थंडीचा किंवा हिवाळ्याचा अधिक आनंद घेण्यासाठी अनेक लोकं प्रसिद्ध अशा हिल्स स्टेशनवर जाण्याचे प्लॅन आखतात. कारण थंडगार वातावरणामध्ये फिरण्याचे आणि निसर्गाचे सौंदर्य बघण्याचे सुख औरच असते. आता सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात तर हिल्स स्टेशनला सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. कारण आता बरेच लोकं भारतातील विविध हिल्स स्टेशन एक्सप्लोर करताना दिसत आहे. आता थंडीच्या दिवसात हिल्स स्टेशनला जायचे म्हणजे उत्तर भारताशिवाय पर्याय नाही. उत्तर भारतातील हिल्स स्टेशन हिवाळ्यामध्ये कमालीचे सुंदर आणि बर्फाच्छादित पाहायला मिळतात. म्हणूनच याकाळात उत्तर भारतात जाण्याचा अनेकांचा प्लॅन असतो. आज आम्ही तुम्हाला भारतातील असेच काही प्रसिद्ध आणि अतिशय सुंदर हिल्स स्टेशन सांगणार आहोत जिथे तुम्ही यंदाच्या हिवाळ्यात नक्कीच गेले पाहिजे. (Tourism)
तवांग हिल स्टेशन
अरुणाचल प्रदेशातील तवांग हे अतिशय सुंदर आणि शांत हिल स्टेशन आहे. बर्फाच्छादित डोंगर, सुंदर मठ, तलाव आणि हिरव्यागार दऱ्या यामुळे हे अनोखे बनते. विशेषत: हिवाळ्यात तवांगचे सौंदर्य शिगेला पोहोचते. मात्र उन्हाळ्यातही चालण्यासाठी ही जागा परफेक्ट आहे. हे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. शहरांच्या उकाड्याने त्रस्त झालेले लोक तवांगमध्ये येऊ शकतात, जे एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. (Marathi News)

लॅन्सडॉन हिल्स स्टेशन
तुम्हालाही गर्दीपासून दूर शांत ठिकाणी जायचं असेल तर उत्तराखंडचं लॅन्सडौन तुमच्यासाठी परफेक्ट हिल स्टेशन आहे. पाइन आणि ओकच्या घनदाट जंगलांनी वेढलेले हे हिल स्टेशन नैसर्गिक सौंदर्याचा अद्भुत नमुना आहे. काश्मीरपेक्षाही सुंदर असल्याचे म्हटले जाते. इथली सुंदर मैदानं निसर्ग सौंदर्याचं प्रतिबिंब उमटवतात आणि स्वर्गासारखं भासवतात. या हिल स्टेशनला भेट देण्यासाठी तुम्ही केव्हाही जाऊ शकता. इथलं हवामान नेहमीच चांगलं असतं. (Top Trending Headline)

रोहतांग हिल्स स्टेशन
हिमाचल प्रदेश रोहतांग पास मनालीपासून हाकेच्या अंतरावर रोहतांग पास आहे आणि येथे तुम्हाला बर्फाचे नजारे पाहायला मिळतील. इथली थंडी अशी आहे की तुम्हाला उबदार कपडे घालावे लागतात. हे ठिकाण अनेक चित्रपटांच्या शूटिंगचे ठिकाणही आहे. रोहतांगला जाण्यासाठी तुम्ही मनाली किंवा कुल्लू येथून जीप करू शकता किंवा स्वतःच्या कारने तिथे जाऊ शकता. (Top Marathi News)

स्पिती व्हॅली, हिमाचल प्रदेश
तुम्हाला शांत आणि सुंदर ठिकाण बघायचे असेल, तर स्पिती व्हॅली तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. स्पिती व्हॅलीमध्ये जाऊन तुम्ही बर्फासोबत जुने बौद्ध मठ आणि सुंदर दृश्ये पाहू शकता. हे ठिकाण खूप उंचावर आहे, त्यामुळे येथील हवा थंड राहते. या थंडगार वाऱ्यामुळे उन्हाळ्यातही थंडावा जाणवतो. येथील हवामान आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखे आहे. स्पितीला जाण्यासाठी आधी किन्नौर गाठावे लागते. किन्नौरहून तुम्हाला स्पितीला जाण्यासाठी बस घ्यावी लागेल. (Latest Marathi News)

