Home » ‘या’ राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळणार

‘या’ राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळणार

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope
Share

ज्योतिषशास्त्रात ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आपली भविष्यवाणी ठरत असते. तसच ‘मेष’ राशीच्या दशमस्थानातून रवी आणि चंद्राचे भ्रमण होणार आहे. याचा फायदा नोकरी व्यवसायावर फलदायी ठरणार आहे. असेच या आठवड्यात इतर राशींची भविष्यवाणी काय असेल हे जाणून घेणार आहोत. (Weekly Horoscope 23 Jan to 29 Jan)

मेष – राशीच्या दशमस्थानातून रवी आणि चंद्राचे होणारे भ्रमण आपणास नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने शुभ फलदायी राहील. तरुणांना नोकरीच्या चांगल्या संधी लाभतील. आपण केलेल्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. मित्र परिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळेल. कवी, कलाकार, चित्रकारांना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीची पूर्तता झाल्यामुळे हाती पैसा येईल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. सामाजिक कार्यातून नवनवीन उपक्रम राबवाल.

शुभ दिनांक – 23 ते 25

वृषभ – राशीतील मंगळ व भाग्यस्थानातून होणारे रवि-चंद्राचे भ्रमण आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी देणारी राहील. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल, पतप्रतिष्ठा उंचावेल. नोकरीत बढती बदलीचे योग संभवतात. कामानिमित्त प्रवास घडतील. सहलीचे आयोजन केले जाईल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. दशमातील शनि, शुक्र व चंद्र कलाकारांना प्रसिद्धीच्या झोतात आणण्यास पूरक ठरतील. उधारी उसनवारी वसूल होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात कामानिमित्त प्रवास घडतील.

शुभ दिनांक – 25 ते 27

मिथुन – राशीस्वामी बुधाचे सप्तमस्थानातून तर रवि, चंद्राचे अष्टमस्थानातून भ्रमण होत आहे. भाग्यस्थानातील शुक्र आणि शनीचे भ्रमण आपणास शुभ फलदायी ठरेल. भावंडांना सहकार्य करावे लागेल. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होतील. आरोग्याच्या जुन्या तक्रारींचा त्रास होऊ शकतो. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. हीतशत्रूंच्या कारवायांना सामोरे जावे लागेल, परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सतत आपण कार्यरत राहिला तर आपले ध्येय गाठू शकाल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश लाभेल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला भाव मिळेल. कवी, कलाकारांना त्यांच्या क्षेत्रात पुरस्कार मिळतील.

शुभ दिनांक – 25 ते 27

कर्क – आपल्या राशीच्या सप्तमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण जोडीदाराला उत्कर्ष करणारे राहील. भागीदारी व्यवसायातून नवीन कार्यारंभ केले जातील. नवीन मोठ्या संधी चालून येतील. महत्त्वाचे निर्णय घेताना योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. तरुणांच्या कौशल्याला योग्य न्याय मिळेल. जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. अचानक धनप्राप्ती होईल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात सतत कार्यरत राहाल. सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. व्यावसायिक प्रदर्शनातून चांगली आवक होईल. नशिबाची चांगली साथ मिळेल. प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल.

शुभ दिनांक – 28, 29.

सिंह – धनेश बुधाचे पंचमस्थानातून तर षष्ठस्थानातून रवी, चंद्राचे व सप्तमस्थानातून शनी, शुक्राचे भ्रमण होत आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून चांगले यश लाभेल. मित्र परिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. नोकरीत भरती बदलीचे योग संभवतात. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. विवाहेच्छूक तरुणांचे परिचयोत्तर विवाह ठरतील. भागीदारी व्यवसायातून चांगला वित्तलाभ होईल. महत्त्वाची कामे लावण्यासाठी प्रवास घडून येतील. तीर्थस्थळांना भेटी द्याल. अध्यात्मिक प्रगती होईल. कौटुंबिक शुभ समारंभात सहभागी व्हाल.

शुभ दिनांक – 28, 29.

