१४ फेब्रुवारी ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ म्हणजेच प्रेमाचा दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. या दिवशी जोडपी आपलं प्रेम आपापल्या पद्धतीने व्यक्त करत असतात. प्रेमी युगुलांमध्ये तर संपूर्ण आठवडा म्हणजेच ७ फेब्रुवारीपासूनच व्हॅलेन्टाईन्स विक म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. यात रोझ डे, प्रपोज डे, टेडी डे, हग डे, किस डे, प्रॉमिस डे आणि चॉकलेट डे असे वेगवेगळे दिवस असतात.
संपूर्ण आठवडा साजरा करुन झाला की आपल्या जवळच्या व्यक्तिला स्पेशल ट्रिट करण्यासाठी व्हॅलेन्टाईन्स डेला खास प्लॅन्स केले जातात. असाच प्लॅन केला आहे शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांनी. व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने हे ट्रेन्टिंग कपल अलिबागला जाताना ‘वीरल भयानी’ यांच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. (Shamita Shetty and Raqesh Bapat)
या व्हिडीओमध्ये शमिता शेट्टी आणि राकेश बापट मुंबईतील गेट वे ऑफ इंडीया येथून एका खासगी बोटीनं अलिबागसाठी रवाना झालेले दिसत आहेत. त्यामुळे अलिबागचा व्हॅलेन्टाईन्स डे साजरा करणार असल्याचं कळतंय. (Shamita Shetty and Raqesh Bapat)
====
हे देखील वाचा: जेव्हा ३ पेग डाऊन कपिल शर्मा थेट नरेंद्र मोदींशी बोलायला गेला…
====
हल्लीच शमिता शेट्टी आणि राकेश बापट एका दागिन्यांच्या दुकानाबाहेर दिसले होते. त्यामुळे व्हॅलेन्टाईन्स डेलाच हे दोघं साखरपुडा करतायत की काय, अशी शंका आहे. काही चाहत्यांच्या मते राकेश व्हॅलेन्टाईन्स डेला शमिताला लग्नाची मागणी घालण्याची शक्यता आहे.
बिग बॉस ओटीटी या रिॲलिटी कार्यक्रमातील ‘लव्हबर्ड्स’ शमिता शेट्टी आणि राकेश बापट या पूर्वीही बऱ्याचदा एकत्र फिरताना दिसले आहेत. त्यांचे अनेक रोमँटीक फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
शमिता आणि राकेशची भेट बिग बॉस ओटीटी कार्यक्रमात झाली. ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शमितानं तिच्या आणि राकेशच्या नात्याची कबुली दिली होती. तसंच राकेशबद्दल अजून जाणून घ्यायचं आहे, असंही शमितानं सांगितलं. सध्या हे दोघंही एकमेकांना जाणून घेत असून लवकरच ते त्यांच्या नात्याबद्दल मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. (Shamita Shetty and Raqesh Bapat Relationship)
====
हे देखील वाचा: ‘द ग्रेट इंडियन किचन’ फेम निमिषा सजयन (Nimisha Sajayan) करतेय मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
====
राकेश बापटने बिग बॉस ओटीटी या कार्यक्रमात शमिता शेट्टीला प्रपोज केलं. त्यानंतर दोघे जण बिग बॉस १५ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. बिग बॉस १५ मध्ये राकेशला किडनी स्टोनचा त्रास होऊ लागला त्यामुळे त्याला कार्यक्रमातून बाहेर जावं लागलं, तर शमितानं बिग बॉसमध्ये १०० दिवस पूर्ण मुक्काम करुन कार्यक्रमात तिसरं स्थान पटकावलं. राकेश बापटचं यापूर्वी रिद्धी डोगरासोबत लग्न झालं होतं. कालांतराने सामंजस्याने त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
– वेदश्री ताम्हाणे