या कुंन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता।
या वींणावर दण्डमण्डितकरा या श्वेत पद्मासना॥
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता।
सा माम् पातु सरस्वती भगवती नि:शेष जाड्यापहा॥
जसे हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीन मुख्य आहेत. तशाच लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती या तीन मुख्य देवी आहेत. देवी लक्ष्मी ही संपत्तीची देवता समजली जाते, पार्वती ही शक्तीचे स्वरूप आहे तर सरस्वती ही विद्येची, ज्ञानाची देवता आहे. व्यक्ती कायम विद्येशिवाय, ज्ञानाशिवाय अपूर्ण असते. जर एखाद्या ज्ञान असेल तर तो किती संपत्ती कमाऊ शकतो. याच देवी सरस्वतीच्या पूजेचा दिवस म्हणजे ‘वसंत पंचमी’. माघ महिन्यातील पंचमीला वसंत पंचमीचा उत्सव साजरा केला जातो. हा दिवस खास देवी सरस्वतीला समर्पित आहे. याच दिवशी देवी सरस्वतीची उत्पत्ती झाली असल्याचे सांगितले जाते. वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा करण्याला मोठे महत्त्व देण्यात आले आहे. सरस्वतीच्या पूजेचे महत्त्व काय आहे? जाणून घेऊया. (Vasant Panchami)
देवी सरस्वती ही विद्या, बुद्धि, ज्ञान आणि वाणीची प्रमुख देवता आहे. धार्मिक शास्त्रानुसार असे मानले जाते की दिवसाच्या २४ तासात एकदा माता सरस्वती नक्कीच तुमच्या वाणीवर विराजमान असते. धार्मिक मान्यतेनुसार अशा वेळी माता सरस्वती वाणीवर विराजमान होते, तेव्हा तिचा प्रत्येक शब्द खरा ठरतो. देवी सरस्वतीच्या उत्पत्तीविषयी पुराणांमध्ये अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. काही ग्रंथांमध्ये देवी सरस्वतीला ब्रह्मदेवाची कन्या असे संबोधिले आहे. तर ‘देवी भागवता’ कथेमध्ये सरस्वती देवीची उत्पत्ती राधेच्या जिव्हागापासून झाली आहे असे म्हटले आहे. दुसऱ्या एका कथेत देवी सरस्वती या भगवान श्रीकृष्ण यांच्या मुखातून प्रकट झाल्या असे सांगण्यात आले आहे. याचप्रमाणे, देवी सरस्वतीला भगवान शिव आणि देवी पार्वती (दुर्गा) यांची कन्या म्हटले आहे. अश्या प्रकारच्या अनेक दत्तकथा देवी सरस्वती यांच्या उत्पत्तीबद्दल प्रचलित आहेत. (Marathi)
देवी सरस्वती या हिंदू धर्मातील प्रमुख वैदिक आणि पौराणिक ग्रंथ कथांमधील प्रसिद्ध देवी आहेत. त्याचप्रमाणे, देवी सरस्वती यांची मेधासुक्त द्वारा स्तुती करण्यात आली आहे. हिंदू धर्मातील प्रसिद्ध ग्रंथ ‘सरस्वती पुराण’ आणि ‘मत्स्य पुराण’ यापैकी ‘सरस्वती पुराण’ चा समावेश प्रसिद्ध १८ पुराणांमध्ये करण्यात आला नाही आहे. पुराणांमध्ये देवी सरस्वती आणि ब्रह्मदेव यांच्या विवाहाचा उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय, या पृथ्वीवरील पहिला मानव ‘मनु’ यांची उत्पत्ती त्यांच्यामुळे झाली असे देखील म्हटले जाते. मात्र मत्स पुराणात देवी सरस्वतीचा उल्लेख वेगळ्याच प्रकारे करण्यात आला आहे. (Todays Marathi Headline)

