Vastu Shahtra : वास्तुशास्रात असे काही नियम सांगण्यात आले आहे ज्याचे पालन केल्याने घरातच नव्हे कामाच्या ठिकाणीही आनंदाचे वातावरण राहू शकते. याशिवाय आपल्या राहण्यासह कामाच्या ठिकाणांच्या येथील उर्जा आयुष्यावर प्रभाव पाडत असतात. यामुळेच काही गोष्टी वास्तुनुसार असल्यास त्याचा नक्कीच आयुष्यावर सकारात्मक परिणाम करू शकतात. पण आपण बऱ्याचदा पाहतो की, ऑफिस डेस्कवर एखादे रोपं ठेवलेले असते. हे रोपं ठेवण्यामागील कारण काय बहुतांशजणांना माहिती देखील नसते. पण वास्तुशास्रानुसार, काही रोपं ऑफिस डेस्कवर ठेवणे अशुभ मानली जातात. यामुळे तुमच्या कामात अडथळा निर्माण होऊ शकतो. अशाच काही रोपांबद्दल जाणून घेऊया….
कॅक्टसचे रोपं
कॅक्टसचे रोप असे आहे जे आपल्या सौंदर्यासाठी ओखळले जाते. पण काटेरी रोपं असल्याने घरातील काही विशेष ठिकाणी ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पण वास्तुशास्रानुसार, ऑफिस डेस्कवर कॅक्टसचे रोप कधीच ठेवू नये. यामुळे तुमच्या आजूबाजूचे वातावरण नकारात्मक होऊ शकते. याशिवाय तुमच्या कामावरही या रोपामुळे परिणाम होऊ शकतो. (Vastu Shahtra)
टोकदार पाने असलेले बांबूचे रोपं
बांबूचे रोप नेहमीच सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. पण ऑफिस डेस्कवर टोकदार पाने असलेले बांबूचे रोपं ठेवू नये. यामुळे तुमच्या कामाच्या यशात अडथळा येऊ शकतो. याशिवाय कठोरतेचे प्रतीक मानले जाते. टोकदार पाने असलेले बांबूचे रोप लावल्याने कामाच्या ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे ऑफिसमध्ये सकारात्मक उर्जा वाढवण्यासाठी गोल आणि मऊसर टोक असलेले बांबूचे रोप डेस्कवर ठेवू शकता.