Home » घरांच्या भिंतीवर ‘या’ गोष्टी दिसत असतील तर दुर्लक्ष करु नका, अन्यथा…

घरांच्या भिंतीवर ‘या’ गोष्टी दिसत असतील तर दुर्लक्ष करु नका, अन्यथा…

by Team Gajawaja
0 comment
Vastu tips for wall
Share

Vastu tips for wall- वास्तुशास्रानुसार घरात ठेवल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूची दिशा आणि दशा निर्धारित केलेली असते. त्याचे फार महत्व सुद्धा असते. असे मानले जाते की, जर घरातील काही गोष्टी या वास्तुशास्रानुसार असतील तर घरात सकारात्मक उर्जा ही नेहमीच राहते. त्याचसोबत घरात ठेवण्यात आलेल्या त्या गोष्टी सुद्धा वास्तुला प्रभावित करतात. या व्यतिरिक्त तुमच्या घरातील भिंती, दरवाजे हे सुद्धा वास्तुनुसार नसल्यास त्याचा घरातील मंडळींवर फार मोठा परिणाम होतो. वास्तुशास्रात असे सांगितले जाते की, काही असे संकेत असतात जे आपल्याला घरातील भिंतींच्या माध्यमातून मिळतात. त्यामुळेच घरात सुख-शांति राहते. त्यामुळे घराच्या भिंती या स्वच्छ आणि व्यवस्थिती असाव्यात. तर जाणून घेऊयात घरांच्या भिंतीवर ‘या’ गोष्टी दिसत असतील तर दुर्लक्ष करु नका, अन्यथा काय परिणाम होतात त्याबद्दल अधिक.

कोणत्या दिशेला भिंतीं असाव्यात
-वास्तुशास्रात असा उल्लेख करण्यात येतो की, घरातील भिंतींचे सुद्धा यामध्ये फार महत्व आहे. कारण घर तयार करताना नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे की. घरातील भिंतींची उंची ही घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या तीन चतुर्थांश अधिक असावी.

-वास्तुशास्रात असे ही सांगण्यात आले आहे की, घराच्या पश्चिम आणि दक्षिण दिशेला असणाऱ्या भिंतींची उंची उत्तर आणि पूर्व दिशेच्या तुलनेत कमीत कमी ३० सेंटीमीटर अधिक असावी.

Vastu tips for wall
Vastu tips for wall

घरातील भिंती स्वच्छ असाव्यात
वास्तुशास्रानुसार, घराच्या भिंती नेहमीच स्वच्छ असाव्यात. असे मानले जाते की, कोळींचे जाळे, धुळ-माती, अस्वच्छता असलेल्या भिंतींमुळे नकारात्मक उर्जा अधिक वाढते. कोळ्यांचे जाळे हे तणावपूर्ण आणि निराशाजनक वातावरण निर्माण करतात. या व्यतिरिक्त घरातील भिंतींवर कोणत्याही प्रकारचे डाग नसावेत, त्यामुळे घरात दारिद्रता येते.(Vastu tips for wall)

हे देखील वाचा- आपल्या घराची वास्तू सदैव आनंदित राहण्यासाठी खास टीप्स

-घराच्या भिंतींचा रंग
वास्तुशास्रानुसार घराच्या आतमधील भिंतींच्या रंगाचे विशेष महत्व आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की, घरातील भिंतींचा रंग हा निघालेला नसावा. असे मानले जाते की, यामुळे घरातील परिवारातील सदस्यांना विविध प्रकारचे आजार उद्भवतात. त्याचसोबत घरातील भिंतींना कधीच गडद निळा किंवा काळा रंग देऊ नये. घरात नेहमीच पुसट रंगांचा वापर करावा. असे केल्याने घरातील सकारात्मक उर्जा वाढते. त्याचसोबत घरातील मंडळींचे एकमेकांसोबतचे नातेसंबंध सुद्धा टिकून राहतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.