते 21

कर्क – आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला आप्तस्वकियांच्या गाठीभेटी होतील. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. शुभकार्यात सहभागी व्हाल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्याल. व्यावसायिक भाग्यबीजे पेरली जातील. स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहाल. संततीच्या प्रश्नांवर मार्ग निघेल. व्यवसायात पूर्वी मिळालेल्या ऑर्डर्समध्ये चांगली वाढ झाल्यामुळे मानसिक समाधान लाभेल. भागीदारी व्यवसायातून जुनी येणी वसूल होतील.या आठवड्यातील ग्रहमान आपणास अतिशय अनुकूल फलदायी राहील.

शुभ दिनांक – 21, 22

सिंह – दशमस्थानातून मंगळाचे, पराक्रम स्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे तर पंचमस्थानात रवी, बुध आणि शुक्र असे अतिशय अनुकूल ग्रहमान आपणास या आठवड्यात लाभले आहे. आपल्या कर्तृत्वाला उजाळा मिळणाऱ्या घटना घडतील. आपले आवडते कला छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. मित्र परिवाराबरोबर सहलीचे आयोजन कराल. सामाजिक पतप्रतिष्ठाा उंचावेल. संघटना चातुर्य दिसून येईल. आत्मविश्वास आणि मनोबल यांच्या जोरावर मोठी बाजी माराल. सहकाऱ्यांचे साहाय्य लाभेल. कामाच्या विस्ताराचा ध्यास घ्याल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून चांगले यश लाभेल. उत्तरार्धात प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

शुभ दिनांक – 23 ते 25

कन्या – आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून मंगळाचे, धनस्थानातून चंद्राचे तर सुखस्थानातून रवी, बुध आणि शुक्राचे भ्रमण होत आहे. कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल. आपल्या वैयक्तिक उत्कर्षामुळे मानसिक समाधान लाभेल. घरातील वातावरण आनंदी उत्साही राहील. सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग कलाक्षेत्रातून चांगला नावलौकिक मिळेल. सहलीत सहभागी व्हाल. भावंडांचे सहकार्य लाभेल. नवीन वाहन, वास्तू खरेदी केली जाईल. गृह सुशोभीकरणासाठी शोभेच्या वस्तू खरेदी कराल. बड्या व्यक्तींचे घराला पाय लागतील. कौटुंबिक शुभ समारंभात सहभागी व्हाल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल.

शुभ दिनांक – 21, 22.

तूळ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्याच राशीतून दशमेश चंद्राचे भ्रमण होत आहे. व्यवसाय उद्योगातील जुनी आणि वसूल होतील. अनेकांशी संवाद साधाल. जोडीदाराकडून अथवा भागीदारी व्यवसायातून लाभ होतील. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होतील. भावंडांबरोबर वेळ मजेत जाईल. भावंडांची गुजगोष्टी कराल, त्यांचा एखादा सल्ला लाख मोलाचा ठरणार आहे आणि त्याचे अंमलबजावणी करणे हितकारक राहील. आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षाच्या जोरावर मोठी मजल माराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आपली पतप्रतिष्ठा उंचावेल. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या सहकार्यामुळे एखादे रेंगाळलेले काम मार्गी लागेल.

शुभ दिनांक – 24, 25

वृश्चिक – व्ययस्थानातून केतूवरून होणारे चंद्राचे भ्रमण अध्यात्मिक क्षेत्रात उन्नती दर्शवणारे राहील. धार्मिक शुभ समारंभात सक्रिय सहभागी घ्याल. व्यवसाय उद्योगात आपल्यावर मोठ्या जबाबदाऱ्या पडणार आहेत. कामानिमित्त परदेश प्रवास घडतील. नवीन ओळखी होतील. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी लाभेल. धनस्थानातून रवी, बुध, शुक्राचे होणारे भ्रमण आपली आर्थिक बाजू भक्कम करणारे राहील. जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. कलाक्षेत्रातून चांगला नावलौकिक मिळेल. अनपेक्षित पणे यशोशिखरावर घेतलेली भरारी सुखावून जाईल. उत्तरार्धात आप्त स्वकियांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल.

शुभ दिनांक – 23, 24

धनु – रवी, बुध, शुक्राचे आपल्या राशीतून होणारे भ्रमण आपल्या कर्तृत्वाला उजाळा देणारे राहील. आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा वाढेल. नवीन गुंतवणूक करताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. गायक, कवी, कलाकार यांना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. समाजात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. आजवर रेंगाळलेले काम प्रतिष्ठित व्यक्तीच्या सहकार्याने पूर्णत्वास जाईल. तसेच गोड बोलून आपले कार्य साधाल. उंची वस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल. या आठवड्यातील राशीपालट आणि लाभलेल्या योग्य ग्रहस्थितीमुळे वैयक्तिक उत्कर्ष साधता येईल.

शुभ दिनांक – 22, 23

मकर – कर्मस्थानातून केतूवरून चंद्राचे होणारे भ्रमण नोकरी व्यवसाय स्पर्धक निर्माण करणारे राहील. आपली तत्वे सोडू नका. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. हितशत्रूंच्या कारवायांवर विजय मिळवाल. आपल्या कर्तृत्वाला चांगला भाव मिळेल. व्यवसाय उद्योगात भरपूर काम मिळाल्याने आपला आत्मविश्वास दुणावेल व त्याचबरोबर कामालाही गती येईल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहाल. संतती संबंधीच्या प्रश्नांवर मार्ग मिळेल. उंची वस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल. सहलीत सहभागी व्हाल. मन स्वस्थ लाभेल.

शुभ दिनांक – 21 ते 23

कुंभ – आपल्या राशीच्या भाग्यश्रीतील केतूवरून चंद्राचेे होणारे भ्रमण अध्यात्मिक प्रगती करणारे राहील. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. कामानिमित्त प्रवास घडतील परंतु प्रवासात अडचणी जाणवण्याची शक्यता राहते. आपले खिसा पाकीट, मौल्यवान वस्तू सांभाळा. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. हातून दानधर्म होईल. तरुणांच्या कौशल्याला चांगल्यााव मिळेल. आपले छंद जोपासण्यासाठी वेळ द्याल. हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागेल. महत्त्वाचे निर्णय हितचिंतकांच्या सल्ल्याने घेतल्यास निश्चितच फायदा होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश लाभेल. सरकारी कामे मार्गी लागतील. आपली इच्छापूर्ती होईल.

शुभ दिनांक – 23, 24

मीन – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या अष्टमस्थानातील केतू वरून चंद्राचे भ्रमण होत आहे. अनोळखी व्यक्तीशी संवाद साधणे टाळावे. प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा. धार्मिक स्थळांना भेटी दिल्या जातील. धार्मिक ओढा वाढेल. कामानिमित्त परदेश प्रवास घडतील. कर्म स्थानातून होणारे रवी, बुध, शुक्राचे भ्रमण आपल्या उत्कर्षास अनुकूल फलदायी ठरेल. नोकरीत बढती बदलीचे योग येतील. वरिष्ठांचे मर्जी संपादन कराल. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. मिष्टान्नना भोजनाचे योग येतील. सांस्कृतिक कार्यक्रमातून नावलौकिक मिळेल. आपले मनोबल वाढेल.

शुभ दिनांक – 21, 22

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.