अशा एका शाळेची कल्पना करा, जेथे ना शिक्षक, ना शाळेची पाठ्यपुस्तके किंवा ना परिक्षा आहेत. त्याचसोबत ना शाळेचे वर्ग सुद्धा. मात्र अशा शाळेत मुलांना हवे तेव्हा खेळायला मिळते आणि त्यांना अडवणारे सुद्धा कोणीही नाही. तुम्हाला यावर विश्वास बसेल का? भले तुमचे उत्तर नाही असले तरीही अशी शाळा खरोखर आहे. खरंतर अमेरिकेत अशा पद्धतीची एक शाळा असून ज्याला सडबरी वॅली स्कूलच्या रुपात ओळखले जाते. या शाळेत मुलांना आपल्या मनानुसार वागण्याची परवानगी दिली जाते. युएस मध्ये बहुतांश ठिकाणी अशा पद्धतीची शाळा आहे. (US Sudbury School)
अमेरिकेत १९६० च्या दशकाच्या अखेरीस फ्री स्कूल मूव्हेंमेंटची सुरुवात झाली होती. हे अभियान फॉर्मल एज्युकेशन सिस्टिमला बदलण्यासाठी होती. अभियानाअंतर्गत १९६७ मध्ये २५ शाळा आणि नंतर १९७२ मध्ये ६०० शाळांची स्थापना झाली. शाळांचे असे मानणे होते की, मुलांवर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांना स्वत:हून काही गोष्टी शिकण्याची संधी दिली पाहिजे. मात्र अशा शाळा पैशांअभावी बंद झाल्या. परंतु एक शाळा राहिली, जी Sudbury Valley School. आज जे सडबरी वॅली स्कूलच्या मॉडेलचे पालन करतात त्यांना सुद्धा त्याच नावाने ओळखले जातेय.
कोणी स्थापना केली?
सडबरी वॅली स्कूलची स्थापना मॅसाचुसेट्सचे फ्रामिंघम क्षेत्रात झाली होती. या शाळेचे प्रमुख संस्थापक डेनियल ग्रीनबर्ग, हॅना ग्रीनबर्ग, जोन रुबिन, मिम्सी सॅडोफ्स्की होते. हे असे पालक होते ज्यांना आपल्या मुलांसाठी उत्तम शाळा शोधता आली नाही. त्यामुळेच त्यांनी आपल्या मनाच्या हिशोबाने शाळेची स्थापना केली. शाळेच्या संस्थापकांचे असे मानणे होते की, सध्याच्या शाळांच्या तुलनेत त्या अधिक दिवस टिकणार नाहीत. त्यांना अशी शाळा बनवली जेथे मुलांच्या इच्छांना प्राथमिकता दिली. संस्थापकांनी असे म्हटले की, मुलांना शिकण्याची इच्छा असते. मात्र पारंपरिक शाळांमध्ये शिक्षणामुळे ती संपुष्टात येते.(US Sudbury School)
कसे काम करते ही शाळा?
सडबरी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वर्गात आपल्या नुसार राहण्यास सांगितले जाते. त्यांच्या वेगाने काम करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे कोणतेही काम करण्यासाठी किती ही वेळ असतो. जर विद्यार्थी एका कामामुळे कंटाळले तर त्यांना एखादी समस्या येत आहे का हे सुद्धा पाहिले जाते. शाळेचे असे मानणे आहे की, कंटाळा येणे हे स्वाभाविकच आहे.
हे देखील वाचा- मुलांच्या ‘अशा’ वागण्यावरुन ओळखता येईल की मुलं भीतीपोटी खोटं बोलत आहेत का…
या शाळेतील मुलांना फक्त वर्गातच शिकवले जात नाही. म्हणजेच त्यांना क्लास नसतो ना कोणताही अभ्यासक्रम. या शाळांची शिक्षण देण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. सडबरी स्कूलमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंदीनुसर क्लासचे आयोजन केले जाते. शाळेत मुल खासकरुन आपल्या आवडीच्या अॅक्टिव्हिटीज करतात. येथे चार ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांना प्रवेश दिला जातो.