आपल्या सर्वांना नेहमीच चांगल्या आयुष्याची आस असते. मोठे घर, गाडी, पैसा असे सर्व असले पाहिजे अशी इच्छा असते. त्यासाठी आपण खूप कष्ट देखील घेत असतो. एक गोष्ट नक्की की आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला पैसा अर्थात लक्ष्मी खूपच महत्वाची असते. आयुष्याशी संबंधित सर्व सुख-सोयी मिळवण्यासाठी निश्चितपणे देवी लक्ष्मी खूप महत्वाची आहे. या कलियुगात पैशांशिवाय काहीही मिळणे अशक्य आहे.
काबाड कष्ट करूनही कष्टाचे फळ आपल्याला मिळत नाही. आजच्या काळात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाला आहे. त्यामुळे खर्च भागवणे कठीण होत आहे. बचत अजिबातच होत नाही. घरातील नकारात्मक ऊर्जा, कामात अडथळे, कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद आणि आरोग्यासंबंधी समस्या,आर्थिक संबंधित समस्या अनेकदा येतात. अशा वेळेला आपण अनेक उपाय देखील करतो. वास्तुशास्त्रामध्ये देखील याबाबत काही उपाय दिलेले आहेत.
वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने जीवनात धनसंपत्ती येते, आर्थिक प्रगती, सुख, समृद्धी आणि वैभव प्राप्त होते. चला जाणून घेऊया वास्तुच्या या सोप्या उपायांबद्दल…
– धन-संपत्तीच्या देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुवारी कच्च्या दुधात हळद मिसळा आणि ते घराच्या सर्व कोपऱ्यात शिंपडा. हा उपाय केल्याने घर धन-धान्न्याने भरलेले असेल आणि कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही.
– जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल तर घरात देवी लक्ष्मी आणि धर्म दाता कुबेर यांचे चित्र लावा. ही चित्रे नेहमी उत्तर दिशेला लावा. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा धनप्राप्तीसाठी अत्यंत फलदायी मानली जाते. हा उपाय केल्याने आर्थिक लाभ होतो.
– कासव हा भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो. असं मानलं जातं की, कासव घरात ठेवल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. वास्तुशास्त्रानुसार कासवाला नेहमी उत्तर दिशेला ठेवावं, तरच याचे चांगले फायदे मिळतात.
– घराच्या ईशान्य कोपऱ्यात मत्स्यालय किंवा छोटा कारंजा ठेवणे खूप शुभ मानले जाते. ईशान्य दिशेला देवी-देवतांचा वास असतो आणि ही दिशा घरामध्ये खूप महत्त्वाची असते. या दिशेला घाण किंवा जड वस्तू ठेवू नये. पाण्याशी संबंधित वस्तू या दिशेला ठेवल्याने भाग्याचे दरवाजे उघडतात आणि धनाचा ओघही वाढतो.
– हिंदू धर्मात हळदीला महत्त्वाचे स्थान आहे. हळदीला अत्यंत शुभ मानले गेले आहे. पिवळ्या कापडात हळकुंड ( अख्खी हळद) बांधून उशीखाली ठेवावी आणि झोपी जावे. यामुळे सौभाग्यात वाढ होते, असे मानले गेले आहे.
– घराच्या मध्यवर्ती भागाला ब्रह्मस्थान म्हणतात. ही जागा ईशान्य दिशेप्रमाणेच स्वच्छ आणि रिकामी असावी. बहुतेक घरांमध्ये सोफे, टेबल इत्यादी जड वस्तू या ठिकाणी ठेवतात, जे योग्य नाही. ही जागा स्वच्छ आणि रिकामी ठेवल्याने घरात धन-समृद्धी वाढते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते. यासोबतच आरोग्यही प्राप्त होते.
– वास्तुशास्त्रानुसार, पिरॅमिड घरात ठेवल्याने घरात समृद्धी नांदते, आर्थिक स्थिती सुधारते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. ज्या घरात क्रिस्टल पिरॅमिड असतो, त्या घराचे उत्पन्न वाढते.
– गोमती चक्र घरात ठेवल्याने घरात सुख, शांति आणि समृद्धी नांदते. असं म्हणतात की, ११ गोमती चक्रं पिवळ्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवल्याने देवी लक्ष्मीची आशीर्वाद प्राप्त होतो.
– बांबूचे छोटं झाड घरासाठी शुभ मानले जाते. काचेच्या ग्लासात ठेवलेले छोटे लकी बांबू हे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपयोगी मानले जातात. घराच्या पूर्व कोपऱ्यात बांबूचं झाड ठेवल्याने घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा पसरते.
– संध्याकाळी पूजा करताना तांब्याच्या भांड्यात गंगाजल भरून ठेवावे. पूजा पार पडल्यानंतर ते गंगाजल घरात शिंपडावे. असे करणे अत्यंत शुभ आणि पवित्र कार्य असल्याचे मानले गेले आहे.
( टीप : कुठलाही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांशी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.)