भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे. आता तुम्ही म्हणाला दिवाळी झाली, कार्तिक महिना सुरु आहे, आणि आता कुठे गणेश चतुर्थीबद्दल माहिती देताय. थांबा थांबा आम्हाला देखील माहिती, गणेश चतुर्थी होऊन काही महिने उलटले आहे. आपल्या सर्वांच्या घरी आनंदाने बाप्पा येऊन आपला पाहुणचार घेऊन गेला. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा मंदिराबद्दल सांगणार आहोत जिथे आताच गणेश उत्सवाची सुरुवात झाली आहे. विश्वास बसत नाहीये…? वाचा मग पूर्ण बातमी. (Todays Marathi Headline)
आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. याच गणेशचा वर्षभरातील सर्वात मोठा सण म्हणून गणेश चतुर्थी प्रसिद्ध. यादिवशी सर्व घरांमध्ये गणेशाची स्थापना करत त्याचा यथायोग्य पाहुणचार केला जातो आणि रीतीप्रमाणे त्याचे विसर्जन होते. गणेश चतुर्थीनंतर, पितृपक्ष, नवरात्र, दसरा, दिवाळी असे सण आपण लागोपाठ साजरे करतो. मात्र महाराष्ट्र्रात कोकणात एक ठिकाण असे आहे, जिथे दिवाळीत गणेशाची स्थापना केली जाते आणि होळीच्या आधी बाप्पाचे विसर्जन केले जाते. अशी अनोखी परंपरा असलेल्या या ठिकाणाबद्दल माहिती करून घेऊया. (Latest Marathi Headline)

संपूर्ण जगात महाराष्ट्र्रातील त्यातही खासकरून कोकणातल्या गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. कोकणात गणेशोत्सवाचे स्वरूप काही औरच असते. जगभरातून चाकरमानी या सणाच्या निमित्ताने कोकणात पोचतात आणि गणेशाची सेवा करतात. याच कोकणात वेंगुर्ला गाव आहे. याच वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे असलेल्या एका गणपती मंदिरामध्ये आगळी वेगळी परंपरा आजही पाळली जाते, आणि ती म्हणजे दरवर्षी अश्विन कृष्ण अमावस्येला म्हणजेच दिवाळीच्या सणांमधील मुख्य दिवशी अर्थात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाजत गाजत इथे गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. त्यानंतर बाप्पाचे दररोज विधिवत पूजन केले जाते. या बाप्पाचे विसर्जन दहा किंवा २१ दिवसांनी नाही तर, होळीच्या दोन दिवस आधी होते. म्हणजेच जवळपास तीन ते चार महिन्यानंतर इथे स्थापित झालेल्या बाप्पाचे विसर्जन होते. वेंगुर्ला सागरेश्वर किनाऱ्याजवळ या बाप्पाचे विसर्जन केले जाते. त्यापूर्वी मंदिरांमध्ये म्हामने या महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम उभादांडा गावांसह पंचक्रोशीतील गणेशभक्त आवर्जून येथे उपस्थित राहतात. (Top marathi News)
उभादांडा, वेंगुर्ला येथील हे प्रसिद्ध गणपती मंदिर त्याच्या या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरात गणेश चतुर्थीऐवजी दिवाळीत गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. हे मंदिर सुमारे २५० ते ३०० वर्षांहून जुने आहे आणि मुख्य म्हणजे या मंदिराला दरवाजे नाहीत. हे गणेश मंदिर २४ तास खुले असते. त्यामुळे तुम्ही कधीही येऊन बाप्पाचे दर्शन घेऊ शकता. वेंगुर्ला स्टेशनपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हे बाप्पाचे मंदिर स्थित आहे. येथे देखील गणेशोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या काळामध्ये जागर, फुगड्या, गोफनृत्य, भजन, कीर्तन, सत्यनारायण पूजा असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विसर्जनानंतर मंदिरामध्ये बाप्पाची प्रतिमा स्थापन केलेली असते. हा बाप्पा नवसाला पावणारा असल्याने या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी दुरून लोकं वेंगुर्ल्यामध्ये येतात. (Top Trending News)
========
Lord Shiva : भगवान शिव आणि विष्णू यांची एकत्र पूजा केले जाणारे भारतातील एकमेव लिंगराज मंदिर
========
या मंदिरांमध्ये माघ महिन्यात संकष्टी चतुर्थीला भव्य जत्रोत्सवही असतो. या मंदिरांमध्ये महाआरती झाल्यानंतर गणपती खांद्यावर घेऊन ही मिरवणूक वाघेश्वर मंदिरामार्गे सागरेश्वर किनारी निघते. विसर्जन मार्गादरम्यान ठिकठिकाणी थांबून भजन केले जाते. या बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर मंदिरात त्याचा सहवास आहे, अशी मान्यता आहे. या मंदिरांमध्ये भाविकांकडून नवसांची परतफेड देखील केली जाते. विसर्जनानंतर मंदिरात रिक्त आसनावर गणपतीचा फोटो ठेवला जातो. गणेशभक्त दर मंगळवार, संकष्टी चतुर्थी, विनायकी गणेश चतुर्थी इत्यादी दिवशी मंदिरांमध्ये येऊन फोटोचे दर्शन घेतात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
