Vegetables Avoid in Summer : उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. खासकरुन सराळ फळं आणि पालेभाज्यांचे सेवन करावे. याशिवाय बदलत्या ऋतूनुसार आहारामध्ये बदल करावा असेही सांगितले जाते. खरंतर, उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवू शकतात. यामागे काही कारणे असू शकतात. पण उन्हाळ्यात खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. अशातच उन्हाळ्यात कोणत्या भाज्यांचे सेवन करणे टाळावे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. अन्यथा आरोग्य बिघडण्याची समस्या उद्भवू शकते.
वांगी
वांग्यामध्ये व्हिटॅमिन, खनिज आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. याशिवाय वांगी अँटीऑक्सिडेंट्स, फायबर आणि काही व्हिटॅमिनचा उत्तम स्रोत मानली जातात. यामुळए आरोग्याला फायदा होतो. परंतु, वांगी ही उष्ण असतात जर उन्हाळ्यात याचे सेवन केल्यास पचनक्रिया बिघडली जाऊ शकते. याशिवाय पोटासंबंधित समस्या जसे की, बद्धकोष्ठता, अपन आणि त्वचेसंबंधितही समस्या होऊ शकतात.
फ्लॉवर
फ्लॉवरमध्ये फॉस्फोरस आणि पोटॅशियम असते. याशिवाय कॅल्शियम, सल्फर आणि मॅग्नेशियमसारखी अन्य आवश्यक तत्त्वेही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. उन्हाळ्यात फ्लॉवरची भाजी खाणे टाळावी. कारण फ्लॉवरमध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते. यामुळे शरीरात उष्णता वाढली जाते. अशातच अपचन आणि पोट बिघडण्याची समस्या होऊ शकते.

Vegetables Avoid in Summer
फणस
फणसामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पोषण तत्त्वे असतात. जसे की, व्हिटॅमिन सी, ए, बी आणि पोटॅशियम. फसण फायबरचा उत्तम स्रोत सून यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात. खरंतर, दिवसात फणस भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये विक्रीस येतो. पण फणसाचे सेवन उन्हाळ्यात मर्यादित प्रमाणात करावे. अन्यथा आरोग्य बिघडले जाऊ शकते.
====================
हे ही वाचा :
Health : तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरात दिसतील आश्चर्यकारक फायदे
Tea : चहा प्यायल्यामुळे आरोग्याला होतात ‘हे’ लाभ
=====================
रताळ
रताळामध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी असतात. पण किडनी आणि ब्लड शुगरची समस्या असणाऱ्या रुग्णांनी उन्हाळ्यात रताळ्याचे सेवन करणे टाळावे. यामध्ये ऑक्सिलिक अॅसिडचे प्रमाण अधिक असल्याने किडनीचे नुकसान होऊ शकते. (Vegetables Avoid in Summer)