Home » राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पंतप्रधान मोदींकडून अनोखी भेट

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पंतप्रधान मोदींकडून अनोखी भेट

by Team Gajawaja
0 comment
Unique Gift
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा सर्वार्थानं गाजला. पण त्यातही पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांची पत्नी जिल बायडेन यांना जी भेटवस्तू (Unique Gift) दिली त्याची चर्चा अधिक झाली. पंतप्रधान मोदी नेहमी परदेशी दौ-यांमध्ये भारतातील निवडक वस्तूंची भेट देतात. तसेच त्यांनी अमेरिका दौ-यातही केले. मात्र यासोबतच त्यांनी जो बायडेन आणि जिल बायडेन यांना भारतातील अध्यात्मिक परंपराबाबतही जोडून घेतलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी वयाची 80 वर्ष पार केली आहेत. अशा ज्येष्ठ व्यक्तींना भेट म्हणून भारतात काही खास वस्तू (Unique Gift) दिल्या जातात. त्या सर्वंच व्हाईट हाऊसमध्ये नेणं शक्य नसलं तरी पंतप्रधान मोदी यांनी अत्यंत कल्पकरित्या त्यांची अन्य रुपं बायडेन यांना भेटीदाखल दिली आहेत. भारतीय परंपरांचा मान ठेवणा-या या भेटींबाबत आणि त्यामागील परंपरेबाबत सध्या अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.  

अमेरिकेच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांची पत्नी जिल बायडेन यांची भेट घेतली. या भेटीत  मोदींनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी डॉक्टर जिल बायडेन यांना 7.5 कॅरेटचा हिरवा हिरा भेट दिला. हा लॅब ग्रोन डायमंड आहे. भारताच्या स्वातंत्र्याचे सध्या अमृतमहोत्सवी वर्ष चालू आहे. त्याची आठवण म्हणून हा हिरा जिल बायडेन यांना देण्यात आला आहे. या हि-याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला लॅबमध्ये तयार करण्यात आलं आहे. याशिवाय राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पंतप्रधान मोदी यांनी एका चंदनाच्या लाकडात कोरलेली मोठी पेटी भेट (Unique Gift) दिली. या पेटीमध्ये अनेक छोट्या वस्तू ठेवलेल्या होत्या. या वस्तू छोट्या जरी असल्या तरी त्यांचे महत्त्व खूप आहे. जो बायडेन यांनी वयाची 80 वर्ष पूर्ण केली आहेत. त्याला सहस्र चंद्र दर्शनम् म्हणजे हजार पौर्णिमा पाहणे असे म्हटले जाते.

हिंदू धर्मात अशा व्यक्तींना काही खास भेटवस्तू (Unique Gift) दिल्या जातात. हजार पौर्णिमा पाहणाऱ्याला गाय आणि सोन्याच्या वस्तू दिल्या जातात. एका वर्षात 12 पौर्णिमांचा हिशोब केला तर 80 वर्षे 8 महिन्यानंतर माणसाला 1000 पौर्णिमा दिसतात. अशा व्यक्तीला मानाच्या भेटवस्तू देणे हा एक हिंदू परंपरेचा भाग आहे. मोदी यांनी बायडेन यांना अशाच वस्तू भेट दिल्या आणि त्यामागची हिंदू परंपराही समजावून सांगितली. नोव्हेंबरमध्ये जो बायडेन आपला 81 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. या वस्तू पाहून त्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. जयपूरच्या कारागिरांनी बायडेन यांना देण्यात येणारा चंदनाचा बॉक्स बनवला होता. त्यासाठी म्हैसूर येथील चंदनाचे लाकूड वापरण्यात आले आहे. त्यातील प्रमुख गोष्ट म्हणजे, ‘उपनिषदाची 10 तत्त्वे’ या पुस्तकाची प्रत, सोबत गणपतीची चांदीची मूर्ती, चांदीचा दिवा, तमिळनाडूतील तीळ,  महाराष्ट्राच गुळ, गुजरातचे मीठ, चांदीचा नारळ, पंजाबचे तूप अशा वस्तूंनी भरलेली ही पेटी बायडेन यांना भेट देण्यात आली.  

जिल बायडेन यांना पंतप्रधान मोदी यांनी 7.5 कॅरेटचा हिरा भेट दिला. हा प्रयोगशाळेत बनवलेला हिरा नैसर्गिक हिऱ्यापेक्षा वेगळा असतो.  त्याला पर्यावरणपूरक हिरा असेही म्हटले जाते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात लॅब ग्रोवन डायमंड टेक्नॉलॉजी ची माहिती दिली होती. या हि-याला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले होते. या हि-यावर कस्टम ड्युटीही फार नसल्यामुळे ते परदेशात लोकप्रिय होत आहेत. आता पंतप्रधान मोदी यांनी जिल बायडेन यांना असाच हिरा भेट म्हणून दिल्यानं अशाप्रकारच्या हि-यांची मागणी अधिक वाढण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करीत आहेत. नैसर्गिक हिरे पृथ्वीच्या गर्भात लाखो वर्षांत तयार होतात आणि खाणकामातून काढले जातात. त्याच वेळी, लॅब ग्रोन हिरे प्रयोगशाळांमध्ये बनवले जातात. ते दिसायलाही वास्तविक नैसर्गिक हिऱ्यांसारखे दिसतात. (Unique Gift)

दोन्हींची रासायनिक रचना, म्हणजेच ज्या पदार्थापासून हिरे बनवले जातात, तेही सारखेच आहे. पण प्रयोगशाळेत केलेले हिरे एक ते चार आठवड्यांत तयार होतात. हे प्रमाणपत्रांसह विकले जातात. जिथे एक कॅरेट नैसर्गिक हिरा 4 लाखांना मिळेल तर, लॅबमध्ये बनवलेला हाच हिरा 1 ते 1.50 लाख रुपयांना मिळतो. त्यामुळे प्रयोगशाळेत उगवलेल्या हिऱ्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. लॅबमध्ये बनवलेला डायमंडही समान रंग, समान कटिंग, समान डिझाइन आणि प्रमाणपत्रासह उपलब्ध असतो. (Unique Gift) 

========

हे देखील वाचा : चीनमध्ये अधिक पगाराची नोकरी सोडून तरुण वेटरच्या मार्गावर

========

हा हिरा तयार होण्यासाठी कार्बन बियाणे आवश्यक असते ते मायक्रोवेव्ह चेंबरमध्ये ठेवून विकसित केले जाते. एक चमकणारा प्लाझ्मा बॉल उच्च तापमानाला गरम करून तयार केला जातो. या प्रक्रियेत असे कण तयार होतात जे काही आठवड्यांनंतर हिऱ्यात बदलतात. मग ते नैसर्गिक हिऱ्यांप्रमाणे कापून पॉलिश केले जातात. असाच हिरवा हिरा पंतप्रधान मोदी यांनी जिल बायडेन यांना भेट दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी बायडेन दांम्पत्याला अशा भेटी (Unique Gift) दिल्या आहेत, ज्या भेटींना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या प्रत्येक परदेश दौ-यात तेथील प्रमुखांना भारतातील वैशिष्टपूर्ण वस्तू भेट स्वरुपात दिल्या आहेत. यानंतर त्या वस्तूंची मागणी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.  आताही बायडेन दांम्पत्याला दिलेल्या भेटीतील वस्तूंची मागणी वाढेल अशी आशा व्यक्त होत आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.