सम्राट विक्रमादित्य (Vikramaditya) यांनी इ.स.पूर्व 57 मध्ये विक्रम संवत सुरू केले. शकांचा पराभव करुन या पराक्रमी सम्राटानं हिंदू साम्राज्याची पतका सर्वदूर फडकवली. सम्राट विक्रमादित्याच्या साम्राज्याने भारतीय उपखंडाचा मोठा भाग व्यापला होता. पश्चिमेला सध्याच्या सौदी अरेबियापासून पूर्वेला सध्याच्या चीनपर्यंत त्याचे साम्राज्य होते. विक्रमादित्याची (Vikramaditya) राजधानी मध्यप्रदेशमधील उज्जैन नगरी होती. विक्रमादित्यने (Vikramaditya) रोमन राजा ज्युलियस सीझरचाही पराभव केला होता. राजा विक्रमादित्यने भारताच्या चारही दिशांना मोहीम राबवून भारताला परकीय आणि अत्याचारी राजांपासून मुक्त केले. अनेक मंदिरांची उभारणी केली. हिंदू धर्माला नवतेज देणा-या या सम्राटाचा विक्रम अद्यापही नव्या पिढीला समजलेला नाही. त्यासाठीच जो जिंकला तो सिंकदर हा वाक्प्रचार बदलत आता जो जिंकला तो विक्रमादित्य असा करण्यात येणार आहे. उज्जैनमधील एका विद्यापीठापासून ही सुरुवात करण्यात येणार आहे. उज्जैन नगरीला ज्या सम्राटानं उभारलं, त्या सम्राटाची विक्रम नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे विद्यापीठाच्या शिक्षकांनी सांगितले. यातून आपला खरा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे.
आपल्याकडे काही वाक्य प्रमाण झाली आहेत, त्यापैकीच जो जिता वही सिकंदर हे एक आहे. यावर चित्रपटही तयार झाले आहेत. पण सिंकदरपेक्षा आपल्या भारतवर्षात अनेक पराक्रमी राजा होऊन गेले आहेत. यात सर्वात वरच्या क्रमांकावर नाव आहे ते सम्राट विक्रमादित्य यांचे. आता विक्रमादित्य यांच्या नावावर असलेल्या मध्यप्रदेशमधील उज्जैनच्या एका विद्यापिठात अभिनव प्रयोग करण्यात येणार आहे. तिथे जो जिता वही सिंकदर हा वाक्प्रचार बदलून त्याऐवजी जो जिता वही राजा विक्रमादित्य हा वाक्प्रचार सुरु करण्यात येणार आहे. यासाठी विक्रम विद्यापीठाचे प्राध्यापक प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये स्वतःच्या इतिहासाप्रती जागरुकता निर्माण व्हावी हा यामागील उद्देश असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. यासंदर्भात विद्यापिठाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे सर्व प्राध्यापकांना सूचना देण्यात आल्याअसून हे प्राध्यापक विद्यार्थ्यांना सम्राट विक्रमादित्याची महानताही सांगणार आहेत.
याबाबत विद्यापीठाचे कुलगुरु सांगतात की, सिकंदर हा आपल्या तरुणांसाठी आयकॉन कसा असू शकतो? सम्राट विक्रमादित्य (Vikramaditya) हा आपल्यासाठी आदर्श आहे, म्हणून हा शब्दप्रयोग बदलण्याची सुरुवात आम्ही करत आहोत. आपला वारसा काय आहे याचा विचार आपल्या विद्यार्थ्यांनी, तरुणांनी केला पाहिजे हा यामागचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच हा शब्दप्रयोग कायम होण्यासाठी ते आता सरकार दरबारीही प्रयत्न करणार आहेत. या विद्यापीठाचे नाव विक्रम विद्यापीठ असून ते सम्राट विक्रमादित्य विद्यापीठ करण्यासाठीही प्रयत्न चालू आहे. याबाबातच प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
सम्राट विक्रमादित्य ज्ञानी, शूर आणि उदार आणि महा पराक्रमी राजा होता. इतिहासातील सर्वात लोकप्रिय आणि न्याय राजा म्हणून विक्रमादित्याची (Vikramaditya) ओळख आहे. विक्रमादित्यानं इ.स.पूर्व 58 मध्ये शकांचे आक्रमण परतावून लावले. त्याची आठवण म्हणून त्यांनी विक्रम संवत सुरू करून राज्याचा विस्तार केला. विक्रमादित्याने भारताची भूमी विदेशी राज्यकर्त्यांपासून मुक्त केली. त्यांचे सैन्य जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य म्हणून ओळखले जात होते. विक्रमादित्याने समुद्रावरही राज्य केले. त्याची सत्ता अरबस्तान आणि इजिप्तपर्यंत पसरली होती. इतिहासकारांच्या मते, उज्जैनच्या सम्राट विक्रमादित्यचे भारतीय उपखंडाव्यतिरिक्त इराण, इराक आणि अरबस्तानमध्ये राज्य होते. विक्रमादित्य (Vikramaditya) फक्त पराक्रमी होता असे नाही तर त्याला साहित्याची, कलेची जाण होती. त्यांनी अनेक भव्य मंदिरे उभारली.
=======
हे देखील वाचा : एका महिलेसाठी वेडा झालेल्या ‘या’ मुघल सम्राटाने स्वतःच्याच सैनिकाची केली हत्या
======
कलाकारांना आसरा दिला. त्याच्या दरबारात नवरत्ने होती. त्यातधन्वंतरी, क्षपनक, अमरसिंह, शंकू, बेताल भट्ट, घाटखारपार, कालिदास, वराहमिहिर आणि वररुची आदींचा समावेश होता. या नवरत्नांमध्ये उच्च दर्जाचे विद्न, महान कवी, गणिताचे महान अभ्यासक आणि विज्ञानातील तज्ञांचा समावेश होता. विक्रमादित्य या नवरत्नांच्या सल्लानं राज्यकारभार करत असे. त्याच्या राज्यात जनता सुखी आणि समृद्ध होती. या सम्राट विक्रमादित्य (Vikramaditya) यांची ओळख नव्यानं होण्याची गरज आहे. राजा विक्रमादित्य यांच्या पराक्रमाची गाथा पुन्हा तरुण पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी उज्जैनच्या विक्रम विद्यापीठानं सुरु केलेला हा उपक्रम नक्कीच प्रशसंनीय आहे.
सई बने