मुन्नार हिल्स स्टेशन
मुन्नार हे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि भेट दिलेल्या हिल स्टेशनपैकी एक आहे, जे दक्षिण भारतातील केरळ राज्यात आहे. मुन्नारमध्ये दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या चहाच्या बागा आहेत, या चहाच्या बागांमुळे मुन्नार हे भारतातील टॉप ५ हिल स्टेशन्सपैकी एक बनले आहे. एक लहान हिल स्टेशन असूनही, मुन्नार खूपच लोकप्रिय आहे. येथे तुम्ही इको पॉइंट, अटुक्कड़ वॉटरफॉल, पेरियार नेशनल पार्क, फोटो पॉइंट, पोथामेडु व्यू पॉइंट, मट्टुपेट्टी डॅम पाहू शकता. येथे तुम्हाला ट्री हाउस स्टे, टी एस्टेट टूर, हायकिंग आणि ट्रेकिंग, एलिफेंट राइड आणि बोटिंग यांसारख्या ऍक्टिव्हिटी करू शकता. (Top Stories)

दार्जलिंग हिल्स स्टेशन
पश्चिम बंगाल राज्याच्या उत्तरेस पूर्व हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले, दार्जिलिंग हे पूर्व बंगालमधील सर्वात सुंदर हिल स्टेशन आणि भारतातील १० प्रमुख हिल स्टेशन्सपैकी एक आहे. समुद्रसपाटीपासून २१३४ मीटर उंचीवर वसलेले, दार्जिलिंग विविध बौद्ध मठांनी आणि हिमालयाच्या मोहक शिखरांनी वेढलेले आहे. इथल्या दऱ्या अतिशय आकर्षक आहेत ज्या हिल स्टेशन म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. दार्जिलिंग हे केवळ चहामुळेच जगभर प्रसिद्ध नाही, तर त्याच्या सौंदर्यामुळेही हे शहर दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करते, त्यामुळे हे ठिकाण किती प्रेक्षणीय आणि आकर्षक असेल याची कल्पना करा. दार्जिलिंगमध्ये टाइगर हिल, बतासिया लूप, हिमालयन पर्वतारोहण संस्थान, नाइटेंगल पार्क, रॉक गार्डन, दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, सिंगालीला राष्ट्रीय उद्यान, संदकफू ट्रेक, तीस्ता नदी, पदमाजा नायडू जूलॉजिकल पार्क आदी ठिकाणं पाहू शकता. येथे ट्रेकिंग, रिवर राफ्टिंग, टॉय ट्रेन राइड, रोपवे राइड, कॅम्पिंग आदी एक्टिविटीज करू शकता. (Top Trending News)

=========
Vitamin C : चमकदार आणि ग्लोइंग स्किनसाठी जाणून घ्या सर्वात बेस्ट आणि सोपे उपाय
=========
श्रीनगर हिल्स स्टेशन
श्रीनगर हे भव्य नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक बागा आणि बर्फाच्छादित शिखरे असलेले भारतातील सर्वोत्तम हिल स्टेशन आहे. झेलम नदीच्या मार्गावर वसलेले, श्रीनगर हे जम्मू आणि काश्मीरचे एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे जे ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ म्हणून ओळखले जाते. नैसर्गिक उद्याने, सुंदर तलाव आणि प्रादेशिक हस्तकलेसाठी ओळखले जाणारे श्रीनगर हे पर्यटकांचे आकर्षण आहे. हिमाच्छादित शिखरे आणि मुसळधार बर्फवृष्टीमुळे हे हिल स्टेशन हिवाळ्यात अप्रतिम दिसते. याशिवाय पर्यटकांना उन्हाळ्यात भारतातील या सुंदर हिल स्टेशनवर शिकारा राईड आणि घोडेस्वारीसारख्या अनेक उपक्रमांचा आनंद घेता येतो. श्रीनगरमध्ये डल झील, मुगल गार्डन, निशात बाग, शालीमार बाग, इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन, चार चिनार, वुलर झील, बारामूला, युसमर्ग, नेहरू गार्डन, नागिन झील, दाचीगाम नेशनल पार्क आदी ठिकाणं पाहू शकता. यासोबतच शिकारा स्वारी, घोडेस्वारी, स्केटिंग, शोपिंग, नौका विहार, फोटोग्राफी आदी अॅक्टिव्हिटी करू शकता. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
