सध्या मुलांच्या सुट्टीचा काळ सुरु झाला आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन बनत असतील. मुलांना जरी सुट्टी लागली असली तरी पालकांना मात्र ऑफिसमधून सुट्टी नाही. त्यामुळे लांब कुठे तरी न जाता विकेंडला दोन दिवसांसाठी जाता येईल असे जवळचे मात्र अतिशय चांगले पाहण्याजोगे ठिकाण कोणते यावर अनेक लोकं रिसर्च करत असतील. माथेरान, लोणावळा, महाबळेश्वर आदी तीच तीच ठिकाणं पाहून जर
तुम्हाला कंटाळा आला असेल. तर आज आम्ही तुम्हाला वीकेंडला फिरण्यासाठी अतिशय सुंदर आणि आकर्षक एक ठिकाण सांगणार आहोत. जे पाहून नक्कीच तुमची सुट्टी आणि तुमचा वेळ सत्कारणी लागेल. (Gondeshwar Temple)
मंदिरांचे शहर म्हणून सर्वात आधी नाव येते ते नाशिकचे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शहरात अनेक जुनी आणि नवीन मंदिर आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आज आम्ही जे ठिकाण सांगणार आहोत ते नाशिक शहरामधले नाही तर जिल्ह्यातले आहे. हो, नाशिक जिल्ह्यात असलेल्या सिन्नर तालुक्यातील गोंदेश्वर मंदिराबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (Marathi Top News)
तसे पाहिले तर महाराष्ट्रात हजारो वर्ष जुनी असंख्य मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिराला आपला एक वेगळा इतिहास आणि महत्व आहे. याच मंदिरांमध्ये अनेक मंदिरं ही शंकराची देखील आहेत. त्या प्रत्येक शिवमंदिराची वेगळी ओळख देखील आहे. असे एक शंकराचे अतिशय जुने, हेमाडपंथी मंदिर म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील श्री गोंदेश्वर महादेव मंदिर. फिरण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण असलेल्या या मंदिराबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. (Social News)
=========
हे देखील वाचा : Dr. Ambedkar : भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती
==========
नाशिकपासून ३५ किलोमीटरवर हे गोंदेश्वर महादेव मंदिर आहे. सध्या सोशल मीडियावर हे मंदिर कमालीचे गाजताना दिसत आहे. व्हिडिओ, रिल्सच्या माध्यमातून या मंदिराबद्दल लोकांना आज माहिती होताना दिसत आहे. सोशल मीडियामुळे हे मंदिर कमालीचे प्रकाशझोतात आले आहे. यादव काळातील हे मंदिर कायमच नाशिकच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे. हे मंदिर इ. स. ११६० साली बांधले असावे, असा अंदाज इतिहासकार लावतात. सुमारे आठशे वर्षांपूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचे शासन होते. त्याच काळात हे तयार केले असावे. या राजाच्या नावावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर अन् पुढे गोंदेश्वर पडले असावे असे सांगितले जाते. (Marathi Latest News)
हे एकच मंदिर नसून, शिवपंचायतन स्वरूपात असणारा हा पाच मंदिरांचा समूह आहे. अर्थात हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असून, त्याला शैवपंचायतन असे म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्ये असून याच मंदिराच्या सभोवती चार उपदिशांना पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची मंदिरं आहेत. सिन्नर येथील हे गोंदेश्वर मंदिर हे मंदिर पुरातन भूमिज स्थापत्य बांधकामाचा उत्तम नमुना आहे. (Marathi News)
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून दक्षिण आणि उत्तर दिशेलाही या मंदिराला प्रवेशद्वार देण्यात आले आहे. या मंदिराची संरचना स्वर्गमंडप, नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी असून गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराच्या पटईचे शिखर अतिशय आकर्षक असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंड आहे. मंदिराला विस्तृत आवार आहे. या मंदिराच्या गाभार्यावर नगारा पद्धतीचे शिखर आहे. (Marathi Trending News)
तर गोंदेश्वर मंदिराच्या सभामंडपातील स्तंभ विविध प्रकारच्या नक्षीने सजवण्यात आले आहेत. स्तंभांवर आणि सभामंडपाच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व आणि अप्सरा तसेच रामायण आणि पौराणिक प्रसंग कोरण्यात आले आहेत. मंदिरातील शिल्पकृती त्रिमिती पद्धतीची आहे. परावर्तित प्रकाश आणि सावल्यांमुळे, ती अधिकच उठावदार दिसतात. मुख्य मंदिरासमोर नंदी आहे. मंदिराच्या बांधकामासाठी त्या काळात दोन लाख रुपये खर्च आला होता असे अभ्यासक सांगतात. (Most Interested Story)
या गोंदेश्वर मंदिराचे बांधकाम गवळी राजकुमार राजगोविंद यांनी केलं आहे. दख्खन पठारावर बांधलेली मंदिरे ही साधारण काळ्या पाषाणातील असतात. पण या मंदिराचे एक आश्चर्य म्हणजे हे मंदिर गुलाबी व्हेसिक्युलर खडकांपासून बनवलेले आहे. या मुळे मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झाला आहे. यावर कोरीव काम करणे हे देखील अवघड असते. तरीही यावर अप्रतिम कलाकुसर केली आहे.
=========
हे देखील वाचा : IPL 2025 : प्रत्येक डॉट बॉल ऐवजी झाडाचं चित्र का?
==========
महानुभाव पंथाचे संस्थापक असलेले चक्रधर स्वामी जेव्हा सिन्नरला आले, तेव्हा येथे यादवांची राजवट होती. येतेच चक्रधर स्वामींनी दहा महिने वास्तव केल्याची नोंद आपल्याला महानुभव ग्रंथात सापडते. या मंदिरानंतर तुम्ही इथून जवळच असलेल्या गारगोटी संग्रहालयाला देखील भेट देऊ शकता. गारगोटी संग्रहालयात पृथ्वीरचनेदरम्यान घडलेल्या अनेक नैसर्गिक उलथापालथीतून आणि अग्निजन्य खडकांतून तयार झालेल्या विविधरंगी नैसर्गिक गारगोटी, झिओलाईट्स, अनेकविध स्फटिक, खनिजे यांचा खजिना संग्रहित केलेला आहे. अशा पद्धतीचे हे भारतातील एकमेव संग्रहालय आहे. शिवाय इथे एक प्राचीन ऐश्वर्येश्वर मंदिर सुद्धा आहे. हे मंदिर देखील अतिशय सुंदर आहे. (Top News)