Home » Tourism : एक असा देश ज्याची लोकसंख्या आहे केवळ 800

Tourism : एक असा देश ज्याची लोकसंख्या आहे केवळ 800

by Jyotsna Kulkarni
0 comment
Share

सर्वांनाच फिरण्याची आवड असते. आपण नेहमी आपल्या जवळच्या ठिकाणी, शहराबाहेर आणि शक्य असल्यास देशाबाहेर फिरण्यासाठी जात असतो. फिरण्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची ठिकाणे तर पाहायला मिळतातच सोबतच त्या ठिकाणाची संस्कृती, तिथले खाद्यपदार्थ, लोकं, त्यांची जीवनपद्धत सर्वच आपल्याला समजते आणि एक माणूस म्हणून आपण विचारांनी समृद्ध होत जातो. आजवर तुम्ही अनेक सुंदर, विलोभनीय ठिकाणं पाहिली असतील मात्र आज आम्ही तुम्हाला असे एक ठिकाण किंबहुना असा देश सांगणार आहोत जो जगातील सर्वात सुंदर देश आहे. सोबतच हा देश एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळ म्हणून देखील ओळखला जातो. (Tourism)

हा देश आहे जगातील सर्वात छोटा देश व्हॅटिकन सिटी आहे. इटलीची राजधानी रोम शहरात आहे. रोमच्या मध्यात व्हॅटिकन सिटी हे जगातील सर्वात लहान राष्ट्र आहे. या ठिकाणी कॅथोलिक चर्च आणि व्हॅटिकन सिटीचे अध्यात्मिक केंद्र आहे. या ठिकाणी पीटर बेसिलिका आणि व्हॅटिकन संग्रहालय आहे. मुख्य म्हणजे व्हॅटिकन सिटी हे जगभरातील ख्रिश्चन लोकांचे अध्यात्मिक केंद्र असून, या ठिकाणी एकही भारतीय नाही. येथे अंदाजे ८०० लोकसंख्या आहे आणि ही मुख्यतः चर्चशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी असतात. (Vatican City)

४४ हेक्टर (सुमारे ११० एकर) क्षेत्रफळ आहे व्हॅटिकन सिटीचे. तथापि, येथील लोकसंख्या केवळ ८०० आहे. लोकसंख्या आणि क्षेत्रफळ दोन्हींच्या हिशोबाने हे जगातील सर्वात छोटे स्वतंत्र शहर आहे. २३ हेक्टर क्षेत्रामध्ये व्हॅटिकन गार्डन पसरलेले आहे. याची निर्मिती इटलीत पुनर्जागरणादरम्यान झाली होती आणि पोप निकोलस ३ यांनी या गार्डनच्या चहुबाजूंनी भिंत बांधली होती. १९४३ मध्ये द्वितीय महायुद्धादरम्यान जर्मन सैन्याने रोम शहरावर ताबा मिळवला होता; परंतु व्हॅटिकन सिटीला कोणतेच नुकसान पोहोचले नाही. त्यावेळच्या पोप यांनी युद्धात निष्पक्ष राहण्याचे धोरण अवलंबले होते. (Marathi News)

Tourism

सॅन मारिनो, इटलीच्या अपेनिन पर्वतरांगांमध्ये हा देश आहे. जगातील सर्वात जुन्या प्रजासत्ताकांपैकी एक हा देश आहे. या ठिकाणी भव्य वास्तुकला, सुंदर दृश्ये आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यासाठी प्रसिद्ध आहे. अतिशय सुंदर आणि निसर्गाने भरभरून वरदान दिलेल्या या व्हॅटिकन सिटीचे अनेक कायदे आणि नियम इतर देशांपेक्षा खूपच वेगळे आहेत. येथे राहणारे बहुतेक लोकं ब्रह्मचारी पुजारी असतात ज्यांना लग्न करण्याची किंवा मुलांचे पालक बनण्याची परवानगी नसते. याचा उद्देश अशा व्यक्तींना समर्पित जीवन जगण्याची संधी देणे हा आहे ज्यांना आपले आयुष्य पूर्णपणे चर्च आणि धर्माच्या सेवेसाठी अर्पण करायचे आहे. (Marathi Top News)

======

हे देखील वाचा : Beer : बिअरप्रेमींसाठी खुशखबर! २०० रुपयांची बिअर आता फक्त ५० रुपयांमध्ये

=======

व्हॅटिकन हा एक असा देश आहे जिथे एकाही बाळाचा जन्म होत नाही. कारण या देशामध्ये कुठल्याच स्त्रीला बाळाला जन्म देण्याचा अधिकार नाही. या देशाची लोकसंख्या एक हजार पेक्षाही कमी आहे. कारण हा देश कोणालाच नागरिकत्व देत नाही. जो पर्यंत तुम्ही नोकरी करताय तो पर्यंत या देशात राहू शकता. नोकरी सोडल्यावर किंवा निवृत्त झाल्यावर तुम्हाला देश सोडून जावं लागतं. (Marathi Trending News)

