काही दिवसांपूर्वीच माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांच्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता उपराष्ट्रपतिपदी कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. सध्या देशाचे उपराष्ट्रपती पद हे रिक्त असून, आज या पदासाठी निवडणूक संपन्न होत आहे. आज भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि इंडिया अलायन्सचे सुदर्शन रेड्डी यांच्यामध्ये लढत होणार आहे. दरम्यान ही निवडणूक प्रक्रिया चालू आहे. उपराष्ट्रपती पद हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद आहे. तत्पूर्वी आपण या उपराष्ट्रपतीपदाबद्दल काही महत्वाची माहिती जाणून घेऊया. (Marathi Headline)
उपराष्ट्रपतींची निवड कशी होते?
भारतीय राज्यघटनेतील कलम ६६ नुसार, उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील सदस्यांद्वारे केली जाते. या निवडणुकीला ‘इलेक्टोरल कॉलेज’ असे म्हणतात, यात लोकसभेतील ५४३ आणि राज्यसभेतील २४५ असे सर्व एकूण ७८८ सदस्य मतदान करतात. या निवडणुकीची मुख्य बाब म्हणजे, या निवडणुकीत राज्य विधानसभेच्या सदस्यांचा समावेश नसतो. तर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विधानसभेचे सदस्य देखील सहभागी होत असतात. (Todays Marathi News)
उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीची मतदान पद्धत
उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान ‘एकल संक्रमणीय मता’च्या आधारे आनुपातिक प्रतिनिधित्व प्रणालीनुसार होते. यात केले जाणारे मतदान गोपनीय पद्धतीने केले जाते. या निवडणुकीत, कोणताही राजकीय पक्ष आपल्या सदस्यांना विशिष्ट उमेदवारालाच मतदान करण्यासाठी ‘व्हीप’ जारी करू शकत नाही. प्रत्येक सदस्याला स्वतःच्या निर्णयानुसार मतदान करण्याचे स्वातंत्र्य असते. (Marathi News)
उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार होण्यासाठी काही विशिष्ट पात्रता अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार भारताचा नागरिक असावा. उमेदवाराचे वय किमान ३५ वर्षे पूर्ण असावे. सदर उमेदवार राज्यसभेचा सदस्य होण्यास पात्र असावा. या पदासाठी, कोणतीही व्यक्ती कितीही वेळा निवडणूक लढवू शकते, कारण राज्यघटनेमध्ये अशा प्रकारची कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. त्यामुळे, विद्यमान किंवा माजी उपराष्ट्रपतीही पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी पात्र असतात. (Top Marathi News)
आज संपन्न होत असलेली उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक एनडीएसाठी सोपी आहे, कारण संसदेतील त्यांचे संख्याबळ निर्णायक आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील एकूण सदस्यांची संख्या ७८८ आहे. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी उमेदवाराला किमान ३९४ मतांची (५० टक्क्यांपेक्षा जास्त) आवश्यकता असते. सध्या एनडीएकडे लोकसभेत २९३ खासदार आणि राज्यसभेत १२९ खासदार आहेत. त्यामुळे, त्यांचे एकूण संख्याबळ ४२२ होते, जे विजयासाठी आवश्यक असलेल्या ३९४ मतांपेक्षा जास्त आहे. यामुळे एनडीएच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे. (Latest Marathi Headline)
उपराष्ट्रपतींना देण्यात येणाऱ्या सुविधा
– आज ज्यांची निवड होईल ते उपराष्ट्रपती हे भारताचे १४ वे उपराष्ट्रपती असतील. त्यांची नवी दिल्लीतील उपराष्ट्रपतींच्या एन्क्लेव्हमध्ये राहण्याची सोय होईल. हे सेंट्रल व्हिस्टा री-डेव्हलपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत बांधलेले एक आधुनिक कॅम्पस आहे. (Top Marathi Headline)
– उपराष्ट्रपतींना दिल्लीच्या लुटियन्स झोनमध्ये एक भव्य सरकारी बंगला मिळतो. येथे त्यांची राहण्याची सुविधा पूर्णपणे सुरक्षित असते. शिवाय यासाठी त्यांनी कोणतेही पैसे मोजावे लागत नाहीत.
– उपराष्ट्रपतींना दरमहा ४ लाख रुपये वेतन दिलं जातं. याशिवाय त्यांना भत्ता आणि पेन्शन मिळते.
– उपराष्ट्रपतींना केंद्र सरकारकडूनही सुरक्षा मिळते. त्यांना एसपीजी आणि फोर्स सिक्योरिटी यांच्याकडून देखील सुरक्षा दिली जाते. त्यांना नेहमीच Z+ सुरक्षा प्रदाण करण्यात येते. (Latest Marathi News)
– उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात – कामकाजाचे आचरण, शिस्त, सदस्यांची अपात्रता (पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत) यासारख्या बाबींवर अंतिम अधिकार त्यांच्याकडे असतात. मृत्यू, राजीनामा किंवा इतर कारणांमुळे जर राष्ट्रपतींचे पद रिक्त झाले तर उपराष्ट्रपती हे कार्यवाहक राष्ट्रपती बनतात आणि राष्ट्रपतींचे अधिकार पार पाडतात.
– त्यांना अधिकृतपणे बुलेटप्रूफ वाहने दिली जातात आणि देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करण्यासाठी हवाई दलाची विमाने आणि हेलिकॉप्टर पुरवले जातात. हा प्रवास मोफत असतो. (Top Trending News)
– उपराष्ट्रपतींना त्यांच्या अधिकृत निवासस्थानी वैयक्तिक कर्मचारी, सचिवालय आणि सहाय्यक अधिकारी देखील मिळतात. त्यांच्याकडे काम करण्यासाठी स्वतंत्र उपराष्ट्रपती कार्यालय देखील असतं.
– उपराष्ट्रपती यांच्या देशांतर्गत आणि परदेशी प्रवासाचा संपूर्ण खर्च सरकार करते. परदेशी दौऱ्यांवर उच्चस्तरीय प्रोटोकॉल आणि स्वागत सुविधा देखील प्रदान केल्या जातात. उपराष्ट्रपतींना विमान आणि रेल्वे प्रवास मोफत असतो. प्रथम श्रेणी किंवा एअर इंडियाच्या विशेष विमानाची व्यवस्था त्यांच्यासाठी केली जाते. रस्ते प्रवासासाठी प्रति किलोमीटर प्रवासासाठी 16 रुपये भत्ता दिला जातो तसेच अधिकृत कामासाठी किंवा वैयक्तिक प्रवासासाठी विशेष भत्ते दिले जातात. (Top Stories)
========
KP Sharma Oli : नेपाळ सरकारला हादरा देणारे सुदान गुरुंग
========
– उपराष्ट्रपती यांना सरकारी आणि सीजीएचएस रुग्णालयात मोफत उपचार सुविधा मिळते. येथे त्यांना व्हीआयपी उपचार मिळतात आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान वैद्यकीय पथकाची सुविधा देखील दिली जाते.
– कार्यकाळ संपल्यानंतर किंवा राजीनामा दिल्यानंतर त्यांना मासिक पेन्शन सुविधा मिळते. निवृत्तीनंतर उपराष्ट्रपतींना महिन्याला दीड लाख रुपये पेन्शन मिळते. याशिवाय त्यांना राष्ट्रपतींसारख्या अनेक सुविधाही मिळतात. त्यांना कर्मचारी, गाडी आणि ड्रायव्हर देखील मिळतो. पेन्शनसोबत सरकारी निवास व्यवस्था देखील दिली जाते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics