सध्या बहुतांश व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने झाल्याने डिजिटल पेमेंटचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. अशातच डिजिटल पेमेंट करण्यासाठी सुद्धा विविध अॅप ही सुरु करण्यात आले आहे.. जसे की, फोन पे, गुगल पे. या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला फक्त तुमच्या बँकेचे डिटेल्स टाकून त्या अॅपला तुम्ही एकदा अकाउंट लिंक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करता येते. त्यालाच युपीआय पेमेंट असे ही बोलले जाते. मात्र युपीआयने पेमेंट (UPI payment) करताना काही गोष्टींची खरंच काळजी घ्यावी लागते. अन्यथा आपल्यालाच त्याचा मोठा फटका बसू शकते.
गेल्या काही काळापासून नागरिकांच्या फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. तर बनावट मेसेजमध्ये एक लिंक शेअर केल्यानंतर तुम्ही ती सुरु केल्यास तुमच्या बँक खात्याचा एक्सेस फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला आपल्या नकळत मिळतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा युपीआयचा तुमच्या नेहमीच्या कामांसाठी वापर करत असाल तर पुढील काही गोष्टी आताच लक्षात ठेवा. जेणेकरून तुमची फसवणूक ही होणार नाही आणि तुमच्या बँक खात्यातील रक्कम ही सुरक्षित राहिल.
-UPI PIN शेअर करु नका
युपीआय पेमेंट करताना सर्वाधिक महत्वाचे असे की, त्यासाठी वापरला जाणारा चार किंवा सहा अंकी युपीआय पिन. हा फार महत्वाचा आहे कारण पेमेंट करण्यापूर्वी तुम्हाला तो द्यावा लागतो आणि नंतरच तुमचे पेमेंट पूर्ण होते. त्यामुळे हा युपीआय पिन तुम्ही कोणासोबत ही शेअर करु नका. तर युपीआय आयडी तयार करताना तुम्हाला युपीआय पिन जनरेट करावा लागतो.
-फोनला स्क्रिनलॉक लावा
जर तुम्ही युपीआय अॅपचा वापर करत असाल तर काही वेळेस पिन टाकताना बहुतांश लोक तो पाहतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या फोनला स्क्रिन लॉक लावणे सुरक्षिततेचे ठरेल. जेणेकरुन कोणीही त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करणार नाही.
-ट्रांजेक्शन पूर्वी युपीआय आयडी वेरिफाय करा
पैसे पाठवण्यापूर्वी किंवा एखाद्याकडून येणार असतील तर युपीआय आडीचा वापर केला जातो. अशातच जर तुम्हाला समोरचा व्यक्ती पैसे पाठवणार असेल तर तुम्ही तुमचा युपीआय आयडी क्रॉस चेक करा.
हे देखील वाचा- पेमेंट करण्यासाठी QR कोड स्कॅन करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या, अन्यथा होईल फसवणूक
-अॅपमध्ये एकापेक्षा अधिक युपीआयचा वापर करु नका
कोणत्याही अॅपमध्ये एकापेक्षा अधिक युपीआय अकाउंट्सचा वापर करु नका. युजर्सला एक अॅपच्या मदतीने दुसऱ्या अॅपवर सुद्धा पेमेंट करता येते.(UPI payment)
-अज्ञात लिंकवर क्लिक करु नका
मोबाईलवर येणाऱ्या कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करण्यापासून दूर रहा. आपल्याला बहुतांश एसएमएसमध्ये कॅशबॅक आणि डिस्काउंटच्या माध्यातून युपीआय आयडी हॅक केला जाऊ शकतो. ज्यामुळे युजर्सला याचा मोठा फटका बसू शकतो.