आज सगळीकडे मोठ्या उत्साहाने वसंत पंचमीचा दिवस साजरा केला जात आहे. संपूर्ण भारतामध्ये हा सण साजरा केला जातो. वसंत पंचमीच्या दिवशी विद्येची देवता असलेल्या देवी सरस्वतीचे पूजन केले जाते. माता सरस्वती ही ज्ञान आणि बुद्धीची देवी मानली जाते. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस खूप खास आहे. या दिवशी माता सरस्वतीची खऱ्या मनाने पूजा केल्याने ज्ञान प्राप्त होते. देवी सरस्वती ही विद्येची देवता असली तरी या देवीची मंदिरं जास्त नाही. क्वचितच सरस्वती देवीचे मंदिर आपल्या निदर्शनास पडते. मात्र आज वसंत पंचमीच्या निमित्ताने आपण देवी सरस्वतीच्या मंदिरांबद्दल माहिती जाणून घेऊया. (Vasant Panchami)
श्री विद्या सरस्वती मंदिर, वारंगल
हंस वहिनी विद्या सरस्वती मंदिरात माता सरस्वतीची पूजा केली जाते. हे मंदिर आंध्र प्रदेशातील बेडूक जिल्ह्यातील वारंगल येथे आहे. या मंदिराची स्थापना यायावारम चंद्रशेखर यांनी केली होती आणि सध्या कांची मठ हे मंदिर सांभाळते. या ठिकाणी श्री लक्ष्मी गणपती मंदिर, भगवान शनिश्वर मंदिर आणि भगवान शिव मंदिर यांसारखी इतर देवतांची मंदिरे बांधलेली आहेत. या मंदिरात विशेषतः वसंत पंचमीला ‘अक्षराभ्यास’साठी मोठ्या संख्येने भाविक येतात. (Marathi)

सरस्वती मंदिर, बासर
बासर येथील गोदावरी नदीच्या काठावर आसलेल्या या ज्ञान सरस्वती मंदिरात वसंत पंचमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. वसंत पंचमी ते महाशिवरात्री असा सुमारे १५ दिवस येथे उत्सव सुरु असतो. पौराणिक कथेनुसार, या सरस्वती मंदिराचा संबंध महाभारताशी आहे. महाभारतातील कुरुक्षेत्रावरील युद्धानंतर महर्षी वेद व्यास यांनी या ठिकाणी काही काळ वास्तव केले होते. मंदिरातील देवी सरस्वतीची पद्मासन मुद्रेतील देवीची मुर्ती सुमारे ४ फूट उंच आहे. मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे मंदिराच्या एका खांबातून सप्तसूर ऐकू येते. मंदिरातील गर्भगृह, गोपुरम, परिक्रमा मार्ग इत्यादी अतिशय सुंदर आहेत. बासर गावात एकूण ८ तलाव आहेत, त्यापैकी वाल्मिकी तीर्थ, विष्णू तीर्थ, गणेश तीर्थ, पुथा तीर्थ हे प्रमुख तलाव आहेत. (Latest Marathi Headline)

सरस्वती मंदिर, पुष्कर
पुष्करमध्ये सरस्वती देवीचे स्वतंत्र मंदिर नसले तरी, ब्रह्मा मंदिराच्या गाभाऱ्यात सरस्वती देवीची मूर्ती ब्रह्मदेवांसोबत विराजमान आहे, कारण ब्रह्मदेवाच्या यज्ञात सरस्वती देवीला उशीर झाल्यामुळे ब्रह्मा आणि सरस्वती यांच्यात मतभेद झाले होते, त्यामुळे ब्रह्माचे एकमेव मंदिर पुष्करमध्ये आहे आणि सरस्वती देवीच्या शापामुळे जगात इतरत्र ब्रह्मदेवाचे मंदिर नाही, असे पौराणिक कथांनुसार समजते. सरस्वतीच्या नदी स्वरूपाचे पुरावे देखील आहेत आणि तिला प्रजनन आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. (Top Stories)

शारदा मंदिर, मैहर
मैहरमधील शारदा मंदिर हे मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात त्रिकूट पर्वतावर असलेले एक प्रसिद्ध आणि पवित्र ठिकाण आहे, जेथे देवी शारदा (सरस्वती) ची पूजा केली जाते आणि भाविकांना १०६३ पायऱ्या चढून मंदिरात जावे लागते. याला ‘माई का हार’ असेही म्हणतात कारण येथे माता सतीचा हार पडला होता, असे मानले जाते. हे ठिकाण आल्हा-ऊदल यांच्या कथेमुळे प्रसिद्ध आहे आणि हे एक महत्त्वाचे शक्तिपीठ आहे, जिथे आल्हा आजही आरती करतात अशी श्रद्धा आहे. (Marathi News)

सरस्वती मंदिर, श्रृंगेरी
श्रृंगेरीतील सरस्वती मंदिर, ज्याला शारदाम्बा मंदिर म्हणतात, हे आदि शंकराचार्यांनी स्थापित केलेल्या चार पीठांपैकी एक महत्त्वाचे पीठ असून, विद्या आणि बुद्धीची देवी शारदाम्बा यांना समर्पित आहे आणि हे दक्षिण भारतातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. या मंदिरात देवीची सुंदर मूर्ती आहे आणि हे कर्नाटक राज्यातील चिकमगलूर जिल्ह्यात तुंगभद्रा नदीच्या काठावर आहे, जिथे विद्या आणि ज्ञानप्राप्तीसाठी भक्त मोठ्या संख्येने येतात. (Top Marathi News)

सरस्वती मंदिर, पणचिक्कड
हे मंदिर पणचिक्कड केरळमध्ये आहे, हे केरळमधील एकमेव मंदिर आहे जे देवी सरस्वतीला समर्पित आहे. या मंदिराला दक्षिणा मूकांबिका असेही म्हणतात. हे मंदिर चिंगावनम जवळ आहे. असे मानले जाते की या मंदिराची स्थापना किझेप्पुरम नंबूदिरी यांनी केली होती. त्याने ही मूर्ती शोधून पूर्वेकडे तोंड करून बसवली. दुसरा पुतळा पश्चिमेकडे तोंड करून उभारण्यात आला पण त्याला आकार नाही. पुतळ्याजवळ एक दिवा आहे जो सतत तेवत असतो. (Top Trending News)

======
Vasant Panchami : देवी सरस्वतीला समर्पित असलेली वसंत पंचमी कधी आहे?
Maghi Ganpati : गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीमधील फरक
======
श्री ज्ञान सरस्वती मंदिर, आदिलाबाद
माता सरस्वतीचे हे पवित्र धाम देशातील प्रमुख सरस्वती मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यात आहे. पौराणिक कथेनुसार, महाभारत युद्धानंतर, ऋषी व्यास शांततेच्या शोधात निघाले. ते गोदावरी नदीच्या काठावर कुमारचला टेकडीवर पोहोचले आणि त्यांनी देवीची पूजा केली. त्याच्यावर प्रसन्न होऊन देवीने त्यांना दर्शन दिले. देवीच्या आज्ञेनुसार, त्यांनी दररोज तीन मुठभर वाळू तीन ठिकाणी ठेवली. चमत्कारिकपणे, वाळूचे हे तीन ढीग सरस्वती, लक्ष्मी आणि काली या तीन देवींच्या मूर्तींमध्ये रुपांतरित झाले. (Social News)

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
