Home » Manoj Kumar : ‘या’ चित्रपटांमुळे मनोज कुमार झाले ‘भारत कुमार’, जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास

Manoj Kumar : ‘या’ चित्रपटांमुळे मनोज कुमार झाले ‘भारत कुमार’, जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास

by Jyotsna Kulkarni
0 comment
Manoj Kumar
Share

मनोरंजनविश्वातून एक मोठी आणि अत्यंत दुःखद बातमी येत आहे. ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे आज शुक्रवारी ४ एप्रिल रोजी सकाळी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. मनोज कुमार हे त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात.  मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी या रुग्णालयात मनोज कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला.(Manoj Kumar)

मनोज कुमार यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने अनेक दशकं हिंदी सिनेसृष्टीमधे आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आज मनोज कुमार यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रेक्षकांनी कायमच मनोज कुमार यांना पसंत केलं. केवळ अभिनयच नाही तर लेखन आणि दिग्दर्शनात देखील त्यांनी यशच संपादन केले. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी या क्षेत्रात आपल्या प्रतिभेच्या जोरावर मोठे यश मिळवले.(Manoj Kumar Death)

हिंदी सिनेसृष्टीतील महान कलाकारांपैकी एक असलेल्या मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये झाला. त्यांचे खरे नाव हरिकिशन हिरी गोस्वामी हे होते. भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर त्यांचे त्यांचे कुटुंब दिल्लीला आले. दिल्लीतील विजय नगर निर्वासित कॅम्पमध्ये राहत होते, त्यानंतर ते जुन्या राजेंद्र नगर भागात स्थलांतरित झाले. लहानपणापासूनच त्यांना सिनेविश्व खुणावत होते. त्यांनी त्यांचे पदवी शिक्षण दिल्लीमधून पूर्ण केले. मनोज कुमार यांनी लहानपणी दिलीप कुमार यांचा ‘शबनम’ हा चित्रपट पाहिला आणि त्यांनी याच क्षेत्रात काम करायचे ठरवले. अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन मनोज कुमार मुंबईमध्ये आले.(Top News)

========

हे देखील वाचा : Ramnavmi : रामनवमी कधी आहे? रामनवमीचे महत्व काय?

========

Manoj Kumar

मुंबईत आल्यावर मनोज कुमार यांनी काम मिळवण्यासाठी संघर्ष सुरु केला. अशातच त्यांच्याकडे लेखनाचे काम येऊ लागले. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी लेखनाचे काम केले, त्यातून त्यांना पैसे मिळू लागले. मात्र त्यांना अभिनय करायचा होता. त्यामुळे अभिनयात काम मिळावे यासाठी ते सतत प्रयत्न करत होते. अशातच १९६० मध्ये त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांना ‘कांच की गुडिया’ या चित्रपटात अभिनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यानंतर ते अनेक चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका केल्या.(Marathi Latest News)

१९६२ मध्ये मनोज कुमार ‘हरियाली और रास्ता’ या सिनेमात मुख्य अभिनेता म्हणून दिसले. या चित्रपटात त्यांच्यासोबत माला सिन्हा मुख्य भूमिकेत होत्या. या दोघांची जोडी खूपच लोकप्रिय झाली. १९६४ मध्ये त्यांचा आणखी एक सुपरहिट चित्रपट ‘वो कौन थी’ हा प्रदर्शित झाला. या सिनेमातील ‘लग जा गले’ हे आजही सर्वांचेच आवडीचे गाणे आहे.(Top Trending News)

पुढे १९७४ च्या ‘रोटी, कपडा और मकान’ या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर तर मनोज कुमार यशाच्या शिखरावर पोहोचले. यानंतर त्यांच्याकडे चित्रपटाच्या रांगा लागू लागल्या. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता आणि सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले. त्या त्या काळातील सर्वच लोकप्रिय नायिकांसोबत मनोज कुमार यांची जोडी खूपच गाजली. (Marathi Trending News)

Manoj Kumar

मनोज कुमार नाव कसे पडले?

चित्रपटांमध्ये यशाची एक एक यशस्वी पायरी चढणाऱ्या मनोज कुमार यांच्या नावामागचा किस्सा देखील खूपच प्रसिद्ध आहे. मनोज कुमार लहान असताना एकदा आपल्या मामासोबत एक चित्रपट पाहायला गेले होते. तो चित्रपट होता दिलीप कुमार यांचा ‘शबनम’. या चित्रपटात दिलीप यांनी मनोज नावाचे पात्र साकारले होते. दिलीप कुमार यांचा अभिनय पाहून मनोज कुमार खूपच प्रभावित झाले. त्यांनी तेव्हाच स्वतःच्या मनाशी ठरवले की, ‘जर मी अभिनेता झालो तर मनोज कुमार हेच नाव ठेवणार.’ पुढे मनोज कुमार चित्रपटांमध्ये काम करू लागल्यानंतर त्यांनी हरिकृष्ण हे नाव बदलून मनोज कुमार ठेवले. (MAnoj Kumar journey)

असे सांगितले जाते की, चित्रपटांमध्ये सतत अपयश येत असल्यामुळे अमिताभ बच्चन यांनी हे क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा मनोज कुमार यांनी त्यांना थांबवलं आणि ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटात त्यांना संधी दिली. अमिताभ बच्चन यांच्या प्रतिभेची कल्पना त्यांना माहित होती. पुढे अमिताभ बच्चन यांनी आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला.(MAnoj Kumar Movie)

Manoj Kumar

१९६५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘शहीद’ हा चित्रपट त्यांच्या करियरमधील महत्त्वाच्या चित्रपट होता. या देशभक्तीपर चित्रपटात त्यांनी भगत सिंह यांची भूमिका साकारली होती. यानंतर आलेल्या ‘उपकार’ या चित्रपटात ते एका शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसले होते. १९७० मध्ये त्यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला ‘पूरब और पश्चिम’ हा चित्रपटतुफान गाजला. या चित्रपटात असलेले ‘भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ’ हे गाणं आजही ऑल टाइम हिट गाण्यांमध्ये येते. (Social News)

मनोज कुमार यांच्या चित्रपटांमध्ये बहुतकरून त्यांच्या व्यक्तिरेखेचे ​​नाव ‘भारत’ होते. त्यामुळे लोकं त्यांना ‘भारत कुमार’ या नावानेच ओळखू लागले. भारतचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री हे देखील मनोज कुमार यांचे मोठे चाहते होते. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी मनोज यांना ‘जय जवान, जय किसान’वर चित्रपट बनवण्याची कल्पना दिली आणि त्यानंतर मनोज कुमार यांनी ‘उपकार’ चित्रपट बनवला. (Marathi Top News)

Manoj Kumar

========

हे देखील वाचा : IPL : धोनीच्या आऊट होण्यावर दिलेल्या एक्सप्रेशनमुळे रातोरात व्हायरल झालेली ‘मिस्ट्री गर्ल’ कोण?

========

मनोज कुमार यांना मिळालेले पुरस्कार

मनोज कुमार यांनी अनेक मानाचे पुरस्कार आपल्या नावावर केले. मनोज कुमार यांना १९७२ मध्ये ‘बेईमान’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. १९७५ मध्ये ‘रोटी कपडा और मकान’साठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. १९९२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. मनोज कुमार यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबदल दादासाहेब फाळके पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. मनोज कुमार आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होते. ते म्हणजे एक हात चेहऱ्यावर ठेऊन डायलॉग बोलणं. त्यांची हीच स्टाइल पुढे त्यांची सिग्नेचर स्टाइल बनली होती. (latest Manoj Kumar News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.