देवी सरस्वतीच्या विविध रूपांचे वर्णन या ठिकाणी केले गेले असून, तिची सुमारे एकशे आठ नाव प्रसिद्ध आहेत. या नावांमध्ये तिला शिवानुजा म्हणजेच भगवान शंकर यांची छोटी बहिण असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. देवी सरस्वती या नावा प्रमाणे त्यांना वाणी, शारदा, वांगेश्वरी आणि वेदमाता नावाने देखील संबोधले जाते. याचप्रमाणे, संगीताची उत्पत्ती ही देवी सरस्वती यांनी केली असल्याने त्यांना संगीताची देवी देखील म्हटले जाते. ज्ञानरूपी देवी सरस्वती यांचे स्वरूप हे खूपच आकर्षक असून त्याचे वर्णन करावे तितके कमीच आहे. एक मुख, चार भुजा, दोन्ही हाती वीणा घेऊन , एका हाती माळ आणि एका हाती पुस्तक पकडून देवी पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून स्मित हास्य करीत कमळाच्या फुलावर विराजमान आहेत. तसचं, देवी सरस्वती यांचे वाहन मोर असून त्यांचे निवास्थान वैकुंठ आहे. (Top Stories)
वसंत पंचमीची कथा
सृष्टीच्या प्रारंभिक काळात ब्रह्माजींनी भगवान श्रीहरी विष्णू ह्यांच्या आज्ञाने मनुष्य योनी चे निर्माण केले, परंतु ते या रचनेपासून समाधानी नव्हते, तेव्हा त्यांनी विष्णूजींकडून परवानगी घेऊन आपल्या कमंडळु मधून पाणी घेऊन ते पृथ्वी वर शिंपडले, ज्यामुळे पृथ्वीवर कंपन होऊ लागलं आणि त्यामधून एक अद्भुत चतुर्भुजी सुंदर स्त्री प्रकटली. ज्यांच्या एका हातात वीणा आणि दुसरा हात वर देताना होता. आणि इतर दोन्ही हातात पुस्तक आणि माळ होत्या. जेव्हा या सुंदर स्त्रीने आपल्या मधुर वीणेतून स्वर काढले तेव्हा जगातील सर्व प्राणी आणि जीवांना आवाज आला. तेव्हा ब्रह्माजींनी त्या देवीला वाणीची देवी सरस्वती असे नाव दिले. (Latest Marathi News)
सरस्वतीला बागेश्वरी,भगवती,शारदा,वीणावादीनी,आणि वाग्देवी अशी अनेक नावाने पुजतात. संगीताची उत्पत्ती त्यांनीच केल्यामुळे त्यांना संगीताची देवी देखील म्हणतात. वसंत पंचमी त्यांचा जन्मोत्सव म्हणून देखील साजरा करतात. पुराणानुसार श्रीकृष्णाने देवी सरस्वतीवर प्रसन्न होऊन त्यांना वर दिले की वसंत पंचमीच्या दिवशी आपली पूजा केली जाईल. याच कारणास्तव हिंदू धर्मात वसंत पंचमीच्या दिवशी विद्येचीं देवी सरस्वती ह्यांची पूजा केली जाते. शिक्षण सुरू होण्याच्या शुभमुहूर्तावर सरस्वती मातेची पूजा केली जाते. व्यास मुनींनी जेव्हा वाल्मिकी ऋषींना पुराणसूत्राविषयी विचारले तेव्हा ते सांगू शकले नाहीत. (Top Trending Headline)
======
Vasant Panchami : देवी सरस्वतीला समर्पित असलेली वसंत पंचमी कधी आहे?
Maghi Ganpati : गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीमधील फरक
======
अशा वेळी व्यास मुनींनी माचा जगदंबा सरस्वतीची स्तुती केली, तेव्हा त्यांच्या कृपेने वाल्मिकी ऋषींना ज्ञान प्राप्त झाले आणि त्यांनी सिद्धांताचे प्रतिपादन केले. सरस्वती मातेकडून वरदान मिळाल्यानंतर व्यास मुनी कवीश्वर झाले आणि त्यांनी पुराणांची रचना केली. सरस्वती मातेची उपासना केल्यानेच इंद्राला ग्रंथ हा शब्द आणि त्याचा अर्थ समजू शकला, म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी देवीची उपासना करणे चांगले आहे. माता सरस्वतीच्या प्रसादाने शुक्राचार्य हे सर्व राक्षसांचे पूजनीय गुरु बनले. सरस्वतीच्या कृपेने भगवान वेदव्यासांना चार वेदांची विभागणी करून संपूर्ण पुराणांची रचना करता आली. ज्ञानामुळे फक्त शब्द समजू शकतात आणि अनुभवाने त्याचा खरा अर्थ समजतो. मनुष्याच्या व्यक्तीमत्व विकासासाठी ज्ञान किंवा शिक्षण अत्यंत गरजेचे आहे. ज्या प्रमाणे शारीरिक विकासासाठी अन्नाची गरज असते, तशीच मेंदूच्या विकासासाठी ज्ञानाची गरज असते. (Social News)
(टीप : येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