कन्या – राशीच्या पंचमस्थानातून रवीवरून चंद्राचेे भ्रमण होत आहे, तर राशी स्वामी बुधाचे सुखस्थानातून भ्रमण होत आहे. कुटुंबासाठी वेळ द्याल. घरातील सुख सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने नवीन खरेदी केली जाईल. लेखक, साहित्यिकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. सामाजिक कार्यात विशेष रूची वाढेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. नोकरीत स्त्री अधिकारी वर्गाकडून सहकार्य लाभेल. विवाहेइच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे.

शुभ दिनांक – 25 ते 27

तूळ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या सुखस्थानातून रविचंद्राचे होणारे भ्रमण मनस्वास्थ्य देणारे राहील. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. लघुउद्योग अथवा गृह उद्योगातून नवीन कार्यारंभ कराल. आईच्या प्रकृतीची काळजी वाटेल. पंचमातील शुक्र-शनी आपल्या वैयक्तिक उत्कर्षास पूरक ठरतील. संशोधनपर अभ्यासक्रमातून यश लाभेल. कवी, कलाकार, चित्रकारांना चांगला नावलौकिक लाभेल. आपल्या आवडते छंद जोपासण्यासाठी वेळेता येईल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. सहलीत सहभागी व्हाल. धार्मिक स्थळांना भेटी दिल्या जातील.

शुभ दिनांक – 24, 25

वृश्चिक – राशीच्या पराक्रम स्थानातून रविचंद्राचे होणारे भ्रमण आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी देणारे राहील. धाडसी निर्णय घेतले जातील. भावंडसौख्य लाभेल. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील. नवीन वाहन वास्तूचे योग येतील. अथवा गृह सुशोभीकरणासाठी आकर्षक, शोभेच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. घरातील वातावरण आनंदी उत्साही राहील. मातृसौख्य लाभेल. कुटुंबातील सदस्यांसंबंधित सुवार्ता कानी येतील. धार्मिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्याल. नोकरी आपल्या मतांचा आदर केला जाईल.

शुभ दिनांक – 23

धनु – राशीतील बुधामुळे आपल्या संभाषण चतुर्याच्या जोरावर महत्त्वाची कामे करून घ्याल. कुटुंबीयांवर आपली मते लागू नका नाहीतर वादंग होऊ शकतात‌. बड्या व्यक्तींच्या सहकार्याने एखादे रेंगाळलेले काम मार्गी लागेल. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिक प्रदर्शनातून अर्थप्राप्ती होईल. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना स्थान बदल करावा लागेल. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना चांगली संधी लाभेल. आपल्या मेहनतीला योग्य न्याय मिळेल.

शुभ दिनांक – 25, 26

मकर – आपल्या राशीतून होणारे रविचंद्राचे भ्रमण प्रकृतीच्या तक्रारी दूर करणारे राहील. धनेश शनी व दशमेश शुक्र यांची धनस्थानात होणारी युती आर्थिक भरभराट करणारी राहील. जुनी येणी वसूल होतील. घरात शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात नावलौकिक वाढेल. आपले आवडते छंद जोपासल. प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. नशिबाची चांगली साथ मिळेल.

शुभ दिनांक – 23, 24

कुंभ – साडेसाती जरी सुरू असली तरी राशीत होणारा राशीत होणारा शशनामक योग आपल्याला शुभ फळे देणारा राहील. शुक्र शनीची होणारी युती आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव देणारी राहील. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. आठवड्याच्या सुरुवातीलाच कामानिमित्त प्रवास घडणार आहेत. धनस्थानातील धनेश गुरु आपली आवक वाढवणारा राहील. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. व्यवसाय उद्योगात नवनवीन कल्पना आकार घेतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. उत्तरार्धात परदेशस्थ भावनांची सुसंवाद साधाल.

शुभ दिनांक – 27, 29

मीन – आपल्या राशीच्या लाभस्थानातून आठवड्याच्या सुरुवातीला रविचंद्राचे भ्रमण होत आहे. आजवर रेंगाळलेली सरकारी कामे मार्गी लागतील. महत्त्वाच्या कामात मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. उंचीवस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल‌. सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. नवनवीन कल्पना आकार घेतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी चालून येतील. स्वकृतृत्वावर महत्त्वाचे निर्णय घेऊन यशस्वीपणेे पार पाडाल. व्यवसाय उद्योगात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात यशस्वी व्हाल.

शुभ दिनांक – 25 ते 27

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.