Water Fasting : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात स्वत:साठी प्रत्येकाकडे वेळ नसतो. यामुळेच दैनंदिन आयुष्यात आरोग्यासंबंधित काही समस्यांचा सामना करावा लागते. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, तुमच्या डाएटमध्ये महत्त्वाच्या पोषण तत्त्वयुक्त पदार्थांचा समावेश असणे अत्यंत गरजेचे असते. यामुळे तुम्ही स्वत:च्या आरोग्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर वेगवेगळे आजार मागे लागू शकतात. सध्या बहुतांशजण लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करत आहेत. आजकाल लोक वजन कमी करण्यासाठी वॉटर फास्टिंग फॉलो करतात. या नव्या वेट लॉस ट्रेण्डमुळे फॅट बर्न होतात. जाणून घेऊया याबद्दल अधिक…
वॉटर फास्टिंग म्हणजे काय?
वॉटर फास्टिंगमध्ये काहीही खाल्ले जात नाही. केवळ पाणी प्यायले जाते. हैराण करणारी गोष्ट अशी की, हे फास्टिंग 24 ते 72 तास सुरू ठेवू शकता. या फास्टिंगमुळे वजन कमी होण्यास फार मदत होते. याशिवाय तुमचे संपूर्ण शरीर डिटॉक्स होण्यासह शरिरातील फॅट्स कमी होतात.
कोलेस्ट्रॉल कमी होतात
जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने पाणी पिण्यास सुरुवात करता तेव्हा शरिरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होऊ लागतो. वाढलेला कोलेस्ट्रॉल हृदयाचे आरोग्य आणि स्ट्रोकचे कारण ठरू शकतो. अशातच वॉटर फास्टिंग फॉलो केल्याने तुमच्यामधील कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित राहू शकतो.
इंन्सुलिन वाढणे
तुम्ही अत्याधिक पाणी प्यायल्याने शरिरात इंन्सुलिन सेंसिटिव्हिटी देखील वाढली जाते. यामुळे इंन्सुलिन व्यवस्थितीत काम करते. याच कारणास्तव तुमचे ब्लड प्रेशन नॉर्मल राहते आणि लगेच कमी देखील होत नाही. (Water Fasting)
नुकसान काय होते?
वॉटर फास्टिंगमध्ये तुम्ही फक्त पाण्यावर अलंबून असतात. यादरम्यान कोणतेही पदार्थ खात नाही. यामुळे तुमच्या शरिरात अधिक उर्जा नसल्याने तुम्हाला थकवा जाणवू शकतो. अशा स्थितीत शरिरात फॅट्स वाढलेही जाऊ शकतात. वॉटर फास्टिंगवेळी तुमच्या शरिरातील इलेक्ट्रोलाइट्समध्ये बदल होऊ लागतो.
(टीप : या लेखातील माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘kalakrutimedia.com’ याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)