व्हॅटिकन सिटी हे रोमन ख्रिस्ती धर्मगुरूंचं अधिकृत निवासस्थान समजलं जातं. पोप फ्रान्सिस हे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहात होते. विशेष बाब म्हणजे व्हॅटिनक हे इटलीची राजधानी रोममधील एक शहर असले तरी २००५ साली या शहराला अधिकृत देशाचा दर्जा मिळाला. व्हॅटिकनमध्ये एक रहस्यमय ग्रंथालय आहे. या ठिकाणी हजार वर्ष जुनी लाखो कागदपत्र आहेत. तसंच कित्येक राजा-राण्यांची प्रेम पत्र देखील या ग्रंथालयात आपल्याला पाहायला मिळतात. परंतु हे कागदपत्र वाचण्याचा अधिकार सामान्य माणसांना नाही. (Marathi Top Stories)

Tourism

व्हॅटिकनमध्ये कोणत्याची प्रकारचा कर आकारला जात नाही. तरीही हा देश कमाईच्या बाबतीत जगातील अनेक मोठमोठ्या देशांना मागे सोडतो. दरवर्षी जगभरातील उद्योजक व्हॅटिकनमधील चर्चला कोट्यवधींच्या देणग्या देतात. शिवाय टुरिझममधून देखील या देशाला भरपूर कमाई करता येते. व्हॅटिकन म्युझियममध्ये इतकी चित्रं आणि शिल्पं आहेत की जर तुम्ही प्रत्येक चित्र पाहण्यासाठी किमान १ मिनिटांचा वेळ घेतला तर सर्व चित्र पाहण्यासाठी तुम्हाला ४ वर्ष लागतील. (Social News)

व्हॅटिकन सिटीमध्ये ड्रेस कोड देखील अत्यंत कडक आहे. येथील स्त्री आणि पुरुषांसाठी विशेष ड्रेस कोड आहे, ज्यामध्ये मिनी स्कर्ट, शॉर्ट्स आणि स्लिव्हलेस ड्रेस घालण्याची परवानगी नाही. याशिवाय, व्हॅटिकन सिटीमध्ये नागरिकत्व मिळवण्यासाठी काही विशेष नियम आहेत. येथे नागरिकत्व केवळ अशाच लोकांना दिले जाते जे शहरात काम करतात, जसे की शिक्षक, पत्रकार किंवा इतर सरकारी कर्मचारी. (International News In Marathi)

पोप हे व्हॅटिकनचे राष्ट्रप्रमुख मानले जातात. त्यांना धार्मिक आणि प्रशासकीय कामकाजाचे पूर्ण अधिकार मिळतात. मुख्य बाब म्हणजे त्यांनी दिलेला निर्णय अंतिम मानला जातो. त्यांच्या विरोधात जाऊन कोणत्याही प्रकारचा खटला चालवण्याचा अधिकार कोर्टाला नाही. या देशाकडील लष्कर सुद्धा छोटे आहे. या लष्करात १५० हून कमी सैनिक आहेत. पोपच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. पोपच्या संरक्षणार्थ प्रसंगी मृत्यू पत्करण्याची शपथ ते घेतात. (Marathi Latest News)

Tourism

या लष्करासाठी सैनिक कॅथलिक असणे आवश्यक आहे. केवळ पुरूषांनाच भरती होता येते. त्यासाठी वयाची मर्यादा १९ ते ३० वर्षादरम्यान आहे. सैनिकाची उंची १७४ सेमी असणे आवश्यक आहे. हे सैनिक कधीच युद्धात सहभागी होत नाहीत. त्यांना मोठे वेतन असते. या सैनिकांना €1,500 ते €3,600 (म्हणजे ४.५ लाख रुपये) महिन्यापर्यंत वेतन मिळते. इतर भत्ते, अनुषांगिक लाभांसह त्यांना वार्षिक १ कोटी रुपयांपर्यंत वेतन मिळते.

======

हे देखील वाचा : Syed Ahmed Maroof : हनीट्रॅपमध्ये पाकिस्तानी उच्चायुक्त !

=======

भारतातून व्हॅटिकन सिटीला कसे जावे?

भारतातील प्रमुख शहरांमधून रोमच्या लिओनार्डो दा विंची-फ्युमिचिनो या ठिकाणी जाण्याच्या फ्लाइट्स उपलब्ध आहेत. भारतातून रोमला पोहोचण्यास सुमारे १० ते १४ तास लागतात. रोम विमानतळावरून मेट्रो, लोकल ट्रेन, बस किंवा टॅक्सीने व्हॅटिकन सिटीपर्यंत जात येते. व्हॅटिकन सिटी रोमच्या अगदी जवळ असून, सेंट पीटर्स बॅसिलिका किंवा सिस्टीन चॅपेलकडे जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक हा एक सोयीस्कर व किफायतशीर पर्याय आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.