Home » अल्ट्रासाउंडपूर्वी चिकट जेल ‘या’ कारणास्तव लावले जाते

अल्ट्रासाउंडपूर्वी चिकट जेल ‘या’ कारणास्तव लावले जाते

by Team Gajawaja
0 comment
Ultrasound
Share

तुम्ही तुमच्या आयुष्यात एकदा तरी अल्ट्रासाउंड (Ultrasound) जरुर केले असेल. जर अल्ट्रासाउंड केले नसेल तर घरात एखाद्याने तरी ते केले असेल. अल्ट्रासाउंड करण्यापूर्वी डॉक्टर तुमच्या पोटाला एक विचित्र चिकट जेल लावतात. पण तुम्हाला माहिती आहे का असे का केले जाते? अल्ट्रासाउंड असे एक उपकरण आहे जे आपल्या शरिराच्या अंर्तभागाचा एक लाइव फोटो बनवून आपल्याला देतो. यासाठी सोनार आणि रेडियो तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आपण बहुतांशवेळा पाहतो की, अल्ट्रासाउंड करण्यापूर्वी डॉक्टर एक जेल लावतात, ज्या ठिकाणचे अल्ट्रासाउंट स्कॅन करायचे असते. अशातच काही लोकांना प्रश्न पडतो की, अखेर ते असते काय? याची गरज का भासते? त्या व्यतिरिक्त अल्ट्रासाउंड होऊ शकत नाही?

जेव्हा अल्ट्रासाउंड स्कॅन करतो तेव्हा जेलचा वापर न केल्यास रुग्णाची त्वचा आणि अल्ट्रासाउंड मशून मधील प्रोब दरम्यान एअरच्या कारणास्तव त्याच्या तरंग प्रवाह होण्यास अडथळा येतो. ते एका मीडियम ते दुसऱ्या मीडियममध्ये अगदी सहज जाऊ शकत नाहीत. विज्ञानाच्या भाषेत त्याला Acoustic Impedance असे म्हटले जाते. यामुळे तरंग आतमध्ये न जाता बाहेरुन परत येतात किंवा शरिरात काही प्रमाणात जात परत येतात. त्यामुळे इमेज ही पूर्णपणे स्पष्ट मिळत नाही.

Ultrasound
Ultrasound

त्वचा आणि मशीन दरम्यान एअर संपवतो
जर तुम्ही अल्ट्रासाउंड (Ultrasound) स्कॅन करतेवेळी शरिर आणि प्रोब दरम्यान जेल लावत असाल तर तो ट्रांसड्युरस आणि त्वचा मध्ये होणाऱ्या हवेच्या लहान कणांना संपवते. यामुळे एअर असण्याची शक्यता कमी होते. Acoustic Impedance सुद्धा कमी होते. याचे तरंग एका मीडियम ते दुसऱ्या मीडियम पर्यंत अगदी सहज प्रवाह करु शकतात. येथून टिशू किंवा यंत्राला स्पर्श करुन परत येतात. याच कारणास्तव आपल्या खोलवर असलेल्या अवयवांचे फोटो स्पष्ट दिसण्यास मदत होते. जेलच्या कारणास्तव तुमची त्वचा आणि सेंसर दरम्यान, सातत्याने संपर्क राहत ट्रांसड्युसर योग्य पद्धतीने पुढे जातो.

हे देखील वाचा- कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर दिसत नाही लक्षणं, अशा पद्धतीने करा निदान

त्वचेसाठी अत्यंत सुरक्षित
त्वचेवर अल्ट्रासाउंडवेळी लावले जाणारे जेल हे पाणी आणि प्रोपीलीन ग्लाइकोल पासून बनवलेले असते. काही वेळेस असा प्रश्न उपस्थितीत राहतो की, हे हानिकार आहे का? खरंतर हे जेल पूर्णपणे नॉन टॉक्सिक असते. यामध्ये कोणतेही विषारी पदार्थ नसतात. यामुळे त्वचेसाठी ते अत्यंत सुरक्षित आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.